गुरुवार रात्री झोपण्याआधी 2 मिनिट काढून बोला 1 मंत्र; जीवनात येईल सुख आणि समृद्धी.!

अध्यात्म

गुरुवारचा दिवस हा श्री भगवान हरी विष्णू यांचा दिवस मानला जातो. ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतांचे की श्री विष्णू यांची पूजा आराधना या दिवशी केली जाते. श्री विष्णू यांना या विश्वाचा पालनकर्ता मानले जाते. मनोवांचीत फळ प्राप्त करण्यासाठी अनेक जण गुरूवारच्या दिवशी श्रीहरी विष्णू यांची पूजा आराधना करत असतात. अशी मान्यता आहे की गुरुवारच्या दिवशी फक्त श्री हरी यांच्या नामाचा जप जरी केला किंवा त्यांच्या मंत्राचा जप सुद्धा केला तरी आपल्याला या विश्वातील सुख धन वैभव प्राप्त होते.

जर तुमचे लग्न जमत नसेल, लग्नाचा योग जुळत नसेल, लग्नाचे वय झालेले आहे परंतु काही कारणास्तव लग्न जमत नसेल घरामध्ये सुख शांती वैभव नांदत नसेल, घरामध्ये अडचणी निर्माण होत असून त्याच बरोबर संतती जन्माला येत नसेल तर अशावेळी अनेक लोक गुरूवारच्या दिवशी श्रीहरी विष्णू यांची उपासना करतात व त्यांच्या मंत्राचा जप अवश्य करतात. सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे.

हे वाचा:   गायीला खाऊ घाला फक्त ही १ वस्तू; कोणत्याही परीक्षेत यश नक्की मिळेल.!

या व्यस्त वेळापत्रकामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या संसारामध्ये गुरफटलेला आहे आणि यामुळे अनेकांना श्रीविष्णू यांची उपासना करणे शक्य होत नाही म्हणूनच रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला श्री विष्णू यांच्या एका मंत्राचा जप आपल्याला आवश्यक करायचा आहे. जसे की आपणा सर्वांना माहिती आहे श्रीविष्णू या विश्वाचे पालन करत आहे.

जेव्हा जेव्हा या विश्वावर संकट येतात तेव्हा श्री विष्णू वेगवेगळी रूपे धारण करून भक्तांच्या संरक्षणासाठी धावून येत असतात पण तुम्ही सुद्धा श्रीविष्णूची उपासना करत असाल तर अशावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे श्रीविष्णूची उपासना करत असतानाच आपल्याला माता महालक्ष्मीची सुद्धा उपासना करायची आहे.

अशा प्रकारे आपल्या लक्ष्मीनारायणाची उपासना करायचे कारण की जेथे श्रीहरी असता त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे वास्तव्य असते आणि पूजाअर्चा करत असताना आपल्याला श्रीहरी यांच्या चरणी हळद-कुंकू व्हायचे आहे आणि तेच हळद-कुंकू आपल्या मनगटी लावायचे आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू यांचा मंत्र जप करायचा आहे.

हा मंत्र अतिशय प्रभावी आहे.या मंत्राने तुमच्या जीवनातील अनेक संकटे दूर होणार आहे ,चला तर मग जाणून घेऊया नेमका कोणता मंत्र आहे… ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् || हा विष्णु गायत्री मंत्र आहे.

हे वाचा:   कितीही देव देव करा पण या 5 लोकांना देव कधीच प्रसन्न हो नाही..कधीच श्रीमंत बनत नाहीत असे लोक..

आपल्या संकटातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला गुरुवारी रात्री हा मंत्र जप करायचा आहे. काही दिवस या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर झालेली आहेत आणि तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंदी आलेला आहे याचा तुम्ही स्वतः अनुभव घ्याल म्हणून या मंत्राचा जीवनामध्ये नेहमी समावेश असू द्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.