फक्त १ चमचा बेकिंग सोडा पायातील चिखल्या रात्रीतून करेल गायब; घरगुती फंगल इन्फेक्शन उपाय.!

आरोग्य

पावसाळ्याचा ऋतू म्हटला की वेगवेगळे आजार आलेच आणि या आजारामध्ये आपण स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो कारण की सध्याचे वातावरण भयंकर आहे. आपल्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करत आहे म्हणून पावसाळ्यामध्ये आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत असतो.

अनेकदा पावसाळ्यामध्ये आपल्याला चिखल्याची समस्या निर्माण होत असते. हाता – पायामध्ये, अंगठामध्ये चिखल्या सहज आलेल्या पाहायला मिळतात. चिखल्या प्रामुख्याने आपल्या हातापायांचा संबंध पाण्याशी जास्त काळ आल्यामुळे होत असतो परंतु जर आपण या समस्यांकडे वेळेवर लक्ष दिले नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम सुद्धा आपल्याला भोगायला लागू शकतील म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही चिखल्या झाल्यावर काय उपाय योजना करायचे आहे याबद्दल तुम्हाला महत्वपूर्ण माहिती सांगणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

या चिखल्या प्रामुख्याने फंगल इन्फेक्शन मुळे होत असतात आणि या चिखल्या झाल्यावर आपल्या शरीरावर पांढरा द्रव तयार होत असतो. अनेकदा या मधून पू सुद्धा बाहेर पडत असते. फंगल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी आपण बेकिंग सोडा वापरणार आहोत परंतु बेकिंग सोडा वापरण्याआधी सर्वप्रथम आपल्याला आपले पाय व प्रभावित जागा स्वच्छ गरम पाण्याने धुऊन घ्यायची आहे.

हे वाचा:   रात्री जेवणानंतर घ्या फक्त १ ग्लास; पाठीचा कणा ,सांध्यांची झीज कंबर दुखी होईल लगेचच बरी.!

जर आपण गरम पाण्यामध्ये चार ते पाच कडुलिंबाची पाने टाकली तर अतिशय उत्तम यामुळे इन्फेक्शन सुद्धा कमी होऊ शकेल आणि पाय स्वच्छ धुऊन झाल्यानंतर आपल्याला कपड्याच्या साह्याने त्यांना कोरडे करायचे आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये एक चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि त्या नंतर गरम केलेले थंड पाणी थोडे घ्यायचे आहे जेणेकरून त्याची व्यवस्थित पेस्ट तयार होऊ शकेल.

बेकिंग सोडा नैसर्गिकच फंगल एजंट म्हणून काम करते. आपल्या शरीरावर कोणतेही फंगल इन्फेक्शन असेल तर ते फंगल इन्फेक्शन दूर करण्यासाठी बेकिंग सोडा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

ही पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला आपल्या हातापायावर झालेल्या चिखल्यावर ही पेस्ट लावायची आहे आणि अर्धा ते एक तास ठेवायची आहे. ही पेस्ट लावल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये हात किंवा पाय बुडवायचे नाही आहे. हा उपाय आपल्याला दिवसभरातून दोन वेळा करायचा आहे, अशा पद्धतीने आपण हा उपाय दहा ते पंधरा दिवस सातत्याने केला तर तुमच्या शरीरावर फंगल इन्फेक्शन तयार झालेले आहे त्यामुळे चिखल्या निर्माण झालेल्या आहेत त्या पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे.

हे वाचा:   वाढलेला नंबर खात्रीशीर होईल कमी; सतत होणारी सर्दी कायमची बंद ,हि फुलं नसून चमत्कार आहे.!

बहुतेक वेळा आपण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बुट घालत असतो आणि या बुटांच्या ओल्याव्यांमुळे सुद्धा आपल्या पायांना चिखल्या येत असतात तर अशावेळी बूट घालण्या ऐवजी आपण इतर चप्पल वापरू शकतो परंतु जर तुम्ही बुट घालत असाल तर अशा वेळी बुटामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा टाका आणि त्यानंतर तुम्ही मोजे घालून बूट वापरू शकता असे केल्याने तुमच्या पायाला चिखल्या कधीच होणार नाही.

पायाची आद्रता सुद्धा कमी होणार नाही तर अशा पद्धतीने आजचा आपला उपाय हा तयार झालेला आहे. हा अत्यंत साधा घरगुती उपाय असला तरी अत्यंत प्रभावी आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि चिखल्या यांपासून संरक्षण मिळवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.