आंघोळीच्या पाण्यामध्ये फक्त ही एक वस्तू टाका. पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल. अनेकांचा या गोष्टीवर उपायावर विश्वास बसणार नाही परंतु हा उपाय केल्याने आपल्या वास्तूमधील जे काही दोष असतात ते पूर्णपणे नष्ट होऊन जातात. हा उपाय केल्याने आपले मन शुद्ध होते, निर्मळ बनते आणि आपले चरित्र सुद्धा चांगले होते. हा उपाय आपल्याला सकाळी आंघोळ करण्यापूर्वी करायचा आहे.
अंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये फक्त आपल्याला हे दोन थेंब टाकायचे आहे. दरवेळेस आपल्याला सकाळी लवकर आंघोळ करायची आहे हि आंघोळ सूर्योदय होण्यापूर्वी करायची आहे. आठ नऊ नंतर जी आंघोळ केली जाते त्यास राक्षसी आंघोळ असे म्हटले जाते म्हणूनच आपल्याला सूर्योदय होण्यापूर्वीच आंघोळ करायचे आहे कारण की या अंघोळीला देवस्नान असे म्हटले जाते.
फक्त या दोन थेंबाने जर आपण आंघोळ केली तर आपले शरीर शुद्ध मन सात्विक तर होणारच आहे त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कार्यांमध्ये यश प्राप्त होणार आहे. अनेकदा आपण खूप मेहनत करत असतो परंतु कार्य होता होता त्यामध्ये अडचण येऊ लागतात.
आपले मन कशातच लागत नाही. अनेकदा आपल्याला विनाकारण बेचैनी वाटत असते,या सगळ्या गोष्टी आपल्या घरातील वास्तुदोष तसेच ज्योतिष शास्त्रातील, कुंडली मधील बदललेले ग्रहस्थान यामुळे सुद्धा होऊ शकते म्हणून आपल्याला आंघोळ करण्यापूर्वी या वस्तूचे दोन थेंब आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. हा उपाय केल्याने धनप्राप्तीचे योग जुळून येतील.
तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल. हा उपाय करण्यासाठी आपण दोन वस्तू वापरणार आहोत त्यातील पहिली वस्तू आहे कापूर. कापूर ही बाजारांमध्ये सहज उपलब्ध होते. जर तुम्हाला निसर्गनिर्मित कापूर मिळाला तर अतिउत्तम जर नाही मिळाला तर बाजारामध्ये उपलब्ध असणारा कापूर सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी वापरू शकता.
त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ घ्यायचा आहे ते म्हणजे खोबरेल तेल. या दोन्ही वस्तूना तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये , वास्तुशास्त्रामध्ये व ज्योतिष शास्त्रामध्ये भरपूर महत्त्व आहे.आपल्याला एक चमचा खोबरेल तेल मध्ये तीन ते चार कापुराच्या वडी बारीक करून टाकायचे आहेत. त्यानंतर हे मिश्रण आपल्या दोन ते तीन तास तसेच ठेवायचे आहे त्यातून जे तेल तयार होईल त्याला आपण कापूर युक्त तेल असे म्हणतो.
कापुराचे तेलाचे आयुर्वेदिक काम दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे उपाय सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर अध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा ह्या तेलाचे खूपच महत्त्व असते म्हणूनच आपल्याला आंघोळ करण्याचा पाण्यामध्ये दोन थेंब कापूर युक्त तेल टाकायचे आहे आणि या तेलाने आपल्याला आंघोळ करायची आहे,अशा प्रकारे आपला हा उपाय तयार झालेला आहे.
या तेलाने आपण नियमितपणे आंघोळ केल्याने तुम्हाला नेहमी ताजेतवाने वाटेल. प्रत्येक कामामध्ये मन लागेल आणि तुम्ही जे कार्य हाती घ्याल ते कार्यामध्ये नेहमी तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला वेगवेगळ्या मार्गाने धनाचे योग तर येतीलच पण त्याच बरोबर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव सुद्धा नांदू लागणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले जीवन समृद्ध बनवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.