या गोष्टी आयुष्यात नेहमी गुप्त ठेवा; नाहीतर आयुष्यात सतत रडत बसावे लागेल.!

अध्यात्म

गुरु चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीति च्या द्वारे चाणक्य नीती या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे आणि या चाणक्य नीति मध्ये अनेक असे काही अनुभव सांगितले आहेत जे अनुभव मानवी जीवनासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतात. जेव्हा एखादा व्यक्ती आयुष्य जगत असतो तेव्हा त्याच्या वाटेला अनेक दुःख संकटे येत असतात परंतु या संकटातून कशा पद्धतीने मुक्तता मिळावी.

या सर्वांची माहिती नीती ग्रंथांमध्ये देण्यात आलेली आहे व त्याचबरोबर चाणक्य गुरू यांना भारतातील सर्व विद्वाना पैकी एक महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे त्यांच्या निती तत्वाच्या सहाय्याने अनेक व्यक्तींनी आपले जीवन सुखकर बनवलेले आहे आणि आज अनेक व्यक्ती त्यांच्या मार्गदर्शनाने पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. गुरु चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्र मध्ये सांगितले आहे की ,या चार गोष्टी मानवाने कोणालाच नाही सांगायला पाहिजे. त्या चार गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत. हे आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

त्यातील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अपमान.आपला आपला झालेला अपमान कधीच कुणाला सांगू नका कारण की अनेक लोकांना सवय असते की आपल्या वाईट गोष्टी रडून ऐकत असतात आणि त्याच गोष्टी नंतर इतरांना हसत सांगत असतात म्हणून आपले दुःख अपमान इतरांना कधीच सांगू नका. अनेकदा आपण आपला झालेला अपमान इतरांना सांगत असतो परंतु अशावेळी लोक अनेकदा आपली चेष्टा सुद्धा करू लागतात आणि म्हणूनच आपल्या चांगल्या गोष्टी इतरांना सांगा.

आपला झालेला अपमान एक वाईट स्वप्न म्हणून समजून विसरून जा आणि या अपमानाचा जास्त विचार सुद्धा करू नका यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकणार आहे म्हणूनच आपल्या झालेला अपमान हा इतरांना सांगण्यापेक्षा त्या अपमानातून आपल्याला काय शिकायला मिळाले आहे या गोष्टीवर भर द्या. इतरांना आपला झालेला अपमान सांगणे म्हणजे आपलीच पोल खोलने सारखी असते म्हणून झालेला अपमान कधीच कुणाला सांगू नका.

हे वाचा:   महिलांनी रविवार च्या दिवशी करा या फळाचे दान; घर राहील नेहमी पैश्यानी भरलेले.!

दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या परिवारातील काही गुप्त गोष्टी इतरांना कधीच सांगू नये. अनेकदा आपण आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी इतरांना सांगत असतो आणि या गोष्टी बाहेरच्या व्यक्तींना जेव्हा कळतात तेव्हा बाहेरच्या व्यक्तीमुळे आपल्या घरामध्ये फूट निर्माण होऊ शकते. बाहेरच्या व्यक्ती या गोष्टींच्या आधारे आपल्या घरात भांडणे, वाद लावू शकतात म्हणूनच आपल्या घरातल्या लहान लहान गोष्टी सुद्धा इतरांना सांगू नये.

त्या गुप्त ठेवाव्यात विशेष करून आपल्या घरातील स्त्रिया यांच्या चरित्र विषयी कधीच कोणाकडे चर्चा करू नका कारण की जर आपण आपल्या स्त्रीचे चरित्र विषयी इतरांकडे चर्चा केली तर लोकांचा दृष्टिकोन सुद्धा आपल्या परिवाराकडे बघण्याचा बदलून जातो आणि त्याचा विपरीत परिणाम सुद्धा कुटुंबावर होऊ शकतो म्हणून या सर्व गोष्टी शक्यतो गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मनातील छोट्या गोष्टी व दुःख कुणाला जास्त शेअर करू नका.

आपल्यापैकी अनेकांना सवय असते की छोटे छोटे दुःख सुद्धा आपण इतरांना शेअर करत असतो. अनेकदा आपल्याला असे वाटते की हे दुःख इतरांना सांगितल्यावर आपल्याला मोकळे वाटते परंतु जेव्हा आपण हे दुःख इतरांना सांगत असतो तेव्हा त्याचा त्रास आपल्याला जास्त होत असतो कारण की लोक तुमचे दुःख रडू न एकत असतात आणि तेच दुःख इतरांना हसत सांगत असतात. तुमच्या दुःखांची चेष्टा करत असतात आणि त्याचा विपरीत परिणाम तुमच्या जीवनावर सुद्धा होऊ शकतो म्हणून तुमचे जे काही छोट्या-छोट्या दुःख आहे ते इतरांना सांगणं ऐवजी या दुःखातून आपल्याला कशा पद्धतीने बाहेर पडता येईल याचे आत्मचिंतन करायला हवे.

आपले दुःख फक्त आपल्या जवळच्या मित्रांना व नातेवाईकांना सांगा जेणेकरून त्यांच्या मदतीने तुमचे दुःख कमी होऊ शकते. प्रत्येक नातेवाईक व मित्राकडे तुमचे दुःख व्यक्त करत बसू नका कारण की त्यांच्याकडे एवढा वेळ सुद्धा नसतो की ते तुमचे दुःख समजू शकतील कारण की त्यांच्या जीवनामध्ये आधीच एवढे दुःख असते त्यात तुमच्या दुःखाचे भर कशाला म्हणून तुमचे दुःख योग्य व्यक्तीकडेच व्यक्त करा.

हे वाचा:   23 जुलै मोठी गुरुपौर्णिमा: इथे गुपचूप फेका 1 लवंग..24 तासात चमत्कार पहा..वेगवेगळ्या मार्गांनी घरात धन येईल..सर्व रोग आ'जार त्वरित बरे होतील !

जर तुमच्याकडे पैसा नसेल तर आर्थिक समस्या वारंवार येत असेल तर अशा वेळी तुमच्या अडचणी इतरांना सांगू नका कारण की सध्याच्या दिवसांमध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तोच बलवान आहे. ज्याच्याकडे पैसा नाही त्याच्याकडे लोक तूच्छ नजरेने पाहत असतात, त्या व्यक्तीला जास्त आदर सन्मान करत नसतात आणि म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आर्थिक समस्या वारंवार येत असतील अडचणी खूप मोठ्या प्रमाणावर असेल तर त्या अडचणींचा सामना करावा परंतु त्या अडचणी इतरांना सांगत बसू नका अन्यथा त्या अडचणींमध्ये वाढ होतील.

जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची संकटे येतील तेव्हा या संकटांना धीराने सामोरे जा कारण की जेव्हा आपण या संकटांना धीराने सामोरे जातो तेव्हाच ही संकट कमी होत असतात भावनिक दृष्ट्या निर्णय घेण्याऐवजी प्रत्यक्ष दृष्ट्या निर्णय घ्या आणि आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवर मात करा तरच तुमचे जीवन आनंदी व सुखी होऊ शकेल तर या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्याच या शास्त्रामध्ये चाणक्य यांनी सांगितल्या होत्या जर तुम्ही या गोष्टींचा वापर तुमच्या जीवनामध्ये कराल तर तुमचे जीवन नेहमी सुखी व आनंदी राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.