दैनंदिन जीवनात आपण नित्यनेमाने काही गोष्टी करीत असतो.स्नान आपल्या जीवनात अविभाज्य घटक बनलेला असतो. आपल्या ऋषी-मुनींनी पूर्वजांनी आपल्याला दैनंदिन जीवनात कसे वागावे? काय करावे? काय करू नये? कोणते कार्य करावे हे विविध धर्मग्रंथांत मधून त्यांच्या शिकवणीतून आणि वागणुकीतून आपल्याला सांगून ठेवले आहे आणि त्याप्रमाणे आपण आपले जीवन बनवलेले आहे परंतु या सर्व गोष्टींमध्ये काही अर्थ दडलेला आहे पण आपण सगळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो त्यामागील शास्त्र समजून घेत नाही.
सर्वजण आपल्या पद्धतीने पद्धतीने आपले जीवन चालवत असतो.या बाबींचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या पूर्वजांनी साधू संतांनी आपल्या वरचे संस्कार केले आणि सांगितले आहे आणि काही सवय आपल्याला लावले आहे, त्या सर्व सवयी आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी खूपच लाभदायक आहे त्यातीलच एक गोष्ट म्हणजे स्नान करणे.
हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे यामुळे आपले शरीर स्वच्छ होते त्याबरोबर आपले मनही प्रसन्न होते.स्नान केल्याने आपल्याला खूप फायदे होतात. हे तर आपण जाणतोच शास्त्रानुसार स्नान हे उत्तम आणि महत्त्वाचे कार्य आहे परंतु आपल्याला हे माहीत आहे का स्नान करण्यासाठी ची एक विशिष्ट वेळ आणि विशिष्ट पद्धत असते आपल्याला हे माहीत नसते आणि आपण आपल्या मनात येईल आपल्याला वेळ मिळेल त्यावेळी स्नान करतो परंतु आपली ही सवय चुकीचे आहे. कधीही कोणत्याही वेळी स्नान केल्याने त्याचा आपल्याला फायदा तर होत नाहीच उलट नुकसान होते.
आपला धर्म ग्रंथ व गरुड पुराणात आपल्या जीवनाशी संबंधित सर्व बाबींचा उल्लेख केलेला आहे. जन्मापासून ते मरेपर्यंत प्रत्येक गोष्टींचे मृत्यू बरोबरच धर्म संस्कार या सर्वांबद्दल खूप महत्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की स्नान करण्याची नेमकी कोणती वेळ योग्य आहे.स्नान चे कोणकोणते प्रकार आहेत. काय फायदे आहे. स्नानाचे कोण कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया..
शास्त्रामध्ये स्नानाचे पाच प्रकार आहेत त्यातील पहिला प्रकार आहे ब्रह्म मुहूर्तावर केलेले स्नान. देव स्नान, ऋषी स्नान ,मनुष्य स्नान,दानव स्नान असे स्नानाचे पाच प्रकार पडतात. या सर्व प्रकारांनी त्यांच्या वेळेनुसार वर्गवारी केलेली आहे. गरुड पुराणानुसार ब्रह्म मुहूर्तावर केले जाणारे स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि ब्रह्म मुहूर्त म्हणजेच पहाटे तीन ते पाच या काळातील म्हणजे ब्रह्म मुहूर्त वेळ मानली जाते.
स्नान सकाळचे ब्रह्मा मुहूर्ताची वेळ असेल तर शुभ मानले जाते आणि त्या वेळेला स्नान केले तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला शुभ प्राप्त होत असते. या वेळी स्नान करून लगेच आपल्याला जीवनात सुखसमृद्धी ऐश्वर्याचे प्राप्ती होते. दिवसभर आपले शरीर व मन सकारात्मक भरलेले उत्साही व प्रसन्न राहते.सकाळी 4 ते 5 या वेळेत देव स्नान केले जाते त्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात.
सर्व पवित्र नदी चे ध्यान करून जर आपण या वेळी स्नान केले तर आपण केलेले देवस्नान अत्यंत पवित्र मानले जाते. या वेळी स्नान केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक उर्जेचा वास निर्माण होतो. आपल्या शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता तसेच अस्वच्छता निघून जाते. आपल्या शरीराबरोबरच मनही प्रसन्न होते. सकाळी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी अशा वेळी स्नान केले जाते त्यास देव स्नान जाते ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात हे स्नान केल्याने आपल्या मनाला शांतता प्राप्त होते त्यानंतर चे स्नान हे मनुष्य स्नान म्हणून ओळखले जाते.प्रामुख्याने सूर्य उदय झाल्यानंतर केले जाते.
सकाळी सहा ते आठ च्या दरम्यान केल्या जाणार्या स्नानाला मनुष्य स्नान म्हणतात. हेच सूर्योदयाच्या वेळी सूर्योदय झाल्यानंतर स्नान केल्यामुळे आपल्या शरीरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारते त्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यात उत्साह येतो. सकाळी उशिरा स्नान करणे आपल्या शास्त्रात खूप चुकीचे मानले गेले आहे.सकाळी आठच्या नंतर जे स्नान केले जाते त्याची राक्षस म्हणजे दानव स्नान असे मानले जाते. जेव्हा आपण सकाळी आठच्या नंतर स्नान करत असतो अशावेळी वातावरणामुळे दैवी शक्ती फारशा उपलब्ध नसतात आणि या वेळी जे स्नान केले जाते त्यामध्ये आपल्याला फारसा फायदा सुद्धा होत नाही.
ज्यामुळे आपल्याला दिवसभर कंटाळवाणा आणि आळस येत असतो. शरीरामध्ये आळशीपणा जाणवतो आणि कोणतेही कार्य व्यवस्थित नीट होत नाही म्हणून सकाळी आठ वाजल्या नंतर कधीही स्नान करू नये. ज्या स्त्रिया सकाळी आठ वाजल्यानंतर स्नान करतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी दुर्भाग्य राहते. अशा स्त्रियांच्या घरातून समृद्धी सुखशांती लगेच निघून जाते. आपल्यापैकी काही जण असे आहेत की ते दुपारी बाराच्या नंतर स्नान करत असतात जर तुम्ही सुद्धा दुपारी बाराच्या नंतर स्नान करत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप संकटे येऊ शकतात तुम्हाला नेहमी अपयश येऊ शकते म्हणून शक्यतो सकाळी लवकर उठा नंतरच स्नान करायला हवे आणि आपले जीवन समृद्ध करायला हवे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.