हे काम केल्याने मिळत असतो कुत्र्याचा जन्म; पहा काय आहे यामागील खरं सत्य.!

अध्यात्म

जन्म आहे म्हणजे मृत्यू ही आहे आणि मृत्य आहे म्हणजे हा जन्म सुद्धा आहे. असे हे जन्म मरणाचे चक्र अविरत चालू असते. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पुढील जन्मात कशाचा जन्म मिळेल ते ठरते कि कोणते कर्म केल्यामुळे मनुष्याला कुत्रा जन्म प्राप्त होतो या बद्दल एक कथा प्रचलित आहे. एके दिवशी श्री राम दरबारात बसले असतात आणि दारावर कुत्रा येऊन रडू लागला.

त्याला रडताना पाहून श्रीराम यांनी आ तील एका सेवकाला बाहेर जाऊन पाहण्यास सांगितले काय त्रास आहे हे जाणून घेण्यास सांगितले आणि कुत्र्यास हाकलून द्यायला सांगितले परंतु कुत्रा पुन्हा दुसऱ्या दिवशी आला आणि रडू लागला असे तो पुन्हा पुन्हा करू लागला आणि एके दिवशी श्रीरामाने कुत्र्याला दरबारामध्ये येण्यास सांगितले परंतु कुत्रा यांनी सांगितले की मी कुत्रा म्हणून जन्माला आलेला आहे आणि माझा जन्म एका नीच योनी मध्ये झालेला आहे आणि यामुळे मला मंदिर प्रार्थनास्थळे, जिथे चांगले कर्म होते, नदी किनारी अशा ठिकाणी मला येण्यास बंदी आहे तर तुम्ही स्वतः श्रीराम यांना सांगा की तुम्ही मला येऊन भेटा असा निरोप दास जवळ देता श्रीराम कुत्र्याला भेटण्यास बाहेर आले.

कुत्रा रडत असतो आणि त्याची विनवणी ऐकून श्रीराम त्यांना विचारले काय झाले ..तेव्हा तो कुत्रा सांगतो की संन्यासाच्या मुलाने मला दगडाने मारले. माझी काहीही चुक नसताना त्याने मला दगड मारला आणि ही बातमी कळल्यानंतर श्रीराम यांनी संन्यासाच्या मुलाला बोलावले आणि दगड मारण्याचे कारण सुद्धा विचारले.

तेव्हा संन्यासाच्या मुलाने सांगितले की मी माझी भिक्षा घेऊन घरी परतत होतो आणि मला प्रचंड प्रमाणामध्ये भूक लागली होती परंतु माझ्या जवळील चपाती चा तुकडा खाली पडताच त्या कुत्राने जोरात तुकडा पळवण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळी ती चपाती त्याच्याकडून मिळवण्यासाठी मी दगड मारला. अशावेळी श्रीराम म्हणाले की कुत्रा हा मुका प्राणी आहे त्याला काही कळत नाही पण तू तर समजदार आहे. त्याला भूक लागली असेल म्हणून त्याने चपाती पळवण्याचा प्रयत्न केला असेल.

हे वाचा:   मांजर आडव जाणे शुभ की अशुभ? काय असतात संकेत एकदा नक्कीच वाचा महत्वपूर्ण अशी माहिती ......!!

ज्या पद्धतीने तुला भूक लागली होती तू मनुष्य जन्माला आला असता तरी तुझ्या कडे बुद्धी आहे परंतु कुत्रा हा प्राणी जन्माला आलेला आहे त्याला फारसे काही समजत नसते अशावेळी तुझी चूक आहे. तू कुत्र्याला दगड मारला नाही पाहिजे होता. त्यानंतर श्रीराम यांनी कुत्र्याला विचारले की मी तुम्हाला शिक्षा करू शकत नाही परंतु तुम्ही संन्यासाला शिक्षा देऊ शकता.

अशावेळी कुत्रा म्हणाला की या सन्यासाला सांगा तुम्ही महादेव मंदिराचा संन्यासी बनवा, तेथील पुजारी बनवा आणि श्रीराम यांना कुत्र्याचे म्हणणे पटले आणि त्यांनी पुजारीला नवीन कपडे देऊन मंदिराचे पुजारी पद दिले परंतु दिलेल्या या शिक्षा बद्दल जेव्हा श्रीराम दरबारात आले तेव्हा सेवकांनी त्याला विचारले की हे कशा प्रकारची शिक्षा यामुळे तर महंत खुश झाला तर अशावेळी श्रीराम यांनी सेवकांना सांगितले की या बद्दल तुम्ही कुत्रालाच विचारा तेव्हा सेवा कुत्र्याला विचारायला गेले.

तेव्हा कुत्र्याने त्यांना सांगितले की जे व्यक्ती चुकीचे कर्म करतात ,जे व्यक्ती चोरी मिळालेले धन आपल्याजवळ ठेवतात व धन परत करत नसतात ते सगळे जण शेवटी महादेवाच्या मंदिरा मध्ये एकत्र येत असतात आणि अनेक जण या ठिकाणी आल्यानंतर वेगवेगळे पापकर्म करण्यासाठी पुढे येत असतात. मी ही गेल्या जन्मी एका महादेवाच्या मंदिराचा पूजा मठ चा अधिपती महंत होतो.

हे वाचा:   बायकोला गिफ्ट म्हणून ही 1 वस्तू कधीही देऊ नका नाहीतर होईल खूप मोठा पच्छाताप.!

परंतु माझ्या हातून अनेक मोठ्या मोठ्या चुका होत गेल्या आणि मी अनेक पापाचा धनी होत गेलो म्हणूनच मी संन्यासाला अशी शिक्षा दिली आणि संन्यासी जेव्हा महादेव मंदिराचा मठाधिपती झाला त्यानंतर त्याने अशी काही पापकर्म केली त्यामुळे त्याचा जन्म पुढचा जन्मी मध्ये कुत्रा रुपी झाला म्हणूनच कर्म गती आपल्याला नेहमी योग्य फळ देत असते आणि कुठे कुत्रा आणि कुठे संन्यासी..या दोघांच्या जन्मातील हा फरक आपल्याला नक्कीच धडा शिकवून जातो.

याचा अर्थ असा की मानव जे काही कर्म करत असतो त्या कर्माचे फळ त्याला ह्या जन्मात तरी भोगावे लागतात किंवा पुढच्या जन्मात तरी भोगावे लागत असतात म्हणुन मनुष्याने कर्म करताना चांगले कर्म करायला हवे कारण की चांगले कर्म केले तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला चांगले प्राप्त होत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.