यावेळी आरशात चुकूनही पाहू नका; नाहीतर घडेल असे काही कि आयुष्यभर पच्छाताप करण्याची वेळ येईल.!

अध्यात्म

जर तुम्हाला तासन्तास आरश्यासमोर बसून साजण्याची सवय असेल तर तर आजच्या लेखामध्ये माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हीही सवय लगेच सोडून देणार आहे. आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये अशी काही माहिती सांगण्यात आलेली आहे त्या माहितीचा उपयोग आपल्या जीवनाशी मानला गेलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की घराची सजावट करत असताना फार पूर्वीपासून आरसा चा वापर केला जातो.

आपल्या घरातील बेडरूम असो किंवा हॉल असुदे अशा ठिकाणी जर आपण आरसा लावला तर त्या जागेचे महत्त्व वाढते ती जागा सुंदर दिसू लागते. आरसा ही काचेची वस्तू आहे. या मध्ये पाहून आपण स्वतःचे रूप न्याहाळत असतो. आपल्या सौंदर्याचे कौतुक करत असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? चुकीच्या पद्धतीने आरशामध्ये पाहिल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे अपघात दुःख दारिद्र सुद्धा येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया आरसा कशा पद्धतीने पाहू नये त्याबद्दल..

वास्तुशास्त्रानुसार आरशात जास्त वेळ पाहत बसू नये. नकारात्मक ऊर्जा यात खूप असते याचे कारण बनतो.रात्रीच्या वेळी सुद्धा आसपास कोणी नसताना आरशात पाहू नये कारण की आरसा आपले रूप तर दाखवतोच परंतु रात्रीच्या वेळी आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जा समाविष्ट होत असते. रात्री आरशामध्ये पाहिल्याने नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये परावर्तित होत असते. यामध्ये वाईट शक्तीचा संचार मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने या वाईट शक्ती आपल्यावर प्रभाव निर्माण करू शकतात व आपल्याला या गोष्टीमुळे सुद्धा त्रास होऊ शकतो म्हणून रात्रीच्या वेळी कधीही आरसा पाहू नये.

हे वाचा:   चांदीच्या ह्या ५ वस्तू ज्या घरात असतात; ते होतात करोडपती ! लवकर घेवून घ्या चांदीची यातील एक वस्तु..श्रीमंत/धनप्राप्ती उपाय

वास्तुशास्त्र असे सांगते की आरसा आपले रूप उठावदार दिसण्यासाठी मदत करत असतो पण त्याचबरोबर आपले भाग्य दुर्भाग्यमध्ये बदलण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरत असतो. आरशात पाहणे संबंधित एखादी चूक झाल्यास आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा लावलेला असतो परंतु आपल्या बेडरूम मध्ये चुकून सुद्धा आरसा लावू नये.जर लावलेला असेल तर अशा ठिकाणी लावा जेणेकरून सकाळी उठल्यावर आपला चेहरा त्या आरसा मध्ये दिसणार नाही. सकाळी उठल्यानंतर आरसा दिसणे अत्यंत अशुभ मानले जाते.

असे म्हणतात की आरसाच्या समोर येणाऱ्या अशुभ शक्ती आपल्याला बघत असतात. आणि त्या आपल्याला प्रभावी सुद्धा करू शकतात. यामुळे तुमच्या आसपास वाईट शक्ती असल्याचा तुम्हाला आभास सुद्धा होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी खूपच घातक ठरू शकतात म्हणून वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर रात्री झोपताना त्या आरशाला पडदा अवश्य लावून ठेवा व पडदा नसेल तर अशा वेळी तो एखाद्या कपड्याच्या साहाय्याने झाकून ठेवा जेणेकरून त्या आरशावर तुमची नजर पडणार नाही यामुळे नकारात्मक ऊर्जेची भीती सुद्धा राहणार नाही.

तूटलेला व तडा गेलेला आरसा घरामध्ये कधीच ठेवू नये नाहीतर तुमच्या नुकसानीचे कारण तुम्ही स्वतः ठरवू शकता. तूटलेला आरसा घरामध्ये ठेवल्यास एखाद्या भयंकर दुर्घटनेचे तुम्ही कारण ठरू शकतात म्हणून तूटलेला आरसा कितीही महाग व सुंदर असेल तर तो लगेच फेकून द्यावा.जर तुम्हाला तुमचे भाग्य संपवायचे असेल तर सकाळी उठल्याउठल्या कधीच आरसा पाहू नये.

हे वाचा:   पाल देते मृत्यूचे संकेत...पाल याठिकाणी पडली तर घरातील सर्व व्यक्तींचा मृ त्यू होऊ शकतो व घर नाश पावतो

नेहमी सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करायला हवे आणि या देवाच्या नामस्मरणानेच आपली सकाळची सुरुवात करायला हवी यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. आपल्या घरामध्ये आरसा लावताना उत्तर दिशा पूर्व दिशा किंवा उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य दिशा आरसा लावण्यासाठी अत्यंत शुभ मानली गेलेली आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. वास्तुशास्त्रानुसार गोल किंवा अंडा कृतीसह असलेला आरसा अशुभ मानला गेलेला आहे.

म्हणून चौकोनी किंवा आयताकृती आरशाचा वापर नेहमी करावा. घरातील दक्षिण व पश्चिम दिशेला कधीच आरसा लावू नये त्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख अडचणी व अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. आरशावर कधीच धूळ माती जमा होऊ देऊ नये. जर घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला टॉयलेट किंवा बाथरूम बनवले असेल तर अशावेळी भिंतीवर चौकोनी कृती असलेला आरसा पूर्व दिशेच्या भिंतीला लावलेल्या आरश्या मुळे संपूर्ण दोष दूर होऊन जातात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.