जर आपल्या जीवनामध्ये आनंदी सुखी राहायचे असेल तर या चार व्यक्तींपासून नेहमी लांब राहा अन्यथा तुमच्या जीवनामध्ये नेहमी अडचणी संकटे वाढत राहतील. अनेक वेळा आपण आपल्या मनातली गोष्ट एखाद्या व्यक्तीकडे व्यक्त करत असतो त्या व्यक्तीला सगळ्या घटना सांगत असतो परंतु अशा वेळी एखादी व्यक्ती आपले म्हणणे पूर्णपणे ऐकून घेत नाही व आपल्या म्हणण्याला फारसे महत्त्व देत नाही.
अनेकदा तुम्ही एकमेकांशी चांगले वागता परंतु जेव्हा तुम्ही काहीतरी सांगायला जातात तेव्हा ती व्यक्ती तुमचे काही ऐकत नाही. तुमच्या म्हणन्याकडे फारसे लक्ष देत नाही. तर समजून घ्या अशी व्यक्ती तुम्हाला जीवनामध्ये धोका देईल. अशा व्यक्तीपासून नेहमी लांब राहा व त्याचबरोबर या व्यक्ती जेवढ्या तुमच्याशी काही गोष्टी शेअर करतात तेवढ्याच गोष्टी तुझ्यासोबत त्यांच्याशी शेअर करा,जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नका.
आपले वैयक्तिक गोष्टी त्यांना सांगू नका त्याचबरोबर जर तुम्ही त्यांना अशी एखादी गोष्ट सांगितली इतरांना कोणालाच माहिती नाही फक्त त्यांना माहिती आहे तर अशावेळी त्या गोष्टीचा चुकीचा उपयोग सुद्धा अशा प्रकारचे व्यक्ती करू शकतात. जी व्यक्ती तुमच्याकडून नेहमी मदत मागत असते. नेहमी मदतीची अपेक्षा करत असते अशा व्यक्ती पासून सुद्धा तुम्ही नेहमी लांबच राहा.
जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या व्यक्तींना मदत करतात आणि जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात मदतीची गरज असते अशावेळी ती व्यक्ती तुम्हाला अजिबात मदत करत नाही. अशा व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये चांगले मित्र कधीच बनू शकत नाही. अशा प्रकारच्या व्यक्ती तुमच्या सोबत जो पर्यंत असतात तोपर्यंत तुम्ही त्यांना मदत करतात त्यानंतर अशा प्रकारची व्यक्ती तुम्हाला विचारत सुद्धा नाहीत.
जे व्यक्ती आपले आहे अशा व्यक्ती आपल्या संकटामध्ये दुःखामध्ये नेहमी धावून येत असतात. आपण ज्यांच्याजवळ काही मागितले तरी आपल्या संकटांमध्ये नेहमी मदत करत असतात. ज्या व्यक्ती तुमच्याकडून नेहमी मदतीची अपेक्षा करत असतात आणि तुम्हाला गरज असेल तेव्हा पळ काढतात अशा व्यक्तीपासून नेहमी लांबच राहिला पाहिजे. ज्या व्यक्ती नेहमी आपल्या पैशाबद्दल व आपल्या पदाबद्दल नेहमी सांगत असतात अशा व्यक्तीपासून सुद्धा लांब राहायला पाहिजे. अशा प्रकारचे व्यक्ती जरी तुमच्यासमोर चांगले वागत असतील परंतु तुमच्या पाठीमागे नेहमी त्यांच्या मनामध्ये वाईट विचार असतात.
ते नेहमी स्वतःला तुमच्यापेक्षा श्रीमंत समजत असतात. तुमच्यापेक्षा सामर्थ शाली समजत असतात, अशा ठिकाणी कधी जाऊ नये ज्या ठिकाणी काही व्यक्ती स्वतःची होऊन जाण्यात रममान असतात,स्वतःचे कौतुक ते नेहमी करत असतात अशा ठिकाणी चुकून सुद्धा जाऊ नये. अशा प्रकारच्या व्यक्ती पासून लांब राहायला पाहिजे. ज्या व्यक्ती तुमची नेहमी चेष्टा करत असतात.तुम्हाला नेहमी काही ना काही बोलत असतील अशा व्यक्तीपासून नेहमी लांबच राहायला पाहिजे.
मित्र-मैत्रिणी मध्ये जेव्हा आपण असतो अशावेळी चेष्टा करणे सहज असते परंतु जर एखादी व्यक्ती नेहमी आपली चारचौघांसमोर चेष्टामस्करी करत असेल तर अशावेळी आपल्या मनामध्ये अपमानाची भावना निर्माण होत असते आणि अशा प्रकारची व्यक्ती आपल्याला नेहमी कमी समजत असते आणि यामुळे ती व्यक्ती आपली चारचौघांसमोर चेष्टा करत असते.
नेहमी केलेलाच असल्यामुळे त्या व्यक्तीचे म्हणजे आपल्याला खरेच पटू लागते व कालांतराने आपला आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ लागतो म्हणून अशा व्यक्तीपासून सुद्धा नेहमी लांब राहायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असतात त्या व्यक्ती अगदी लहान मुलांसारखे वागत असतात.काहीही कुठे बोलत असतात त्यांना काही भान नसतो अशा व्यक्तींना आपल्यासोबत कुठेही घेऊन जाऊ नका यामुळे तुमचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ शकतो त्यांच्या बोलण्यामुळे चारचौघांमध्ये तुमची शोभा सुद्धा होऊ शकते. अशी व्यक्ती सगळ्यांसमोर काहीतरी बोलून जाईल आणि यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल किंवा सगळ्यांची माफी सुद्धा मागावी लागेल म्हणून अशा प्रकारच्या व्यक्ती पासून सुद्धा लांब राहायला पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.