बदलती जीवनशैली आणि बदललेला आहार यामुळे आपण दिवसभरामध्ये अनेक वेळा वेगवेगळे पदार्थ खात असतो परंतु अनेकदा या सर्व पदार्थांमुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्याचे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम सुद्धा होत असतात. अनेकदा शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली की तिचे परिणाम शरीरावर दिसून येत असतात त्यातच तोंडात ,ओठावर फोड येणे ,पुरळ येणे काही खाताना हिरड्यांची आग होते तिखट खारट आंबट ढेकरमुळे बेचव जिभेला सुद्धा पदार्थ खायला होत नाही.
तोंडात आंबट पाणी शुद्ध स्वरूपातील पित्ताचा संचय वाढत जातो ज्यामुळे अपचनाच्या तक्रारी उद्भवत असतात आणि पित्ताचा त्रास या दोन्ही वर रामबाण उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्वंदाची पाने वापरायचे आहे. जास्वंदाचे पाने आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहेत.
जास्वंदीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्त्वे उपलब्ध असतात त्याचबरोबर एंटीऑक्सीडेंट गुणधर्म सुद्धा या पानांमध्ये असतात त्याचबरोबर ही पाने विटामिन सी चा मोठा स्रोत मानले जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्या जास्वंदाची स्वच्छ पाने घ्यायची आहेत आणि ते पाने मीठ टाकून स्वच्छ करायचे आहे,जेणेकरून या पानांवर तर कोणत्याही प्रकारची धूळ असली असेल तर मिठाच्या पाण्याने ती धूळ व विषारी घटक निघून जातील.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पानाच्या सोबत खडीसाखर चावून-चावून खायची आहे आणि याचा पूर्ण रस आपल्या पोटामध्ये घ्यायचेआहे. हा उपाय केल्याने तुम्हाला तोंड येण्याची समस्या असेल त्याचबरोबर शरीरामध्ये पित्ताची समस्या असेल तर पित्ताचे वेग वेगळे आजार समस्या सुद्धा पूर्णपणे निघून जाणार आहे.
हा उपाय आपल्याला तीन दिवस करायचा आहे आणि रोज सकाळी उपाशीपोटी हे पान चावून चावून खायचे आहे आणि या पानाचे रस बाहेर फेकून न देता गिळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हा अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक पडणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपल्या आरोग्य जपा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.