रायबा तान्हाजी मालुसरे यांचे पुढे काय झाले.? ९९% लोकांना माहित नसलेला इतिहास.!

ट्रेंडिंग

मध्ययुगामध्ये भारत हा पर-राष्ट्रांचा गुलाम होत चालला होता. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, पोर्तुगीज तथा ब्रिटिश भारताला लूटत होते. महाराष्ट्रात आदिल, निजाम,मुघल तथा ब्रिटिश राज्य करत होते त्यांच्या त्रासाने महाराष्ट्रातील प्रजा त्रस्त झाली होती प्रजेला कोणीच वाली उरला नव्हता अश्या परिस्थितीत जिजाऊ-शहाजीराजे यांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुठभर मावळे घेवून स्वराज्याची स्थपना केली.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या संग्रामत बाजीप्रभू, मुरारबाजी, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे अशा अनेक निष्ठावंत मावळ्यांची साथ लाभली, यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले आणि इतिहासात आपले नाव अजरामर करुन घेतले. आज आपण बोलणार आहोत अश्याच एका शूरविर निर्भीड तानाजी मालुसरे यांबद्दल.

कोंढाणा किल्ला काबीज करताना उदेभानसह सिंहासारखा लढताना धारातिर्थी पडलेला तानाजी मालुसरे यांना आपण सगळेच जाणता परंतू त्यांच्या ‘मृ’त्यू’ नंतर नक्की काय घडल ह्याचा इतिहास खूप कमी लोकं जाणतात आज आम्ही तुम्हाला याबद्दलच थोडी माहिती देणार आहोत. तानाजी मालुसरे धारातिर्थी पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी माता जिजाऊ सोबत स्व:ता उमरठला जावून तानाजी यांचे पुत्र रायबा याचे लग्न लावून दिले.

हे वाचा:   नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून धक्काच बसेल.!

त्यांनतर इस.1674 साली महाराजांनी गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर अगदी दूर असा एक किल्ला बांधला बाजूला घनदाट जंगल आणि समुद्रकिनारा असल्यामुळे हा किल्ला तसा भक्कम होता. हा किल्ला स्वराज्यापासून तसा खूप दूर होता म्हणूनच राजांनी या किल्याला ‘पारगड’ असे नाव दिले. तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांना या किल्याचा किल्लेदार घोषित केले गेले. तथा मार्गदर्शनासाठी शेलारमामा यांना रायबासोबत ठेवले गेले.

नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मुघलांकडून अनेक आक्रमण या किल्यावर करण्यात आले मात्र मावळ्यांनी कोणत्याही आक्रमणाला दाद दिली नाही व गड अजिंक्य ठेवला. या गडाची निर्मिती गोव्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी केली गेली होती. रायबा मालुसरे यांना जेव्हा किल्लेदारी दिली गेली होती तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांकडून एक राज-आज्ञा मिळाली होती आणि ती म्हणजे जो पर्यंत चंद्र-सुर्य आहेत तोपर्यंत गड जागता ठेवा. मित्रांनो ही महाराजांची राज-आज्ञा तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनी आज ही राज-आज्ञा पाळलेली आहे आज 300-400 वर्षांनंतरही पारगड हा एक जागता गड आहे.

हे वाचा:   जेव्हा स्वर्गाची अप्सरा उर्वशीने पतीला न ग्न पहिल्याने तिच्यासोबत काय घडले बघा...यामुळे तिला रात्री

तानाजी मालुसरे यांचे एकरावे वंशज म्हणजेच बाळकृष्ण मालुसरे आज पारगडावर किल्लेदाराची भुमिका बजावतात. शेलार मामा यांचे वंशज कोंडीबा शेलार, गडावर झेंडे लावणारे यांचे वंशज बळवंत झेंडे तथा तोफ खाण्याचे प्रमुख शांताराम शिंदे यांचे वंशज मालोजी शिंदे अजूनही या किल्यावर अजूनही वास्तव्य करतात.

आज ही आपले गड-किल्ले आपल्या इतिहासाला जिवंत ठेवून आहेत. आज ही आपण गडावर गेल्यास तिथला परिसर पाहून आपली मन अभिमानाने उंचावते. आपण गडावर गेल्यास तिथल्या भिंतीवर कोणत्या ही प्रकारची नावे लिहू नका तथा तिथल्या परिसरात आपण कचरा पसरवू नका. आपल्या गड-किल्यांच संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच ”किल्ले वाचवा आपला इतिहास वाचवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.