वास्तू शास्त्रानुसार प्रत्येक वस्तू आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो. प्रत्येक वस्तू आपल्या जीवनामध्ये सकारात्मक तसेच नकारात्मक बदल घडवत असते. आपल्या घरातील एक महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे घड्याळ. या वस्तूचा आपल्या जीवनावर खूप महत्त्वाचा प्रभाव असतो,त्या वस्तूच्या सहाय्याने आपण आपला दिनक्रम व्यतीत करत असतो. चिनी वास्तुशास्त्रानुसार घड्याळ ही अशी एकमेव वस्तू आहे जी आपल्या जीवनावर सरळ सरळ प्रभाव पाडत असते.
आपल्या जीवनामध्ये चांगली वेळ किंवा वाईट वेळ आणू शकतो. आपण अनेकदा एक म्हण वापरत असतो काय करणार माझी सध्या वेळेच वाईट चालू आहे असे म्हणत असतो. ज्योतिषशास्त्र वास्तूशास्त्र च्या मदतीने आपण आपलीच वाईट चाललेली वेळ चांगल्या वेळेमध्ये बदलू शकतो. भिंतीवर लावलेली घड्याळ आपल्याला वेळ दाखवतेच पण त्याच बरोबर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी सुद्धा दर्शवित असते.
घड्याळ नेहमी चालत असते आणि कधीही न थांबण्याचा सकारात्मक संदेश घड्याळ आपल्याला देत असते म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. तुमच्या घरा मध्ये घड्याळ बंद झालेली असेल तर अशा वेळी ते दुरुस्त करावी किंवा बदलून टाकावी. बंद पडलेली घड्याळ आपल्या घरात ठेवले तर यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात.
बंद पडलेले घड्याळ घरामध्ये ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आणि याच नकारात्मक यामुळे आपले जीवन सुद्धा नकारात्मक होऊन जाते. भिंतीवरील घड्याळ हे नेहमी चालू असावे त्याच बरोबर वेळ सुद्धा उचित असावी थोडे फार मिनिटे पुढे असले तर चालेल पण आपल्या घरी भिंतीवरील घड्याळ कधीच मागे असू नये जर आपल्या घरातील घड्याळ मागे असेल तर आपण सुद्धा जीवनामध्ये मागे मागे जात असतो. आपल्या घरातील घड्याळ आपण पूर्व पश्चिम दिशा या दिशेला लावू शकतो परंतु आपण चुकून सुद्धा घरातील घड्याळ हे दक्षिण दिशेला लावू नये.
दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि जर आपण घरातील घड्याळ या दक्षिण दिशेला लावले तर आपल्या घरातील सदस्यांचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. असे केल्याने आपल्या घरातील सदस्यांचे आयुष्य सुद्धा कमी होऊ शकते व त्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकते त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर व भिंतीवर चुकून सुद्धा घड्याळ लावू नये यामुळे घरामध्ये नेहमी ताणतणाव निर्माण होत असतो त्याचबरोबर जेव्हा आपण घरातून बाहेर जात असतो किंवा घरामध्ये येत होतो अशा वेळीसुद्धा घरात डोक्यावर घड्याळ असू नये व आपल्या घरातील घड्याळ हे नेहमी स्वच्छ असायला हवेत यावर कोणत्याही प्रकारची धूळ साचू देऊ नका.
आपल्या घड्याळ यातून चांगली ऊर्जा मिळावी याकरता घड्याळ मधून सुगम संगीत निर्माण होणारे असे काही घड्याळ बाजारामध्ये उपलब्ध असतात असे प्रकारचे घड्याळ आपल्या घरामध्ये जरूर लावावेत यामुळे तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक होईल आणि यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळू लागेल. आपल्या घराच्या हॉलमध्ये नेहमी पेंडुलम असणारी घरे लावावी यामुळे असे म्हटले जाते की जर तुमच्या हॉलमध्ये पेंडुलम घड्याळ असेल तर या घड्याळांमध्ये वाईट वेळ सुद्धा चांगल्या वेळी मध्ये बदलण्याची क्षमता असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये घड्याळ नेहमी गोलाकार किंवा अंडाकृती आकाराचे असणारे लावावे यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते.
परंतु अनेकदा आपण पाहतो की घरामध्ये वेगवेगळ्या आकाराचे त्रिकोणी चौकोनी आकाराचे घड्याळ पाहायला मिळतात, असे घड्याळ अजिबात लावू नये तसेच आपल्या घरामध्ये कर्कश्श आवाज निर्माण करणारे घड्याळ सुद्धा निर्माण लावू नये यामुळे घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत असते म्हणून घरामध्ये नेहमी सुगम संगीत ध्वनी निर्माण करणारे घड्याळ लावायला पाहिजेत. झोपताना आपल्या उशीला घड्याळ अजिबात ठेवू नये यामुळे आपली झोपमोड सुद्धा होते व त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो हे काही नियम आहेत जे आपल्या घरातील भिंतीवर घड्याळ लावण्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.