दान कसे करावे.? दान केल्याने पाप मिळते की पुण्य.? जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

अध्यात्म

अनेकदा आपण बाहेर फिरण्यासाठी जात असतो तेव्हा तिकडच्या व्यक्तींना दान देत असतो. बाहेर गेल्यावर दान घेताना आपण अनेकदा अन्नधान्य पैसे इत्यादी गोष्टी दान म्हणून देत असतो. परंतु असे केले दान खरेच सार्थकी लागते का? आपण दान करताना काही ईछा ठेवतो त्याचे फळ आपल्याला प्राप्त होते का ? असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये येत असतात. दान करावे का ? असा प्रश्न सुद्धा मनामध्ये निर्माण होतो. दान केल्याचा आपल्याला काही फायदा होतो का? असे अनेक संभ्रम निर्माण होत असतात त्याच बरोबर या तीन गोष्टी नेहमी दान करायला हव्यात.

या तीन गोष्टी चे दान आपल्याला योग्य व्यक्ती बघूनच आपल्याला करायला हवे.ते तीन गोष्टी म्हणजे एक अन्नदान दुसरे औषध दान आणि तिसरे ज्ञानदान आहे. या तीन गोष्टीचे दान तुम्ही नेहमी करायला हवे त्याचबरोबर जर एखादे भुकेले प्राणी असेल पशु असेल अशा ना नेहमी खायला द्या. तुमच्या दारासमोर कोणताही प्राणी जर आला तर त्या प्राणी ला अवश्य खायला यावे परंतु जर एखादी व्यक्ती नियमितपणे तुमच्या दारासमोर अन्न घेण्यासाठी येत असेल तर अशा व्यक्तीला अजिबात घेऊ नये.ती व्यक्ती जर शरीराने चांगली असेल स्वतः मेहनत करण्यासाठी तत्पर असेल परंतु अंगामध्ये आळस असेल तर अशा व्यक्तीला अजिबात दान देऊ नये.

दुसरे दान म्हणजे औषध दान. आपल्यापैकी अनेकांना औषधे घेण्यासाठी पैसे लागत असतात परंतु त्या व्यक्तींकडे पैशांची पूर्ण पैसे नसतात अशावेळी जर तुम्ही औषध घेऊन दिली तर तुम्हाला खूप मोठे पुण्य लागते परंतु जगामध्ये असे सुद्धा काही व्यक्ती आहेत की ते खोटे औषध यांची यादी दाखवून तुमच्याकडे पैसे घेत असतात यासाठी आधी पूर्णपणे खात्री करून घ्या आणि मगच त्यांना पैसे द्या पैसे देण्याऐवजी शक्यतो अशा व्यक्तींना औषधे विकत घेऊन द्या त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ज्ञानदान. ज्ञानदान ही सर्व श्रेष्ठ दान मानले जाते आणि जर अशा वेळी आपण एखाद्या व्यक्तीला ज्ञान दिले तर ते पुण्य ठरते.

हे वाचा:   या वेलीचा एक तुकडा जवळ ठेवा, साक्षात लक्ष्मी-कुबेर घरात वास करतात, सर्व मार्गांनी घरात धन, ऐश्वर्य येते..

जर एखाद्या व्यक्तीला खरच शिक्षणाची गरज असेल आणि त्या व्यक्तीला पैशामुळे शिकता येत नसेल तर अशावेळी जर तुम्ही पैशाच्या माध्यमातून काही मदत केली तर असे दान सुद्धा ज्ञानदान म्हणून संबोधले जाते म्हणून अशा पद्धतीची ज्ञान आवश्यक करायला हवे, जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या ज्ञानामध्ये भर पडू शकेल. त्याचबरोबर अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा आहेत त्या गोष्टींचे दान फक्त योग्य व उचित व्यक्ती पाहूनच करायला पाहिजे ते म्हणजे संपत्तीचे दान.

जेव्हा आपण संपत्तीचे दान बद्दल विचार करतो तेव्हा त्यामध्ये जमीन, घरदार,दागदागिने या सर्व गोष्टींचा समावेश होत असतो म्हणून अशा वेळी योग्य व्यक्तीची निवड करूनच आपल्याला हे दान करायला हवे अन्यथा या दानाचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो आणि त्याचे पाप आपल्या माथी सुद्धा लागू शकते. म्हणून अशा प्रकारचे दान करताना आपल्याला योग्य व्यक्तीची निवड करणे गरजेचे आहे त्यानंतर चे दान हे कन्यादान.

कन्यादान हे मुलीच्या लग्ना वेळी केली जात असे आणि अशा वेळी जेव्हा आपण मुलीचे लग्न करत असतो तेव्हा मुला विषयी संपूर्ण माहिती जमा करूनच अशा वेळी मुलीची लग्न करायला हवे कारण की जर मुलीला सासरच्या ठिकाणी जर काही त्रास झाला तर त्याचे पाप आपल्या माथी लागू शकते म्हणून कन्या दान हे सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते त्यानंतर ते दान म्हणजे गोदान. हिंदू धर्मशास्त्रामध्ये गाईचे दान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते परंतु जेव्हा हे दान केले जाते तेव्हा समोरच्या व्यक्तीची पात्रता सुद्धा तपासणं अत्यंत गरजेचे आहे.

हे वाचा:   ७ हजार वर्षांपासून हनुमानजींची वाट पाहत बसले आहेत येथे माकडे..जाणून घ्या जाखू मंदिराचे र’हस्य..आजही त्याठिकाणी स्वतः हनुमान..

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला गाय दान म्हणून देत असतो तेव्हा त्या गाईचे पालन पोषण व्यवस्थित होणार आहे का? खायला पोटभर खायला मिळणार आहे का ? गायीची देखभाल नीट होणार आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळायला हवी आणि जर सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला होकारात मिळत असतील तर अशा वेळेस गाय दान करायला पाहिजे. तर हे होते काही पाण्याचे प्रमाण व प्रकार अशा पद्धतीचं आपण वेगवेगळे दान करू शकतो आणि या दानाचे पुण्य सुद्धा प्राप्त करू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.