पोटात गॅस झाला असेल तर करा हा घरगुती उपाय. नमस्कार मित्रांनो कधी कधी अन्नपचन व्यवस्थित न झाल्यामुळे करपट ढेकर येणे ,वारंवार पाद येणे यासारख्या समस्या तुम्हाला देखील जाणवत असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही एक वेळा अवश्य करा. तुम्हाला भूक लागत नसेल, जेवणाची इच्छा होत नसेल तर अशा वेळी तुम्हाला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. हा उपाय कसा बनवायचा हे आज आपण आजचे या लेखात जाणून घेणार आहोत.
अपचन,गॅस या सारखे समस्यांवर अत्यंत गुणकारी उपाय बनवण्यासाठी एक भांडे घेऊन त्यामध्ये एक ग्लास एवढे पाणी घ्यायचे आहे.आता आपल्याला आवश्यक आहे बडीशेप. हा उपाय करण्यासठी आपल्याला एक किंवा दोन चमचा बडीशेप घ्यायची आहे. मित्रांनो आपल्यापैकी अनेक जणांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. या बडीशेप मधील फायबरमुळे आपले पोट स्वच्छ होते.
या लेखात सांगितल्याप्रमाणे बडीशेप वापरली तर तुमचे वजन वाढणार तर नाहीच पण वाढलेले वजन देखील कमी होण्यास सुरुवात होईल. त्यांना रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते अशा व्यक्तींनी कच्ची बडीशोप खाल्ली पाहिजे. आपण साधारण दोन चमचे एवढे या पाण्यामध्ये टाकायचे आहे.
या सोबतच आपल्याला दोन वेलची घ्यायच्या आहेत. वेलची आयरन तसेच रक्त वाढ होण्यास मदत करते. जर रोजच्या चहामध्ये एका वेलचीचा वापर केल्याने सर्दी खोकला आणि कफाचे इतर आजार होण्याचा धोका कमी होतो. आपण दोन वेळच्या या पाण्यामध्ये सोलून दोन वेलची सोलून टाकायचे आहेत आणि हे अर्धे होईपर्यंत उकळायचे आहे.
मित्रांनो अपचन,गॅस या समस्यांसाठी किंवा मेडिकलमध्ये गोळ्या औषधाचा वापर करण्यापेक्षा यासारखे सोपे घरगुती उपाय केले तर अपचनाची समस्या मुळापासून नष्ट होते. फक्त वजन वाढवण्यास मदत करून शरीरातील विषारी घटक उत्सर्जित करण्यासाठी मदत होते त्यानंतर हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे. तुम्ही गरजेनुसार व चवीनुसार या मिश्रणामध्ये गुळ किंवा खडीसाखर सुद्धा टाकू शकता. हा उपाय तुम्हाला आठ ते दहा दिवस करायचा आहे त्यानंतर तुम्हाला फरक जाणून येईल. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील अपचन यासारख्या समस्या दूर होतील परंतु अन्य काही समस्या सुद्धा दूर होतील म्हणून हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.