केस गळणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्या चुटकीतच नाहीसे करते हे घरगुती तेल.!

आरोग्य

या तेलाचा वापर करा आणि केस तुटणे,केस गळणे, अकाली केस पांढरे होणे यासारख्या समस्या पासून लवकरच सुटका मिळवा. आपल्यापैकी अनेक जण केसांच्या समस्येपासून त्रस्त असतात. आपले केस चांगले रहावे यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. आपल्यापैकी काही जण अनेक रासायनिक पदार्थांचा उपयोग सुद्धा करतात.

परंतु याचा आपल्या केसांवर कधीकधी विपरीत परिणाम होतो आणि आपले केस चांगले होण्याऐवजी अजूनच खराब होत असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमचे केस अगदी मजबूत बनणार आहे. जर तुमच्या डोक्यामध्ये कोंडा समस्या निर्माण झाली असेल तर ती सुद्धा निघून जाणार आहे. चला तर जाणून घेऊया या उपायांबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे.आयुर्वेदिक शास्त्रामध्ये कांद्याला अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो एका लोहाच्या कढईमध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस कडीपत्ता ची पाने लागणार आहेत त्यानंतर एक वाटी खोबरेल तेल लागणार आहे, आता हे सगळे मिश्रण आपल्याला गॅसवर मंद आचेवर ठेवायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे जेणेकरून या सर्व पदार्थांचे अर्क तेलामध्ये उतरेल.

हे वाचा:   या पाल्याचा रस घ्या ब्लॉकेज १००% निघून जातील; ऑपरेशनची कधीच गरज भासणार नाही.!

जर तुम्हाला कांद्याचा वास आवडत नसेल तर अशावेळी तुम्ही या मिश्रणामध्ये सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मिक्स करू शकतात त्यामुळे कांद्याचा उग्र वास येत नाही त्याचबरोबर तुमच्या केसा मध्ये भरपूर प्रमाणात कोंडा झालेला असेल, फंगल इन्फेक्शन झाले असेल तर अशावेळी आपल्याला एक तुकडा हळद घ्यायची आहे आणि या हळदीचे तुकड्याचे बारीक बारीक तुकडे करून मिश्रणामध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे.

गॅस बंद केल्यानंतर मिश्रण जेव्हा थंड होईल अशा वेळी आपल्याला मेथीची पावडर यामध्ये मिक्स करायचे आहे. हे सगळे केल्यानंतर आता गाळणीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जे काही पदार्थ वापरलेले आहेत त्या सर्व पदार्थांचा अर्क तेलामध्ये उतरेल आणि हे तेल आपल्याला दिवसभरातून दोन वेळा आपल्या केसांना लावायचा आहे.

हे वाचा:   फक्त अशाच जोडप्यांना जुळी मुले होतात..जी जोडपी या प्रकारे करतात; तसेच वयाच्या या च'रणात स'बंध बनवतात..

हा उपाय तुम्ही महिनाभर जरी केला तरी तुमच्या केसांच्या संदर्भातील ज्या काही समस्या असतात ते पूर्णपणे दूर होण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय घरगुती असल्याने या उपायाचे कोणतेही दुष्परिणाम नाही.हा उपाय केल्याने तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला असेल, केस गळत असतील ,केस फुटत असतील ,केस अकाली पांढरे झाले असतील तर या सगळ्या समस्या पूर्णपणे दूर होणार आहेत म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपल्या केसांचे आरोग्य जपा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.