सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कोणाला सर्दी ,खोकला,ताप झाला तरी आपण त्या व्यक्तीकडे संशयाच्या दृष्टिकोनातून पाहत असतो जेणेकरून त्याला कोणत्या तरी संक्रमणाचा आजार झालेला आहे अशा पद्धतीने आपण त्याच्याशी वागू लागतो परंतु असे जर काही झाले तर असे चुकीचे अजिबात वागू नका कारण की सर्दी ,खोकला, ताप हा कदाचित वातावरणातील बदललेल्या स्थितीमुळे सुद्धा असू शकतो आणि अशा वेळी आपण घाबरून जातो व लगेच डॉक्टरांकडे जातो आणि ऍडमिट होतो अशा वेळी थोडासा धीर धरून काही घरच्या घरी करता येणारे उपाय सुद्धा करून पहा.
डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे पण त्या आधी आपल्या हातात काही गोष्टी सुद्धा असतात ते म्हणजे आपल्या घरामध्ये काही औषधी गुणधर्म असणारे घटक पदार्थ उपलब्ध असतात. त्यांच्या आधारे आपण आधी उपचार करू शकतो त्याच बरोबर या सर्व परिस्थिती मध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे गरजेचे आहे कारण की जर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संक्रमण होणार नाही.
जर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत नसेल तर अशा वेळी अनेक आजार तुमच्या शरीराला होऊ शकतील. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा एक महत्त्वपूर्ण उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चला तर मग जाणून घ्या त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे त्यानंतर त्या लिंबूवर आपल्याला एक चिमूटभर काळी मिरी पावडर घ्यायची आहे. काळीमिरी पावडर मध्ये पेपरीन नावाचे घटक असते ते आपल्या शरीराला उष्णता प्रदान करत असते त्याचबरोबर लिंबू मध्ये विटामिन सी भरपूर असल्यामुळे आपल्या शरीराला त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असतो. लिंबू मध्ये अँटीबॅक्टरियल हे गुणधर्म असल्याने आपल्या शरीराला संरक्षण देण्याचे कार्य लिंबू करत असते म्हणून हा उपाय करण्यासाठी आपण लिंबू वापरणार आहोत.
त्या नंतर आपल्याला अर्धा लिंबूवर काळी मिरी पावडर चिमूटभर टाकायची आहे त्यानंतर काळे मीठ चिमूटभर ,हिंग पावडर चिमूटभर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला हा लिंबू आपल्याला गॅसवर गरम करायचा आहे व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस बंद करुन आपल्याला हा लिंबू एका वाटीमध्ये ठेवायचा आहे. ज्या व्यक्तींना सर्दी ,खोकला, ताप यासारख्या समस्या वारंवार उद्भवत आहेत अशा व्यक्तींनी हा लिंबू दिवसभरातून दोन वेळा खायचा आहे असे केल्याने तुमच्या शरीरातील या समस्या पूर्णपणे दूर होणार आहे.
जर तुम्हाला श्वास घेण्यास अडथळा येत असेल अशा वेळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्हाला घशाचे इन्फेक्शन असेल तर अशावेळी तुम्ही या लिंबू वर हळद टाकून खाऊ शकता पण घशाचे इन्फेक्शन नसेल तर हळद टाकायची नाही अशाप्रकारे अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.