घरातून पाल, झुरळ, डास, माशा पळवून लावणारा घरचा स्प्रे; सर्व डास सैरावैरा पाळायला लागतील.!

आरोग्य

जर घरात पाल, झुरळे भरपूर प्रमाणात झाले असतील, घरांमध्ये डास माशा वारंवार येत असतील तर या सर्व समस्यांसाठी आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये पाल, झुरळे,माश्या अजिबात येणार नाही. इतका प्रभावी उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

घरातील पाल झुरळ यांना पळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो परंतु अनेकदा त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसतो. रासायनिक पदार्थांचा वापर केल्यामुळे अनेकांना स्मृति संबंधित अनेक समस्या सुद्धा होऊ लागलेल्या आहेत त्याचबरोबर रासायनिक पदार्थ महागडे असल्याने सुद्धा पैशांचा गैरवापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेलामध्ये पाणी ठेवायचे आहे आणि त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळीमिरी लागणार आहे.काळीमिरी मध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या घरातील कीटक दूर करण्यासाठी मदत करत असतात त्याचबरोबर काळी मिरीचा उग्र वास हा आपल्या घरातील किटकांना अजिबात आवडत नाही म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळी मिरची पावडर करायची आहे.

हे वाचा:   उकडलेली अंडी खाल्यानंतर हे पदार्थ चुकनही खाऊ नका ! नाहीतर जीव देखील जावू शकतो..

एक चमचा काळी मिरी पावडर आपल्याला पातेला मध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पातेलामध्ये कडुलिंबाची पाने टाकायचे आहेत.कडूलिंब हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर कडुलिंबाच्या अंगी अँटी बॅक्टेरियल व अँटी फंगल हे गुणधर्म असल्याने अनेक किटाणू पासून आपले संरक्षण होते.

आता हे मिश्रण आपल्याला चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळायचे आहे व एका प्लास्टिकच्या बॉटल मध्ये हे मिश्रण भरायचे आहे व असे केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये झुरळ,पाल येतात अशा ठिकाणी आपल्याला हे मिश्रण युक्त स्प्रे मारायचा आहे असे केल्याने काही दिवसांमध्येच तुमच्या घरातील झुरळ पाल डास माशा घराच्या बाहेर निघून जाण्यास मदत होणार आहे. हा अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे.या उपायाचा कोणता दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   दबलेल्या 72 हजार नसा होतील पूर्णपणे मोकळ्या; यासाठी करा हा रामबाण घरगुती उपाय.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.