घरात सुख, समृद्धी हवी असेल तर या दिशेला कधीच ठेऊ नका मणी प्लांट.!

अध्यात्म

सर्वांनाच असे वाटते की आपल्याकडे भरपूर पैसा यावा ,भरपूर प्रमाणामध्ये धन यावे.खरेतर हे काही व्यक्तीच्या बाबतीत शक्य होते तर काही व्यक्तीनी कितीही मेहनत घेतली, कितीही कष्ट केले तरीही त्यांची परिस्थिती काही बदलत होत नाही. आपल्या भाग्यामध्ये बदल करणारी एक महत्त्वाची वनस्पती,तिचे अनेक उपयोग अध्यात्मिक या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत. त्या वनस्पतीचे नाव आहे मनी प्लांट. मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड.

या झाडाला लक्ष्मी वेल असे सुद्धा म्हणतात कारण की या झाडाच्या माध्यमातून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करत असते. मनी प्लांट घरी आणून आपण आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल घडवून आणू शकतो. आपल्या अनेक आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मनी प्लांट आपल्याला मदत करत असते. अनेकदा आपण मनी प्लांट आपल्या घरात आणत असतो परंतु हे झाड कोणत्या ठिकाणी लावावे.?

आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवावे याबद्दलची आपल्याला अचूक माहिती उपलब्ध नसते म्हणून अनेकदा आपल्याला याचा योग्य तो लाभ होताना दिसत नाही. अशा वेळी आपण आपल्या भाग्यला दोष असतो परंतु जर आपण योग्य ठिकाणी व योग्य वेळी मनी प्लांट लावले तर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या दूर होऊ शकते व आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पैसा व धन येऊ शकतो.

मनी प्लांट दिसायला सुंदर आणि आकर्षक असल्यामुळे, घरामध्ये सजावटीसाठी सुद्धा मनी प्लांट चा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो त्याचबरोबर लक्ष्मीप्राप्तीसाठी हे झाड घरामध्ये लावले जाते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण मनी प्लांट झाडाविषयी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घ्याव्यात त्याबद्दल..

हे वाचा:   जसा रंग तसे चरित्र – निवडा या पैकी एक रंग आणि जाणून घ्या तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा स्वभाव व सवयी…

घरासाठी मनी प्लांट आणताना ते कधीही खरेदी करून विकत आणू नये त्याचबरोबर कुणाला सांगू नका. विचारून सुद्धा आणू नये. मनी प्लांट चे झाड जेथे असेल तिथे कुणाला न विचारता गुपचूप एक फांदी घेऊन यावे परंतु अशावेळी आपण ज्या घरातून ही फांदी तोडून आणणार आहोत त्या घरातील लोक हे श्रीमंत धनवान व पैसेवाले असायला हवी. त्यांच्या घरामध्ये नित्यनियमाने देवपूजा व तुझ्या अर्चना व्हायला हवी अशा घरातून आपल्याला मनी प्लांटचे झाड आणायचे आहे व त्याची वेल तोडून आणायचे आहे जेणेकरून तुमच्या घरा मध्ये सुद्धा धन येऊ शकेल.

या गुपचूप तोडून आलेल्या मनी प्लांट मुळे तुमच्या घरा मध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करेल व तुमच्या घरामध्ये नेहमी सुख – शांती, वैभव धन प्रवेश करेल. मनी प्लांट घरात आल्यानंतर जर त्याचे एखादे पान पिवळे झाले तर ते पान काढून टाकावे ,असेच ठेवू नये त्याचबरोबर मनी प्लांटचे झाड घरामध्ये आणत असताना छोटे व गोलाकार आकाराची असलेले आणावी जास्त मोठ्या आकाराची पाने असलेली वेल घरामध्ये आणू नये.

आकाराने मोठे असलेले मनी प्लांट कोणतेही फळ प्राप्त करून देत नाही म्हणूनच शक्यतो छोटे पाने असणारी मनी प्लांट आपल्या घरामध्ये आणावे.जर तुम्ही मनी प्लांट ची लागवड प्लॅस्टिकच्या बॉटल मध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये जर करत असेल तर अशा वेळी मनी प्लांटची मूळ कुणाला शक्यतो दिसणार नाही याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मनी प्लांट पिवळसर नसावी ते हिरवे असावे म्हणजेच आपली प्रगती सुद्धा वेगाने होत असते.

हे वाचा:   सकाळी उठताच बोला फक्त हे २ शब्द; मनातील सर्व इच्छा होतील पूर्ण.!

मनी प्लांट जितक्या वेगाने वाढत असते तितक्याच वेगाने आपली प्रगती सुद्धा होत असते. मनी प्लांट शक्यतो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला किंवा आतल्या दिशेला लावावा त्याचबरोबर आपण घरातून बाहेर जात असताना मनी प्लांटची वेल आपल्या डोक्यावरून जावी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लावू शकता. मनी प्लांटच्या कुंडीला किंवा वेलीला लाल रंगाचे रेबिन बांधावी असे केल्याने त्याचे आपल्याला दुप्पट फायदे मिळत असतात व ते दिसायला सुद्धा सुंदर व आकर्षक दिसते. मनी प्लांट ला पाणी वाहताना त्यामध्ये एक दोन चमचा दूध टाकावे आणि त्यानंतर ते मनी प्लांट वाहावे. असे केल्याने मनी प्लांटची वाढ वेगाने होते व आपल्या जीवनामध्ये धन सुख संपत्ती सुद्धा वेगाने येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.