आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक घरात देवघर असतेच. आपण दररोज नित्य नेमाने भगवंतांचे पूजन करतो असे केल्यास आपल्याला मानसिक शांतता मिळते त्या बरोबरच आपल्या संपूर्ण घरात सकारात्मक वातावरण राहते परंतु भगवंतांचे पूजन करण्याचे काही नियम आहे. आपण जर हे नियम पाळले नाही तर आपल्याला त्याचे विपरीत परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतील. भगवंतांचे पूजन करण्याचे काही धार्मिक तर काही शास्त्रीय कारण सुद्धा आहेत.
पूजन करताना या सर्व नियमांकडे लक्ष जरूर यावे त्यातीलच एक नियम घंटानाद हा आहे. देवपूजा दरम्यान आपण घंटा वाजवतो. घंटा नाद यांचे शास्त्रात महत्व आपल्याला सांगण्यात आलेले आहे आणि घंटा नादेचे खूप महत्त्व दिले गेले आहे. घंटा वाजवल्याने भगवंतांचे आगमन होते ते राक्षस दुर पळतात.वाईटशक्ती पासून घंटा आपले राक्षसांपासून संरक्षण करते असे पुराणात लिहले आहे. घंटा नाद केल्याने याचे आपल्याला कोणकोणते फायदे लाभतात व घंटा नाद करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
जेव्हा आपण देव पूजा करतो तेव्हा घंटानाद अवश्य करत असतो. हिंदू शास्त्रांमध्ये व अनेक पुराणांमध्ये घंटानाद बद्दल सांगण्यात आलेले आहे. जेव्हा आपण देवघरामध्ये पूजा करत असतो अशावेळी घंटानाद करतो आणि जेव्हा आपण जर व्यवस्थित लक्ष दिले तर घंटा म्हणजेच जी आपल्या देवघरामध्ये घंटी असते तिच्या सर्वात वरच्या टोकाला गरुडाचे प्रतिमा असते म्हणून याला गरुड घंटा असे सुद्धा म्हणतात.
या घंटेचा नाद केल्याने आपण भगवंतांना आवाहन करत असतो आणि भगवंत आपल्या घरी येतात असा याचा भास सुद्धा आपल्याला होत असतो. जेव्हा आपण भगवंताची विधिवत पूजा अर्चना करत असतो अशावेळी घंटानाद अवश्य करायला हवा त्याचबरोबर जेव्हा आपण आरती करतो अशा वेळीसुद्धा घंटानाद करायला हवा.जेव्हा आपण आरती करतो तेव्हा घंटानाद त करायला हवा.
या सकारात्मक ध्वनी मुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होतेच पण त्याचबरोबर देवदेवतांना आवाहन सुद्धा केले जाते आणि अशामुळे देवी-देवता या घंटानाद आजच्या ध्वनी मुळे आपल्या घरामध्ये साक्षात आगमन करत असतात. जर आपण आरती करताना घंटानाद केला नाही तर ती आरती अपूर्ण मानले जाते परंतु आपल्यापैकी अनेकजण असे आहेत की ती आरती करताना घंटी अजिबात वाजवत नाहीत. घंटानाद करत असताना ओंकाराचा सुद्धा भास होतो म्हणूनच घंटानाद याला शंकराचे प्रतीक सुद्धा मानले जाते.
आपण पूजा-अर्चना करत असताना घंटीचा नेहमी वापर करत असतो म्हणून चुकून सुद्धा घंटेचा अपमान करू नये म्हणून जेव्हा आपण आरती पूजा करत असतो अशा वेळी घंटीचे पूजन करणे सुद्धा महत्वाचे ठरते.घंटीचे पूजन न करता घंटी वाजवने या अशुभ मानले जाते त्याचबरोबर आपण अनेकदा पाहिले असेल की जेव्हा आपण देवपूजा करत असताना घरामध्ये घंटी वाजवतो.
अशावेळी आपल्या घरातील संपूर्ण वातावरण शुद्ध होऊन जाते आणि वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते परंतु अनेकदा आपण घंटेची विधिवत पूजा केली तर ही सकारात्मक उर्जा नकारात्मक उर्जेमध्ये रुपांतर होऊ शकते. आपल्यापैकी अनेक जण फक्त आरती करताना घंटी वाजवत असतात परंतु असे न करता जेव्हा तुम्ही देवांना पाणी अर्पण करता, स्नानविधि करत असतात, कापूर अगरबत्ती दाखवत असतात, नैवेद्य देत असतात अशा प्रत्येक विधीच्या वेळी घंटी वाजवणे आवश्यक आहे.
यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहील त्याच बरोबर जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा आहे असा भास होत असेल तर अशा वेळी घंटानाद अवश्य करा, त्यामुळे तुम्हाला व तुमच्या घरातील सदस्यांना बरे वाटू लागेल. हे होते काही घंटा नाद विषयी महत्त्वाचे काही नियम आपल्याला पाळणे गरजेचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.