अशा घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही; भविष्यात या चुका कधीच करू नका.!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्मात स्त्रियांना लक्ष्मीचे रूप समजले जाते आणि असे म्हटले जाते की आपल्या घरातील स्त्रिया आपल्या घराला म्हटले तर ते घराला स्वर्ग करू शकते किंवा नरक सुद्धा करू शकते. संपूर्ण सृष्टी ही स्त्री जातीवर अवलंबून आहे. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो ,ते खरेच आहे. पुरुषाला घरून जर सपोर्ट असेल तर कोणतेही काम बिनधास्तपणे करून त्यात यश मिळवू शकतो परंतु अशी काही काम आहेत ती स्त्रियांनी अजिबात करू नये नाहीतर त्यांच्या घरातील सर्व सुख समृद्धी निघून जाते म्हणूनच या लेखामध्ये आपण असे काही माहिती जाणून घेणार आहोत, जी कामे स्त्रियांनी करू नये.

आपण आपल्या घरामध्ये झाडू ला दैवत मानत असतो. झाडूला माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. झाडू आपले घर स्वच्छ ठेवण्याचे काम करते म्हणून झाडूला खाली पाय लावू नये जर चुकून पाय लागलास तर झाडूला नमस्कार करावा. जर आपण चुकून झाडूला लाथ मारल्यास अशावेळी माता लक्ष्मी घरातून निघून जाते.

घराच्या उंबरठ्यावर कधीच बसू नये किंवा उंबरठे वर बसुन गप्पा मारू नये. यामुळे घरातील मुख्य सदस्य मग अचानक कर्जाचा डोंगर वाढू लागतो. अनेकदा आपण रात्री जेवण केल्यानंतर जे उरलेले भांडे असते तसेच ठेवतो पण स्वच्छ करण्यास विसरून जातो अशा वेळी जर आपण भांडे तसेच सिंक मध्ये पडू देतात व सकाळी ते स्वच्छ करतात पण यामुळे त्यावर जीव जंतूंचा व कीटाणू चा प्रसार होऊन आजारपणे वाढतात.

हे वाचा:   नेहमी या हाताने पैसे घ्या; पैसा इतका वाढेल कि संभाळताही येणार नाही.!

आपला पैसा दवाखान्यात खर्च होतो म्हणून रात्री चे भांडे तसेच ठेवून झोपू नये. जर कामवाली येणार असेल तर सर्व उष्टे भांडे काढून भांडे पाण्याने मिसळून बाहेर किंवा बाल्कनी ठेवावेत तसेच पडू देऊ नये तसेच ठेवून झोपून नये.ते भांडे वेळीच जागच्या जागी ठेवावेत यामुळे घरात दुःख येण्याची शक्यता असते घराचे दार उघडणे शुभ आहे.

परंतु जर तुम्ही आपल्या घराच्या दाराला लाथ मारत असेल तर अत्यंत चुकीचे आहे असे तुमच्या घरात जर होत असेल तर लगेच थांबवावे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आठवड्यातून एकदा समुद्री मिठाने लादी पुसावे. समुद्र मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची क्षमता असते म्हणून आपल्या घरातील आठवड्यातील एक दिवस तरी घराची लादी समुद्र मिठाने पूसावी.

हे वाचा:   करा तुरटीचा हा 3 दिवसाचा चमत्कारिक उपाय; लगेच दिसून येतील याचे परिणाम.!

फरशी पुसण्याचा पाण्यात टाकून त्या पाण्याने फरशी पुसावे यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते व घरात सुख शांती व समृद्धी येते. ज्या घरात दररोज सकाळी उठल्यानंतर लगेचच घराची स्वच्छता होते त्या घरात लक्ष्मीचे वास्तव्य असते म्हणून सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी घराची स्वच्छता करून रात्रभर जमा झालेली नकारात्मकता बाहेर काढावे. ही आहेत महत्वाची काही कामे जी महिलांनी तर करूच नये त्याचबरोबर पुरुषाने सुद्धा करू नये. ही काही चुकीची कामे टाळली तर आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदू लागते व आपल्या घरामध्ये माता ला महालक्ष्मीचा वास राहतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.