सर्दी, ताप, डायबिटीस, मूळव्याध, पोट साफ न होणे यासाठी वरदानच आहे हि वनस्पती; १ दिवसातच मिळेल आराम.!

आरोग्य

आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडे झुडपे असतात परंतु ही झाडेझुडपे आपण अनेकदा दुर्लक्ष करत असतो कारण की त्याचे अनेक औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नसतात म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत.

या माहितीच्या आधारे तुम्हाला सर्दी, ताप,डायबिटीस, मुळव्याध, पोट साफ न होणे यासारखे असंख्य समस्या जर असतील तर ते पूर्णपणे दूर होणार आहे. हे झाड आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हे झाड आपल्या आजूबाजूला अनेकदा दिसते परंतु या झाडाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याने आपण दुर्लक्ष करतो. हे झाड आपल्या आजूबाजूला दिसते पण या झाडाला पिवळसर रंगाची फुले असतात त्यामुळे आपण अनेकदा शोभेचे झाड म्हणून सुद्धा याला ओळखत असतो, या झाडाला बहावा असे म्हणतात.

बहावा हे अत्यंत आयुर्वेदिक आहे, याचा प्रत्येक भाग औषधी गुणधर्म आणि उपयुक्त आहे. जर आपल्याला अंगावर खाज, खरूज,नायटा झाली असेल तर अशा वेळी आपण या पानांची पेस्ट दिवसभरातून दोन तीन वेळा लावली तर आपल्या त्वचा विकार पूर्णपणे दूर होऊन जातो त्याचबरोबर अनेक लोकांना संधिवात, गुडघे दुखत असतात अशा वेळी या पानांची पेस्ट व फुलांची पेस्ट जर आपण प्रभावित जागेवर लावली तर आपली गुडघे दुखी व सांधे वाचायची समस्या पूर्णपणे दूर होऊन जाते.

हे वाचा:   किवी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे..आयुष्य वाढवते किवी ! तसेच हे भयंकर जीवघेणे रोग किवी खाल्यामुळे बरे होतात..जाणून घ्या

कावीळ सारख्या आजारावर सुद्धा बहावाची फुलं अत्यंत महत्त्वाचे ठरतात अशा वेळी बहावाचे फुल उकडून त्याचा गर खाल्ला तर आपल्याला काविळीवर फरक पडतो. आपल्यापैकी अनेक जणांना श्वसनाचा,उष्णतेचा त्रास भरपूर प्रमाणामध्ये होत असतो. शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊ लागते अशा वेळी जर या फुलांचा गर व धन्याची पावडर सोबत खाल्ला तर आपल्याला तोंड येण्याची समस्या काही दिवसातच पूर्णपणे नाहीशी होते.

जर तुम्हाला मुळव्याध झाला असे औषध करून सुद्धा मूळव्याध बरा होत नसेल तर अशावेळी बहावा च्या शेंगा महत्त्वाच्या ठरतात बहावा च्या शेंगा यांची पावडर करून गरम पाण्यामध्ये उकळून त्याचा काढा प्यायल्याने आपला मूळव्याधाचा त्रास कमी होऊन जातो त्याच बरोबर अनेकांना पोट साफ न होण्याची समस्या असते ,पोटामध्ये गॅस भरतो,पचन योग्य प्रमाणामध्ये होत नाही अशा वेळी जर आपण आठवडाभर तू एकदा बहावा च्या फुलांची भाजी खाल्ली तर आपल्या पोटाचा ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे दूर होऊन जातात अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा उपाय असून सर्वांनी करा.

हे वाचा:   कितीही प्रमाणात खाल्लात तरी वजन वाढत नाहीय का.? तर दुधासोबत घ्या हा पदार्थ, १ महिन्यातच बॉडी बनेल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.