सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण चिंतेत झालेला आहे. प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी करत आहे. प्रत्येक जण आपली रोगप्रतिकारक शक्ती कशा पद्धतीने चांगली ठेवता येईल याचा विचार करू लागलेला आहे. जर तुम्हाला सुद्धा काही झाले तरी वातावरणामध्ये बदल झाले तरी आजारी पडत असेल तर याची नक्कीच कारण तुमची रोगप्रतिकारक शक्ती असेल जर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर आपण लगेच आजारी पडतो व कोणत्याही विषाणूच्या सान्निध्यात आल्यावर आपण आजारी पडतो व विषाणु ची लक्षणे आपल्यावर भारी पडतात आणि आपल्याला वेगवेगळे रोग होण्याची शक्यता असते.
म्हणूनच या सध्याच्या काळामध्ये चा स्वतहाला विषाणूचा संसर्ग पासून वाचवायचं असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवायला हवी. बहुतेक वेळा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने आपल्याला सर्दी ,खोकला, ताप, घसा दुखणे, घशामध्ये जळजळ होणे अशा अनेक समस्या उद्भवत असतात आणि आपण अनेक औषध सेवन करतो परंतु या औषधांचा आपल्यावर काही फरक पडत नाही. अनेकदा आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की एवढी औषध खाऊन सुद्धा आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती का वाढत नाही तर त्यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार.
जर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवायचे असेल तर नियमितपणे पौष्टिक आहार करण्यात करायला हवा त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विटामिन्स, मिनरल, खनिजे असायला हवी जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मदत होईल. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळेसुद्धा मजबूत भूमिका बजावतात परंतु फळे खाताना आपल्याला जे जास्त विटामिन आपल्याला प्रदान करतील अशी फळे सुद्धा खाणे गरजेचे आहे आवळ्याचे सेवन नियमित करायला हवे जेणेकरून त्यामध्ये असणारे विटामिन सी आपल्या शरीराला मिळू शकेल व त्याचबरोबर पेरू, सफरचंद, केळी यासारखे अनेक पदार्थ फळे आहेत जे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात व त्यातील विटामिन्स मुळे आपल्या शरीराला पौष्टिक घटक प्राप्त होतात.
शरीराला योग्य प्रमाणामध्ये प्रोटिन्स हवे असेल तर आपल्याला चिकन मच्छी सुद्धा खाना गरजेचा आहे नियमितपणे मासे खाल्ल्याने आपल्याला ओमेगा फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणामध्ये मिळते आणि हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे ठरते. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ड्रायफूट खाणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. ड्रायफ्रूट मध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आपल्या शरीराला आवश्यक घटक प्राप्त होतात. अक्रोड हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे यामध्ये असणारे फॅटी ऍसिड यामुळे आपले शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्याचबरोबर जे आंबट पदार्थ असतात म्हणजे दही, इडली, डोसा यातील पोषक घटकांमुळे आपली पचनसंस्था सुद्धा चांगले राहते आणि पचनसंस्था चांगली असेल तर आपले शरीर सुद्धा मजबूत राहते.
अनेकांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही ,पोटामध्ये दुखत असते, अनेक समस्या उद्भवत असतात. या सर्व समस्या दही इडली सारखे पदार्थ खाल्ल्यामुळे संपूर्णपणे दूर होऊन जातात आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगले राहते. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये तुळशीला खूप सारे महत्त्व देण्यात आलेले आहे. तुळशीच्या अंगी असे आणि आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असतात याचा आपण विचारसुद्धा केलेला नसेल निमित्ताने आपण चहा पीत असतांना तुळशीचे पाने टाकले तर आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती सुद्धा मजबूत होते.
त्याच बरोबर दिवसभरातून दोन वेळा जरी आपण तुळशीची पाने खाल्ली तरी आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात संपूर्णपणे बाहेर पडण्यासाठी मदत होत असतात त्याचबरोबर सर्दी, खोकला , ताप आला असेल तर अशा वेळीसुद्धा तुळशीच्या पानांचा काढा प्यायला जातो जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मदत होतात तरीही काही पदार्थ होते जे पदार्थ आपण खाल्ले तर आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत बनू शकेल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.