सध्याच्या या भयानक परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे आणि आरोग्याची काळजी घेत असताना अनेक उपचार सुद्धा करत आहे परंतु वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या समस्या आपल्याला वारंवार होत आहे. अनेक उपचार करून सुद्धा आपण समाधानी होत नाही आहोत म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. आपण जो उपाय करणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा तसेच आयुर्वेदिक शास्त्रात हे फळ खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे त्याबद्दल आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.चला तर मग जाणून घेऊया.
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असे अनेक फळ आहेत जे औषधाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहेत त्यांच्यापैकी एक फळ आहे त्याचे नाव आहे बेहडा. बेहडा हे कोकणामध्ये प्रामुख्याने आढळणारे फळ आहे परंतु सध्याच्या काळामध्ये हे फळ सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला बेहडाची पावडर लागणार आहे, त्याची पावडर आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचा बेहडा पावडर घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक चमचा मध मिसळायचे आहे. बेहडाची पावडर ही प्रामुख्याने आपल्याला त्रिफळाचूर्ण मध्ये सुद्धा पाहायला मिळते. ही पावडर खाल्ल्याने आपल्या पोटा संदर्भातील ज्या काही समस्या सध्या पूर्णपणे दूर होऊन जातात.
बेहडा पावडर नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील जी काही घाण साचलेली आहे ती पूर्णपणे निघून जाते. अनेकदा आपण अनेक औषधांचा वापर करत असतो परंतु त्याचा हवा तसा आपल्या शरीरावर परिणाम होत नाही उलट शरीरामध्ये घाण साचते अश्या वेळी जी साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी बेहडा पावडर अतिशय उपयुक्त ठरते. जर तुम्हाला पोटामध्ये गॅस झालेला असेल, पोट दुखत असेल, पोटामध्ये गडगड होत असेल तर अशा वेळी बेहडा पावडर अत्यंत लाभदायक ठरते त्याचबरोबर जर तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन झालेले असेल तर अशा वेळी आपल्या घशातील इन्फेक्शन दूर करण्यासाठी सुद्धा मदत करते.
आपले फुप्फुस सुद्धा नियंत्रणात राहते. ही पावडर जर आपण नियमितपणे खाल्ली तर आपले फुप्फुसे व्यवस्थित कार्य करतात म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी बेहडा पावडर आणि मध यांची एक पेस्ट तयार करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ दोन वेळा म्हणून खायची आहे, अशा पद्धतीने जर आपण हा उपाय आठवडाभर केला तर आपल्या शरीरातील सर्व समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.