अनेक आजारांवर गुणकारी आहे हा त्रिफळाचूर्ण चला तर मग नियमित घ्या. त्रिफळा चूर्ण आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणूनच या चूर्ण बद्दल योग्य वेळ, ते कशा पद्धतीने खायचे? नेमके नियम काय काय आहेत? हे सर्व आज आपण आपल्या लेखामध्ये घेणार आहोत.
त्रिफळा नावावरूनच आपल्याला जाणवते की यामध्ये तीन फळांचा उपयोग करण्यात आलेला आहे. आवळा, बेहडा, हिरडा असे तीन पदार्थ यामध्ये वापरण्यात आलेले आहे. यामध्ये चीबोलिक असिड, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्रिफळा चूर्ण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व प्राप्त आहे.
या चूर्ण जर आपण नियमितपणे सेवन केले तर आपली पोट सुद्धा साफ होण्यास मदत होते. त्याचबरोबर यामुळे आपली पोटामध्ये जे काही वाईट पेशी असतील ते संपूर्ण निघून जातात यामुळे आपल्या रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत चालतात त्यामुळे नियमित खायला पाहिजे यामध्ये उपलब्ध असणारे घटकांमुळे आपल्याला संधिवात व वाताचा कोणताही प्रकार असेल तर पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मदत होतो. हे त्रिफळा चूर्ण आपल्या शरीरातील डीएनए बदल होण्यापासून सुद्धा आपल्याला वाचवते.
डी एन ए मध्ये होणारे बदल अनेक कारणांमुळे असतात त्याचबरोबर धूम्रपान वातावरणातील बदल प्रदूषण ही कारण सुद्धा महत्त्वाची ठरते. त्रिफळा चूर्ण आपल्या शरीरातील बदल थांबवते त्याच बरोबर यामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील विषारी घटक सुद्धा बाहेर काढण्यासाठी मदत होते. या त्रिफळा मुळे आपल्या शरीराचे ऑक्सिडेशन होत नाही .ऑक्सिडेशन म्हणजे जेव्हा कोणताही पदार्थ ऑक्सिजनचे संपर्कात येतो तेव्हा ऑक्सिडेशन असे म्हणतात.
जेव्हा लोखंड यांच्या संपर्कात येतो तेव्हा तो पण गांजत असतो, सफरचंद ऑक्सिजनचे संपर्कात आला तर तू लाल पडतो त्याच पद्धतीने आपले शरीर सुद्धा वृद्ध होत असते म्हणून ही ऑक्सिडेशन प्रक्रिया थांबविण्यासाठी त्रिफळा चूर्ण आपल्याला मदत करते. यामध्ये अँटी इन्फला मेंटरी गुणधर्म असतात म्हणजेच की शरीरातील कोणत्याही सुजेला दूर करतो. जर आपल्याला ताप आला असेल तर अशावेळी त्रिफळाचूर्ण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो त्याचबरोबर आपल्या शरीरातील वेदना कमी करण्यासाठी सुद्धा हे चूर्ण उपयुक्त ठरते.
त्रिफळा अँटी बॅक्टेरियल असल्यामुळे आपल्या शरीरातील जे काही किटाणू विषाणू आहेत ते नष्ट करण्यासाठी मदत होत असते. नियमितपणे जर आपण त्रिफळा चूर्ण घेतले तर आपल्या पोटातील गॅस , पोटाचे ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होऊन जाते. अनेकांना भूक लागत नाही, काही खाल्ले तरी पोट गच्च भरल्या सारखे वाटत असते अशा वेळी सुद्धा आपल्या पोटातील किटाणू नष्ट करण्यासाठी त्रिफळा चूर्ण महत्त्वाचे ठरते.
जर आपण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत एक चमचा त्रिफळा चूर्ण नियमित पणे घेतले तर आपले पोट पूर्णपणे स्वच्छ होऊन जाते त्याच बरोबर त्रिफळा चूर्ण हे आपल्या शरीराचे डीटॉक्सीफिकेशन करते म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची घाण साचली असेल तर ती घाण बाहेर टाकण्यासाठी मदत करते. हे चूर्ण अन्य चूर्णासारखे नाही.
याची आपल्या पोटाला सवय पडत नाही यामुळे एकदा का आपल्या शरीरातील संपूर्ण घर पूर्णपणे निघून गेली तर आपले शरीर पूर्णपणे नव्याने स्वच्छ होऊन आपल्या शरीरातील इतर अवयव सुद्धा चांगले कार्य करत असतात आणि त्याचा परिणाम यकृत, किडनी यासारख्या अवयांवर भरपूर प्रमाणामध्ये होतो आणि आपल्याला आजार सुद्धा उद्भवत नाहीत म्हणूनच नियमित पणे रात्री झोपताना गरम पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण सेवन करायला हवे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.