हा साधा घरगुती उपाय एकदा नक्की करा; थकवा ,अशक्तपणा कमी, पोट साफ झटपट, झोप चांगली लागते.!

आरोग्य

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बहुतेक वेळा आपल्या सर्वांना उष्णतेचा त्रास होऊ लागतो. दिवसभर उनामध्ये काम केल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढून जाते व आपल्या शरीरातील पाणी कमी होऊन जाते आणि यामुळे अनेकदा उष्माघाताचा त्रास होतो. अनेकांना उष्णतेचा त्रास होत असताना त्याचे परिणाम सुद्धा गंभीर पाहायला मिळतात त्यामुळे आपल्या उष्माघात तर होतोच पण त्याचबरोबर अनेकदा लघवी करण्याची समस्या निर्माण होते.

लघवीच्या ठिकाणी जळजळ होते, लघवी थांबून थांबून होते, शरीरामध्ये आग निर्माण होते ,अशक्तपणा जाणवतो, डोके दुखू लागते यासारखे असंख्य समस्या आपल्याला या दिवसांमध्ये जाणवू लागते म्हणूनच आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी व आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. अनेक वेळा उपाय केल्यावर वर सुद्धा आपल्याला हवा तसा फरक जाणवत नाही म्हणूनच या लेखामध्ये आपण काही असे घरगुती उपाय करणार आहोत जेणेकरून आपल्या शरीरातील उष्णता पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे.

बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये खडीसाखर सहज उपलब्ध असते. ही खडीसाखर त्याच्या समस्या वर रामबाण ठरते कारण की खडी साखर मध्ये शरीराला शीतलता प्राप्त करण्याचे गुणधर्म असतात आणि जर आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खडीसाखर खाल्ली तर आपल्या शरीराचे तापमान सुद्धा नियंत्रण घातले म्हणून पाण्यात ची वाट न पाहता म्हणजेच तहान जर तुम्हाला लागत नसेल तर अशा वेळी खडीसाखर जरूर खा कारण या मध्ये अनेक पोषक तत्त्वे उपलब्ध असल्याने आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता खडीसाखर भरून काढते आणि यामुळे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणात राहते त्याचबरोबर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल वारंवार खोकला असेल अशा वेळी सुद्धा आपली श्वास प्रणाली यंत्रणा नियंत्रित करण्यासाठी खडीसाखर उपयुक्त ठरते.

हे वाचा:   फक्त ५ रुपयात पुन्हा होणारे गचकरण कायमचे दूर करा; आयुष्यात पुन्हा कधीच गचकरणाचा त्रास होणार नाही.!

जर आपण अक्रोड ची पावडर व खडीसाखर एकत्र करून दुधा सोबत घेतली तर आपल्याला शांत झोप लागते आणि ताणतणाव सुद्धा दूर होऊन जातो. त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी बडीशोप लागणार आहे.बडीशोप आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. बडीशोप मध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम इत्यादी महत्त्वाची खनिज सुद्धा या बडीशोप मध्ये उपलब्ध असतात. बडिशोप नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील स्वच्छता सुद्धा होत असते त्याचबरोबर आपली पचनसंस्था योग्य पद्धतीने काम करून अपचन ऍसिडिटी यासारख्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जातात.

उष्णता दूर करण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक ग्लासभर पाणी पातेल्या मध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा बडिशोप आणि एक चमचा खडीसाखर टाकायचे आहे आणि त्यानंतर मंद आचेवर उकळून घ्यायचे आहे त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळायचे आहे आणि आपल्या दिवसभरातून दोन वेळा प्यायचे आहे अशा पद्धतीने जर आपण आठवडाभर जरी उपाय केला तर आपल्या शरीरात जी उष्णता आहे ती कमी होऊन जाणार आहे त्याचबरोबर लघवी करताना त्रास होतो सुद्धा दूर होऊन जाणार आहे.

हे वाचा:   निसर्गाचा चमत्कार आहे हे फळ; पोट साफ होत नसेल,पोटात कळ मारून येत असेल तर असा वापर करा.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.