खरुज, गजकरण, नायटा मुळापासून होईल नष्ट करा फक्त हा एक उपाय. बहुतेक वेळा आपल्या शरीराची स्वच्छता न ठेवल्यामुळे तसेच शरीरावर फंगल इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा आपल्याला खरूज नायटा गजकर्ण यासारख्या समस्या उद्भवत असतात त्याचबरोबर आपण इतरांची कपडे वापरत असल्यामुळे सुद्धा या आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बहुतेक वेळा आपण दुसऱ्यांचे कपडे वापरत असतो पण त्या जर एखाद्या व्यक्तीला कोणता आजार असेल तोच संदर्भात तो आपल्याला माहिती नसते अशा वेळी कपड्याच्या माध्यमातून ते आजार आपल्या शरीरावर वाढू लागतात आणि आपल्याला सुद्धा खरूज नायटा यासारख्या समस्या उद्भवतात.
बहुतेक वेळा शरीराची योग्य ती स्वच्छता न केल्यामुळे आपल्या शरीरावर लाल रंगाचे चट्टे उठतात. अनेक वेळा पुरेशी आंघोळ करण्यासाठी जागा नसल्यामुळे किंवा व्यक्तिगत स्वरूपामध्ये आपल्याला कमरेखालचा भाग स्वच्छ करता येत नसेल तर अशा वेळी ओले कपडे परिधान केल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये किंवा कमरेखाली जांगे मध्ये काखेमध्ये अनेकदा इन्फेक्शन होऊ लागते.
सुरुवातीला जरी या जागेवर खाज होण्यास आपल्याला बरे वाटले असले तरी कालांतराने ती जागा नंतर लाल होऊन जाते व एकदा एकदा ची जागा लाल झाल्यानंतर त्याच्या वेदना सहन करण्या सारखे नसतात म्हणूनच या सगळ्या वेदना व खाज ,खरूज, नायटा दूर करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. या माहितीचा अवश्य वापर करा चला तर मग जाणून घ्याव्यात त्याबद्दल.
हा उपाय करण्यासाठी आपल्या जो पदार्थ लागणार आहे तो पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होऊन जातो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आहेत. या लसणाच्या पाकळ्या आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला मोहरीचे तेल लागणार आहे.
आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे यामध्ये असणारे अँटिबायोटिक अँटीबॅक्टरियल गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म प्राप्त होत असतात त्याचबरोबर आपल्या शरीरावरील जे काही जिवाणू, विषाणू असतात ते पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होत असते त्याचबरोबर यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत.
या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे आपल्या शरीराला त्याचा फायदा होत असतो त्या नंतर आपल्याला तेलामध्ये लसुणाची पेस्ट टाकायची आहे व ती अर्धा-एक तास तसेच ठेवायचे आहे जेणेकरून लसणाचे गुणधर्म त्या तेलामध्ये उतरली पाहिजेत त्यानंतर गायीच्या सहाय्याने हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे व प्रभावी जागेवर लावण्याआधी आधी ती जागा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे त्यानंतरच आपल्याला या तेलाचा उपयोग करायचा आहे.
सुरुवातीला काही काळ तेल लावल्यावर आपल्याला आग होऊ लागेल परंतु नंतर हळूहळू फरक सुद्धा जाणवू लागेल त्याचबरोबर तुम्ही जर नियमितपणे त्रिफळा चूर्ण सेवन केले तर तुमच्या शरीरातील जी घाण आहे व कोणतेही इन्फेक्शन असेल तर ते पूर्णपणे नष्ट होऊन जाण्यास मदत होणार आहे , अशा पद्धतीने आपण हा उपाय तयार झालेला आहे हा उपाय अवश्य करा आणि आपली पुढची संदर्भात कोणतेही आजार असतील ते नष्ट करावे.