सध्या ही एक काडी 1 वेळ तरी घ्या; फुफ्फुसे निरोगी रहातील, श्वसन नलिका साफ होऊन कोरडा खोकलाही निघून जाईल.!

आरोग्य

बदललेल्या वातावरणामुळे आपल्याला सर्दी, खोकला, कफ निर्माण होऊ लागतो परंतु अनेकदा अनेक औषधे घेऊन सुद्धा आपला खोकला काही बरा होत नाही. अनेकदा खोकला वारंवार येत असतो परंतु आपल्या शरीरातून खूप कफ काही बाहेर पडत नाही अशा वेळी याला आपण कोरडा खोकला होत असतो. खोकल्याचे तसे पाहायला गेले तर वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत आणि त्याचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळे उपाय सांगण्यात आलेले आहे.

कधी कोरडा खोकला असतो, कधी पित्ताचा खूप खोकला असतो असे अनेक प्रकार या शास्त्रांमध्ये सांगितले गेले. अनेकदा भरपूर औषध करून सुद्धा कोरडा खोकला काही जात नाही अशा वेळी जर आपल्याला खोकला आला तर छातीमध्ये दुखू लागतो, जळजळ होऊ लागतो अशा वेळी अनेक समस्या सुद्धा आपल्याला भोगावे लागतात म्हणूनच ही समस्या दूर करण्यासाठी आज आपण या लेखांमध्ये महत्त्वाचा असा एक उपाय जाणून घेणार आहोत.

हे वाचा:   कफ, गॅस, अपचन, गॅस, ऍसिडिटी चे घरगुती औ'षध सापडले, आता याचा त्रास कधीच होणार नाही..! एकदा जाणून घ्याच

या उपायांमध्ये सांगितलेला घटक पदार्थ अतिशय उपयुक्त असून त्याचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व सांगण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्येष्ठमध लागणार आहे .ज्येष्ठ मध मध्ये आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये सांगितले गेले महत्त्वाचा एक घटक पदार्थ आहे. हा पदार्थ आपल्याला गावी आजीच्या बटव्यात मधील सहज पाहायला मिळतो आणि आयुर्वेदिक दुकानांमध्ये सुद्धा हा पदार्थ तुम्हाला सहज उपलब्ध सुद्धा होऊन जाईल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी संध्याकाळी दिवसभरात दोन वेळा ज्येष्ठमध ची काडी खायची आहे किंवा ज्येष्ठमधाची पावडर खाल्ली तर तुम्हाला तुमच्या कोरड्या खोकल्यावर उपाय सापडणार आहे. तुम्ही हा उपाय अन्य पद्धतीने सुद्धा करू शकता. पाण्यासोबत किंवा दुधामध्ये दिवसभरातून दोन वेळा जरी प्यायले असतील काही दिवसातच तुमचा खोकला पूर्णपणे नष्ट होऊन जाईल म्हणून हा उपाय अवश्य करा.

हा उपाय केल्याने तुमच्या खोकला दूर होणारच आहे त्याचबरोबर तुमची छाती सुद्धा जळजळ करण्याची थांबणार आहे. आणि म्हणूनच सध्याच्या दिवसांमध्ये खोकल्यासाठी ज्येष्ठ मध अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे कारण की अनेकदा खोकला भरपूर प्रमाणामध्ये वाढल्यावर त्याचा आपल्या छातीवर व फुफ्फुसांच्या वर सुद्धा परिणाम होतो.

हे वाचा:   ही 4 पाने वापरा आणि जगा संसर्गा विना जीवन; ऑक्सिजन 100 साठी संजीवनी.!

अनेकदा क्षयरोग सारखे आजार सुद्धा आपल्याला उद्भवण्याची शक्यता असते म्हणून जर आपण वेळेत वरच या खोकल्यावर उपचार केला नाही तर अन्य आजारांना आपण बळी ठरू शकतो म्हणून या लेखांमध्ये सांगितलेला उपाय अवश्य करा आणि आपले जीवन निरोगी बनवा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.