पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याचे नियम; तरच मिळेल पूजेचा पूर्ण लाभ.!

अध्यात्म

पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसेच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठे महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे त्याचबरोबर स्वतः ईश्वर यांनी सांगितले आहे की सर्व विषयांमध्ये पिंपळाच्या वृक्षांमध्ये निवास करणार आहे म्हणूनच अनेक जण पिंपळाची नियमितपणे पुजा करत असतात म्हणूनच पिंपळाच्या झाडाला विष्णू देवाचे वृक्ष सुद्धा म्हटले जाते. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अनेक संकटे दुःख अडचणी दूर होत असतात.

पिंपळाच्या झाडाखाली दरिद्रता देवी बसलेली असल्यामुळे पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये किंवा पिंपळाच्या झाडाखाली बसून सुद्धा नये. असे मानले जाते की शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडा मध्ये श्रीविष्णू यांचा वास असतो म्हणून शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारून व स्पर्श करून नमस्कार करावा, असे केल्याने विशेष देवांना स्पर्श केला याची आपल्याला पुण्य मिळते. असे म्हटले जाते पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याची सुद्धा काही नियम आहे.

जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे असेल तर ते सूर्योदयापूर्वीच अर्पण करायला हवे त्याचबरोबर आपण पिंपळाला नैवेद्य म्हणून एखादे फळ खडीसाखर सुद्धा देऊ शकता. जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणार आहोत या जलामध्ये थोडीशी खडीसाखर व गूळ जरूर मिक्स करावा आणि शक्यतो सूर्योदयाच्या पूर्वी जल अर्पण करावे जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असेल तर सूर्योदयापूर्वी तुम्ही लावू शकता जर सूर्योदयापूर्वी दिवा लावणे शक्य झाले नाही तर तुम्ही संध्याकाळी सूर्यास्ताच्या नंतर दिवा लावू शकतात.

हे वाचा:   हाता-पायाची नखे का'पून, या झाडाच्या खोडाजवळ टाका, दुनिया तुमच्या तालावर नाचेल...प्रभावी उपाय

असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व वाईट शक्ती ग्रहदोष बाधा संपूर्णपणे नष्ट होतात. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून शनिदेवांचा मंत्र म्हणजे ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह दोष पूर्णपणे नष्ट होतात व त्याचबरोबर आपल्यावर शनि देवाची चांगली कृपा होण्यास मदत होते त्याचबरोबर शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात त्यामुळे तुमच्यावर भगवान विष्णू यांची कृपा होईल.

असे केल्याने आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ,आर्थिक अडचणी आहेत त्या लवकरच दूर होतील. पिंपळाच्या झाडा मध्ये पितरांचे वास असतो असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच पिंपळाची पूजा करतांना अनेक देवी-देवतांना बरोबर आपल्याला पितरांचे आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतात. महिलांनी पिंपळाची पूजा करत असतांना पिंपळाला हळद-कुंकू वाहावे परंतु पुरुषांनी हळद-कुंकू वाहून नये.

पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला गंध वाहावा व त्याचबरोबर पिंपळाची पूजा करत असताना पिंपळाला प्रदक्षिणा सुद्धा आवश्यक झाला 5,7 ,11 तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे प्रदक्षणा तुम्ही घालू शकाल त्याचबरोबर जर प्रदक्षिणा घालने शक्य नसेल तर तुम्ही स्वतः भोवती फिरुन प्रदक्षणा करू शकतात. प्रत्येक प्रदर्शनाच्या वेळी पिंपळाच्या झाडाच्या नमस्कार आवश्य करा.

पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला कोणतेही देवी-देवतांचे मंदिर असेल तर त्या देवी देवतांची पूजा सुद्धा अवश्य करा. पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना आपण कोणत्याही तेलाचा दिवा लावू शकतो परंतु पिंपळाच्या झाडाला सूर्यास्तानंतर दिवा लावताना शक्यतो राईच्या तेलाचा दिवा लावा. रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचे कधीच पूजन करू नये व पिंपळाच्या झाडाला स्पर्श सुद्धा करू नये.

हे वाचा:   घरात तिजोरीवर यापैकी 1 वस्तू ठेवा; घरात धनाची समस्या कधीच राहणार नाही.!

कारण की पिंपळाच्या झाडाखाली दारिद्रता देवी बसली असल्यामुळे जर आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श केला तर ती दारिद्रता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्याला आपल्या जीवनातील शनी दोष दूर करायचा असेल तर पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करताना त्यामुळे थोडीशी खडीसाखर व गूळ टाकून ते पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करा यामुळे तुमच्या जीवनातील शनि दोष पूर्णपणे नष्ट होऊन जाईल व त्याच बरोबर शनिदेव यांची तुमच्यावर कृपा होईल. रविवारच्या दिवशी आपण लांबूनच पिंपळाच्या झाडाला नमस्कार करू शकतो. अशाप्रकारे सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतल्याने आपल्या जीवनातील बाधा दोष सर्व पूर्ण दूर होतात आणि आपले जीवन आनंदी आनंद होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.