सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण घाबरलेला आहे. प्रत्येक जण आपले ऑक्सिजनची पातळी चेक करण्यासाठी अनेक वस्तू वापरत असतो आणि पहिल्यांदाच प्रत्येक जण आपल्या ऑक्सिजनची पातळी किती आहे याचा विचार करू लागलेला आहे. सध्या निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत भयानक आहे त्याच्यामुळे प्रत्येक जण चिंतित झालेला आहे .
प्रत्येक जण आपल्या श्वासाची मात्रा कशी नियंत्रणात राहील ऑक्सीजन लेवल कशी चांगली राहील याचा विचार करू लागलेला आहे त्यामुळे जर आपल्या ऑक्सिजनची लेवल 95 पेक्षा जास्त असेल तर कोणतीच काळजी करण्याचे कारण नाही परंतु 95 पेक्षा जर कमी असेल तर आपल्याला विविध आजार होण्याची शक्यता सुद्धा निर्माण होऊ शकते अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे कारण की जर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते.
अशावेळी आपल्या शरीराची परिस्थिती खालावत जाते म्हणूनच आपल्या शरीराची परिस्थिती चांगली राहण्याकरता रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहण्याकरता काही पदार्थांचे सेवन करणे सुद्धा गरजेचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशी काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. जेणेकरून आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणामध्ये राहील. म्हणूनच आपल्याला काही पदार्थांचे सेवन करणे अतिशय गरजेचे आहे त्यामधील सर्वात महत्त्वाचा पहिला पदार्थ म्हणजे आवळा.
आवळा हा आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम मानला गेलेला आहे त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आवळ्याला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे. आवळ्यामध्ये असे काही पोषक तत्त्व व घटक उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली बनते व त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये निर्माण होत असते तसेच आवळा मध्ये विटामिन सी ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते.
आपण आवळ्याचा उपयोग अनेक पद्धतीने करू शकतो. आवळा आपल्याला आवळ्याची पावडर सुद्धा आपल्याला बाजारात मिळते. आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचे लोणचे, आवळ्याची कॅन्डी उकडलेल्या आवळा इत्यादी प्रकारामध्ये आपण आवळ्याचे सेवन करू शकतो. नियमितपणे आवळा खाल्ल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होत असते त्यानंतर दुसरा पदार्थ आहे म्हणजे लसूण.
लसूण हा आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो यामध्ये उपलब्ध असणारे एंटीऑक्सीडेंट या गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील जे काही घटक आहे ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा मदत होत असते त्याचबरोबर लसूण नियमितपणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील सर्दी-खोकला इत्यादी समस्या लवकर दूर होण्यास मदत होते. लसुन मध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असल्यामुळे त्वचेचे रोग, सर्दी ,खोकला ,घसा संबंधित जे काही आजार असतात ते दूर होण्यासाठी मदत होतात.
दही हा आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा स्रोत मानला जातो. दही मध्ये अनेक असे गुण उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्याचबरोबर दही मध्ये व्हिटॅमिन सी ,व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात उपलब्ध असते यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते त्यानंतरच्या पदार्थ आहे म्हणजे केळी. केळी ही सर्व हगांममध्ये उपलब्ध असते केळी खाल्ल्याने आपल्या शरीराचा थकवा दूर होतो आणि त्याच बरोबर केळीमध्ये विटामिन सी असल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.
काकडी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते त्याचबरोबर काकडीमध्ये प्रोटीन, लोह ,फायबर भरपूर प्रमाणे मध्ये उपलब्ध असते त्याचबरोबर काकडी खाल्ल्याने आपले पोट सुद्धा स्वच्छ होत असेल त्यामुळे आपल्या शरीरातील जे काही विषारी घटकाचा ते सुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. लिंबू हे आपल्या शरीरासाठी अतिशय लाभदायक ठरतात.
लिंबू मध्ये असणारे ऍसिडमुळे आपल्या शरीरातील पाचक संस्था अतिशय चांगली बनते त्याचबरोबर लिंबू मध्ये विटामिन सी भरपुर प्रमाणे मध्ये असतात म्हणूनच हल्लीच्या दिवसांमध्ये लिंबू सरबत पिण्याचा अनेकांना सल्ला दिला जातो जेणेकरून आपल्या शरीराला ऊर्जा मिळावी त्याच बरोबर लिंबू सरबत लिंबू पाणी प्यायल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यास मदत होते त्यानंतरचा महत्त्वाचा पदार्थ आहे म्हणजे कडधान्य.
मोड आलेले कोणतेही कडधान्य जर आपण नियमितपणे आपल्या जेवणामध्ये समावेश केला तर आपल्याला त्यांच्याद्वारे भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन उपलब्ध होतं आणि सध्याच्या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये प्रोटीन की मात्रा असणे गरजेचे आहे कारण की यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील हाडे सुद्धा मजबूत राहतात म्हणूनच आपले शरीर निरोगी ठेवायचे असेल त्याच बरोबर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची मात्र व्यवस्थित आपल्याला ठेवायचे असेल तर या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज व्यायाम योगा ध्यान इत्यादी गोष्टी जरी केल्या तरी तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.