अनेकांना सांधेदुखी ,गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारख्या समस्या वारंवार उद्भवत असतात. या समस्येवर मात करण्यासाठी आपण अनेक प्रकारची औषधे उपचार सुद्धा करत असतो परंतु या सर्व औषधोपचारांचा आपल्याला हवा तसा फरक पडत नाही. अनेकदा त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतो म्हणूनच आपल्या शरीरावर चांगला उपयोग करून देणारा अगदी घरगुती व आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा सांगितला गेलेला असा एक महत्त्वाचा उपाय आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
त्याचबरोबर बहुतेक वेळा आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे आपल्याला हाडा संबंधित समस्या निर्माण होत असतात परंतु हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये कॅल्शिअमची कमतरता भरून निघणार आहे व त्याचबरोबर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनणार आहे म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वनस्पतीचा वापर करायचा आहे.
ही वनस्पती नेमकी कोणती आहेत? त्या वनस्पतीचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे? याबाबत या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत..चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..
सांधेदुखी, गुडघेदुखी यासारखे समस्येवर उपाय करण्यासाठी आपण अनेक पदार्थ वापरत असतो परंतु आजच्या या लेखामध्ये आपण आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दूध वापरणार आहोत. हा उपाय करण्यासाठी जर तुमच्याकडे शेळीचे दूध असेल तर उत्तमच जर नसेल तर आपण गाईचे किंवा म्हशीचे दूध वापरू शकतो.
दुधामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम उपलब्ध असते आणि हे कॅल्शियम आपल्या शरीरातील हाडांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. नियमितपणे दूध प्यायलाने आपल्या शरीरातील हाडे मजबूत राहतात व त्याचबरोबर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहते त्याचबरोबर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक वनस्पती वापरायची आहे ती वनस्पती आपल्या आजूबाजूला अनेकदा उपलब्ध असते.
परंतु त्या वनस्पतीचे औषधी गुणधर्म माहिती नसल्यामुळे आपण त्या वनस्पती कडे दुर्लक्ष करत असतो त्या वनस्पतीचे नाव आहे मोह. मोह या झाडाला सध्याच्या हंगामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फुले येत असतात. या फुलांचा वेगवेगळे उपाय सुद्धा सांगण्यात आलेला आहे. ही फुले मोहन वर्धक ,शितल तयार करणारे, आपल्या शरीरातील उष्णता कमी करणारे असतात.
या फुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, कॅरेटिन त्याचबरोबर सुक्रोज ,ग्लुकोज फ्रुक्टोज व आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा देणारे अन्य घटक सुद्धा उपलब्ध असतात. म्हणूनच बहुपयोगी असणारी ही मोहाची फुले आपल्याला हा उपायासाठी वापरायचे आहेत.
ही फुले आपल्याला दुधामध्ये टाकुन चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायची आहेत जेणेकरून या फुलांचा अर्क दुधामध्ये उतरेल त्यानंतर आपल्याला पाण्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे आणि रात्री झोपायच्या आधी एक ग्लासभर दूध प्यायचे आहे असे नियमित पंधरा दिवस जरी केले तरी आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे निघून जाणार आहे त्याच बरोबर तुम्हाला कधीच अशक्तपणा जाणवणार नाही व गुडघे दुखी कंबर दुखी यासारख्या अनेक समस्या सुद्धा भविष्यात कधीच होणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.