फुफ्फुस १००% स्वच्छ, ऑक्सिजन लेवल नेहमी राहील १००, कफ खोकला मिनिटांत होईल गायब.!

आरोग्य

आज च्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाचे उपाय घेऊन आलेलो आहोत. या उपायांमुळे तुमच्या शरीरामध्ये जर सर्दी ,खोकला, कफ झाला असेल तर तो मुळापासून नष्ट होणार आहे. जर आपल्या शरीरामध्ये कफ तयार झाला असेल तर त्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसावर होत असतो आणि परिणामी ऑक्सिजन निर्मिती व सुद्धा कमी होत असतो आणि अनेकांना श्वास घ्यायला त्रास सुद्धा होत असतो.

जर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी 95 पेक्षा जर कमी झाली तर आपल्याला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि अनेकदा फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होत असल्यामुळे सुद्धा शरीरामध्ये ऑक्सिजनचा निर्मिती कमी होत असते. सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. या परिस्थितीमध्ये अनेकांना ऑक्सीजन निर्मितीची समस्या होत आहे आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होत आहे म्हणूनच आजच्या लेखासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

हा उपाय केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहणार आहे आणि त्याचबरोबर आपले जे फुप्फुस आहेत तेसुद्धा चांगले कार्य करणार आहेत आणि जर त्यांना फुफ्फुसांची कोणत्याही पद्धतीचे इन्फेक्शन झाले असेल तर त्यांच्या पासून आपले संरक्षण होणार आहे. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोहाची फुले लागणार आहे. मोहाची फुले ही कफनाशक आहेत यामुळे आपल्या छातीमध्ये साचलेला कफ लवकर बरा होतो.

हे वाचा:   फक्त १ कांदा ३ दिवसात संपवेल केसांच्या सर्व समस्या; ९९% लोकांना माहिती नसलेला उपाय.!

त्याचबरोबर मोहाच्या फुलांमध्ये कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडंट पदार्थ भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. फुप्फुसांची स्वच्छता चांगल्या पद्धतीने होते त्याच बरोबर जर आपला घसा खवखव करत असेल तर आपला घसा सुद्धा चांगला राहतो. हा उपाय करण्यासाठी आपण जे काही पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ अगदी औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा आपल्याला लवकर फायदा होणार आहेत.

हे पदार्थ आपल्याला आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतात. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वाळलेली मोहाची फुले घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये पिंपळी पावडर आपल्याला ऍड करायची आहे. पिंपळी पावडर ही जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा खोकला झाला असेल तर तो खोकला दूर करण्यासाठी व कफ पातळ करण्यासाठी पिंपळी पावडर महत्त्वाची ठरते नंतर आपल्याला आल्याचे तीन चार तुकडे घ्यायचे आहेत. आले आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते.

आल्या मध्ये उष्णता व गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला काळी मिरी चा उपयोग करायचा आहे . काळीमिरी हे शरीरासाठी उष्णता वर्धक, कफवर्धक व एंटीऑक्सीडेंट युक्त असे मानले गेलेले आहेत. हे सगळे पदार्थ एकत्र करून आपल्याला एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून ते पाणी गॅसवर गरम करायला ठेवायचे आहे.

हे वाचा:   फक्त एक मिनिट पुरेसा आहे या उपायासाठी; भयंकर ऍसिडिटी पासून सुटका मिळवण्यासाठी करा हा उपाय.!

हे मिश्रण चांगल्या पद्धतीने गरम झाल्यानंतर गाळणी च्या सहाय्याने गाळायचे आहे परंतु त्यापूर्वी या मिश्रणामध्ये आपल्याला एक पदार्थ टाकायचा सुद्धा आहे तो म्हणजे गुळ. गुळ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असते यामध्ये लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्याने आपल्या शरीरातील व रक्तातील ऑक्सिजन पातळी चांगली राहते.

त्यानंतर हे सगळे मिश्रण व्यवस्थित उकळल्यानंतर आपल्याला एका ग्लासमध्ये काढायचे आहे आणि हे मिश्रण दिवसभरातून दोन वेळा सकाळ-संध्याकाळ जरी आपण आठवडाभर प्यायल्याने आपल्या शरीरातील संपूर्ण घाण पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पात्रता वाढणार आहे आणि तुमच्या फुफ्फुसांमध्ये जी घाण व कफ साचलेला आहे तो पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे. अशा प्रकारे हा अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आहे जरूर करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.