फक्त 1 चमचा टाका हि 1 वस्तू; चेहऱ्यावर वांग येण्याची समस्या पुन्हा कधीच येणार नाही.!

आरोग्य

अनेकदा स्त्रिया, महिला, तरुणी चेहऱ्यावर काळे डाग व वांग निर्माण झाल्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होत असते आणि ही समस्या अनेकदा आपल्या तणावाचे कारण सुद्धा बनवून जाते. अनेकदा रासायनिक उत्पादनाच्या वापरामुळे आपल्या चेहऱ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो परंतु आजच्या या लेखामध्ये आपण घरगुती उपाय जाणून घेणार आहोत आणि हा उपाय घरच्या घरी केल्यामुळे त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्याला जाणवणार नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पदार्थ लागणार आहे आणि या पदार्थाचे नाव आहे लोणी. आपल्या सर्वांच्या घरी तूप बनवले जाते आणि हा उपाय बनवत असताना लोणी सुद्धा बाहेर येत असते. या लोणी चा उपयोग आपल्याला आजच्या उपाय करण्यासाठी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी बाहेरून लोणी आणायची नाही.

हे वाचा:   केसांच्या सर्व समस्या मेथीचे दाणे संपवतील..पातळ केस जाड व दाट, कसे गळणे बंद, डोक्याची खाज, कोंडा गायब..

घरच्या घरी तयार केली जाणारी लोणी या उपायासाठी वापराची आहे त्यानंतर दुसरा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे तो म्हणजे गुळ. गुळ हे आपल्याला रासायनिक वापरायचा नाही सेंद्रिय पद्धतीने उपलब्ध होणाऱ्या गुळा चा वापरच हा उपाय करण्यासाठी करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे लोणी, एक चमचा गूळ आणि थोडेसे मध घ्यायचे आहे.

जर तुम्हाला बोरांची पावडर जर उपलब्ध झाली तर ती सुद्धा तुम्ही या उपायासाठी करणार आहेत बोरांच्या आतील जो भाग असतो तो चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतो. हे सर्व पदार्थ एकत्र करून त्याची पेस्ट बनवायचे आहे आणि जेथे जेथे आपल्याला चेहऱ्यावर काळे डाग व वांग आहेत अशा ठिकाणी ही पेस्ट लावायची आहे.

हे वाचा:   या वनस्पतीला फक्त कचरा समजू नका; मुळव्याधाचे मुळच नाहीशे करते ही वनस्पती...फायदे बघून आश्चर्य वाटेल

अनेकदा डिलिव्हरीनंतर अनेक महिलांना वांग येण्याची समस्या निर्माण होऊ लागते, अशावेळी हा उपाय केल्याने वांग कमी होण्यास मदत होते. हा उपाय आपण नियमितपणे केला तर आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि वाघ लवकरच दूर होतील व आपला चेहरा तजेलदार व सतेज दिसू लागेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.