आपण आजूबाजूला पाहतो की अनेक तरुण-तरुणींच्या पायामध्ये काळे धागे बांधलेल्या आपल्याला दिसतात. आपल्याला वाटते की तशी फॅशन आहे म्हणून पायामध्ये काळे धागे घातली जातात. काही अंशी खरे सुद्धा आहे, अनेकदा काळा धागा आपल्या पायामध्ये दिसायला सुंदर व आकर्षक सुद्धा दिसतो. पायात काळा धागा बांधण्याचे हे जरी फॅशन स्टेटमेंट असले तरी त्यामागे हिंदू धर्म शास्त्रामध्ये काही महत्त्वाची कारणे सांगण्यात आलेली आहेत.
हिंदू धर्म शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की एखाद्या शनिवारी योग्य मुहूर्त पाहून व्यक्तीने आपल्या उजव्या पायामध्ये काळा धागा बांधला असता च्या घरी माता महालक्ष्मी आगमन करत असते तसेच अशा व्यक्तीवर माता महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीच्या आर्थिक समस्या सुद्धा नष्ट होतात म्हणून ज्या व्यक्तीची परिस्थिती अतिशय बिकट असते ,आर्थिक संकट याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर येत असते . अशा व्यक्तीला शनिवारी पायामध्ये काळा धागा बांधण्याची सांगितले जाते यामुळे व्यक्तींच्या आर्थिक समस्या सुटतात.
काही व्यक्तींना वारंवार पोट दुखीची समस्या असते. पोटदुखी कोणतेही कारण नसताना उद्भवत असते म्हणजेच त्यामागे कोणते विशिष्ट असे कारण नसते. अनेकदा हे दुखणे सहन होण्यासाठी नसते अशा वेळी उजव्या पायाच्या अंगठ्याला काळा रंगाचा धागा किंवा कोणत्याही रंगाचा धागा बांधावा, असे केल्याने आपले पोट दुखी लवकर थांबते. हा उपाय ॲक्युप्रेशर या तंत्र पद्धती मध्ये मानला जातो यामुळे आपल्या पोटावरील ॲक्युप्रेशर चे काही पॉईंट दाबले जातात म्हणून हा प्रभावी असा उपाय आहे.
काही महिलांना मासिक पाळी मध्ये पोट दुखी प्रचंड प्रमाणामध्ये होत असते यामुळे सुद्धा पोट दुखी कमी होते. अनेक व्यक्तींना पायाला जखम झालेली असते ती जखम लवकर भरत नाही , वारंवार त्याच जखमेच्या आजुबाजूला दुसरे जखम होत असते अशा वेळी सुद्धा त्या व्यक्तीला उजव्या पायामध्ये काळ्या रंगाचा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो.
आणि लहान मुलांना तसेच मोठ्या व्यक्तींना कोणाचीही नजर लागू नये यासाठी पायामध्ये काळा धागा बांधण्याची पद्धत प्राचीन काळापासून आपल्याकडे चालू आहे. काळा रंग हा शनिदेवाचा आवडता रंग असल्यामुळे आपल्यावर शनि देवाची कृपा रहावी यासाठी अनेक व्यक्ती आपल्या उजव्या पायामध्ये काळा रंगाचा धागा परिधान करतात. पायात धागा बांधल्याने व्यक्तीच्या आजूबाजूला नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाते.
जर आपल्याला पायामध्ये काळा धागा बांधायचा असेल तर मंगळवार किंवा शनिवारी हा धागा बांधावा परंतु हा काळा पायामध्ये बांधत असतांना त्यापूर्वी हनुमान च्या मंदिरात जाऊन मूर्ती समोर त्या धाग्याची पूजा करावी मग हा धागा पायामध्ये बांधला व त्याचा अधिक परिणाम जाणवतो. चला तर मग आपण सुद्धा आपल्या उजव्या पायामध्ये काळा रंगाचा धागा बांधून आपल्यावर माता महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ या आणि आपले जीवन अधिक समृद्ध बनवूया.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.