हा उपाय करा आणि घरच्या घरी डासांपासून नैसर्गिक पद्धतीने सुटका करा . आज आम्ही तुमच्यासाठी जर तुमच्या घरा मध्ये डास झाले असतील,मच्छर झालेली असतील या सर्वांचा सुटका करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपाय घेऊन आलेलो आहोत हा उपाय अगदी साधा सोपा आणि घरगुती आहे.
हा उपाय केल्याने घरातील डास कधी निघून गेले की तुम्हाला कळणार नाही. मच्छर चावल्यामुळे मलेरिया , हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता असते त्याचबरोबर हे मच्छर, माशा पळवण्यासाठी आपण अनेक रासायनिक युक्त पदार्थांचा सर्रास वापर करत असतो. हे पदार्थ वापरल्यामुळे अनेकदा आपल्याला ॲलर्जी होऊन वेगवेगळे आजार होण्याची सुद्धा शक्यता निर्माण होत असते.
अनेकदा या रासायनिक पदार्थांचा लहान मुलांच्या स्मरणशक्तीवर तसेच मोठ्या माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो म्हणूनच डास पासून दूर राहून घरच्याघरी एक सर्वात चांगला उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या शेणाच्या गौऱ्या करायचे आहेत.
त्याचबरोबर एक चमचा गायीच्या साजूक तूप व चार ते पाच पुदिनाचे पाने आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला हे तूप चांगल्या पद्धतीने गरम करून घ्यायचे आहे व त्यात पुदिन्याची पाने सुद्धा टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला भीमसेनी कापुर हा उपाय करण्यासाठी लागणार आहे. भीमसेनी कापूर च्या सहाय्याने घरातील मच्छर लवकर पळून जातात.
हा भीमसेनी कपूर तुम्हाला आयुर्वेदिक औषधांचा स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर ची पावडर तयार करायचे आहे त्यानंतर उपाया साठी ज्या गौर्या घेतलेल्या आहेत आहेत त्यावर गरम केलेले तूप व पुदिन्याचे पाने टाकायची आहे. त्यानंतर गॅस शेगडी वर थोड्यावेळ गौर्या जाळायचे आहेत त्यानंतर थोडासा धूर निर्माण झाल्यावर त्यावर आपल्याला एक चमचा भीमसेनी कापूर पावडर टाकायचे आहे.
अशा पद्धतीने आपला घरगुती उपाय तयार झालेला आहे. या निर्माण झालेल्या धुरामुळे आपल्या घरातील डास लवकर निघून जातील. एकदा का घरात धूर निर्माण झाला की आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजे बंद करायचे आहेत. हा उपाय तुम्ही नियमितपणे केल्यास तुमच्या घरातील सर्व डास माशा लवकर पळून जाण्यास मदत होईल. हा उपाय तुम्ही रात्री झोपताना बेडरूममध्ये केला तरी चालेल. हा उपाय घरगुती आणि नैसर्गिक असल्यामुळे त्याचा कोणताच दुष्परिणाम नाही म्हणूनच तुमच्या आरोग्याला कोणत्याच प्रकारचा धोका या उपायांमुळे होणार नाही म्हणूनच हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.