आपल्या घरातील या दिशेचा कोपरा ला हिरवा रंग आणि सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. लग्न झाल्यानंतर अनेक महिला त्यांच्या हातामध्ये किंवा रंगाच्या बांगड्या घालतात तसेच अनेक स्त्रिया हिरव्या रंगाच्या साड्या सुद्धा नेसतात यामागे नेमका काय अर्थ आहे ? हिंदु शास्त्र काय सांगते ? या सर्व गोष्टी आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला लग्नानंतर हाता मध्ये हिरवा चुडा परिधान करतात यामुळे त्यांचे सौभाग्य वृद्धी होते आणि त्यांच्या पतीच्या आयुष्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्म शास्त्र मानते म्हणूनच लग्नानंतर महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या जरूर घालाव्यात त्याबरोबर हिरव्या रंगाची साडी सुद्धा परिधान करावी यामुळे फक्त पतीचे आयुष्य वाढत नाही तर सासर व माहेर यांचे आयुष्य सुद्धा वाढते आणि सर्वात म्हणजे आपल्या पतीचे संरक्षण करण्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद मानला जातो.
हा आशीर्वाद आपल्याला निसर्ग देवतेकडून प्राप्त होत असतो म्हणूनच हिरव्या रंगाचा आणि निसर्गाचा जवळचा संबंध आहे. महिला आणि निसर्गाचे एक महत्त्वाचे नाते तयार होते. ज्या व्यक्तींना आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा व्यक्तीच्या घरातील महिलांनी हिरव्या साडीचे परिधान करणे आवश्यक आहे यामुळे आपली प्रगती होते याचे कारण असे की हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे.
जर आपल्याला व्यवसाय धंदा मध्ये यश मिळवायचे असेल तर आपला दुराग्रह मजबूत असायला हवा. बुध ग्रहाचा संबंध हा व्यापाराशी येतो. जर तुम्हाला बुद्ध ग्रहाला प्रसन्न करायचे असेल तर हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा त्याचबरोबर भगवान शिवशंकर आणि निसर्ग यांचे महत्त्वाचे असे नाते आहे म्हणूनच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायची असेल तर घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायला हव्यात.
आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतील, अनेक वाद निर्माण होत असतील तर अशा वेळी आपल्या घरातील अग्नेय दिशेला आपल्याला हिरव्या रंगाने रंगवायचे आहे. असे केल्याने आपले वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील आणि ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होऊन जातील. म्हणूनच हिरवी साडी, हिरवी बांगडी आणि आपल्या घरातील अग्नेय कोपरा हिरव्या रंगाने केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन आपल्या इच्छा लवकरच पूर्ण होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.