हे आहेत बेहडा वनस्पतीचे औषधी उपयोग; फायदे ऐकून पायाखालची जमीनच सरकेल.!

आरोग्य

ही वनस्पती आहे बेहडा. मराठवाडय़ात या वनस्पतीला गोठफळ असे सुद्धा म्हणतात. वनस्पतीला प्रदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. ही वनस्पती आपल्याला संपूर्ण भारतामध्ये सहज उपलब्ध होते. खरंतर त्रिफळा चुरणामधील अविभाज्य घटक म्हणून बेहडा ला ओळखले जाते. याचे झाड खूपच आकाराने मोठे असते आणि शंभर फूट एवढी लांबीला असते. याचे पाने गुच्छता स्वरूपामध्ये पाहायला मिळतात तसेच या फळाची साल ही भुरकट रंगाचे असते.

या वनस्पतीची पाने पिवळसर व हिरवट रंगाचे असतात. या फुलांना उग्र असा वास असतो.झाडाचा औषधी गुणधर्म खरं त्याच्या फळांमध्ये असतो. या झाडाला भरपूर प्रमाणे मध्ये मध्ये फळे येत असतात. फळांचा आकार अंडाकृती असून भुरकट रंगाचा असतो. फळावरील जो वरील भाग असतो तो औषधांमध्ये वापरला जातो. या फळांमध्ये जी बी असते ती फोडल्यानंतर त्यामध्ये गर असतो.

हा गर खायला चवीला काजू सारखा लागतो. हा गर जर जास्त प्रमाणात खाल्ला तर गुंगी येण्याची शक्यता सुद्धा असते शिवाय डोकेदुखीचा त्रास वाढत जातो. बेहड्याच्या पावडरचा उपयोग प्रामुख्याने घशाचे विकार असतात तसेच कफप्रधान विकार असतात ते विकार दूर करण्यासाठी केला जातो. जुना श्वास घेण्यास संबंधित व खोकल्याचा आजार असेल तर तो दूर करण्यासाठी बेहडा पावडर मदत करतो. जर तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास असेल तर अशावेळी बेहड्याचा पावडर सोबत मध खाल्ल्यास खोकला लवकर बरा होतो.

हे वाचा:   वयाच्या चाळीशी नंतर सुद्धा आपला स्टॅ-मिना वाढवण्यासाठी हा आहार घ्या, प्रत्येक पुरुषाने या पदार्थाचे सेवन हे केले पाहिजे. .

जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल, खाल्लेले पचत नसेल तर जेवण झाल्यानंतर वेड्याची पावडर एक ग्लास पाण्यामध्ये घेतल्यास पोट व पचनसंस्था काही समस्या आहेत त्या लवकर दूर होतात. बेहड्याच्या बियाचे तेल सुद्धा काढतात. या बियांचा पासून बनवलेले तेल यामुळे केस गळतीची समस्या ,केस पातळ झाले असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो शिवाय हे तेल सांधेदुखीवर सुद्धा रामबाण औषध ठरते.

आपल्या घशाचा दाह होत असेल तर अशा वेळी बेहड्याची टरफले फक्त चघळली तरी आपल्याला लवकर फरक पडतो. जर तुम्हाला सतत उचकी येण्याचा त्रास असेल तर अशावेळी बेहाडा याच्या बिया मधील गर चाटावा. ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा व्यक्तींनी बेहडाच्या सालीचा चूर्ण म्हणून वापर करावा.जर तुमची नजर कमजोर असेल यासाठी सुद्धा बेहडा चूर्ण उपयोगी पडते.

हे वाचा:   फक्त ही पावडर वापरा आणि मुलांची उंची वाढवा; त्याच बरोबर पुरुषांची ताकद सुद्धा वाढेल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.