आयुर्वेदातली खूपच शक्तिशाली आहेत हि फुले; उष्णता मुळव्याध ,पित्त,अंगाची खाज ,अल्सर झटकन होईल कमी.!

आरोग्य

आयुर्वेद शास्त्र मधील सर्वाधिक शक्तिशाली अशीही फुले आहेत. ही फुले शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी महत्वाची ठरतात. प्रचंड प्रमाणामध्ये वीर्य व शुक्राणू संख्या वाढवणारी ही फुले आहेत. सर्दी खोकला तसेच सायनस ,पोट दुखी, अंग दुखी ,घरघर होणे ,अंगावर खाज येणे कोणत्या प्रकारचा त्वचाविकार असेल तर या फुलांमुळे तो लवकर दूर होतो असे अनेक उपयोगी गुणधर्म असणाऱ्या फुलांचे नाव आहे मोहाचे फुल.

त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार तोंड येत असेल तर या समस्येवर सुद्धा रामबाण औषध म्हणून मोहाची फुले वापरली जातात. जर तुम्हाला पोटदुखी , पोटामध्ये अल्सर असेल तर अशावेळी ही फुले खूपच उपयुक्त ठरतात. छातीमध्ये दुखत असेल , छातीमध्ये कप जमा झाला असेल, वारंवार खोकला होत असेल , दम्याचाआजार असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अशा वेळी मोहाची ताजी फुले घेऊन एक दुधामध्ये दोन ते तीन थेंब फुलाचे रस मिसळून सकाळी सेवन करायचे आहे.

हे वाचा:   सर्दी कफ खोकला यांवर घरगुती उपाय..एका दिवसात खोकला, सर्दी थांबते..कफ लगेच बाहेर पडतो..

असे केल्याने कोणत्याही प्रकारचा खोकला असेल तर खोकला थांबण्यासाठी खूप मदत होईल. जर तुमच्या शरीरावर वारंवार खाज येत असेल तर अशावेळी मोहाची ताजी फुले घेऊन त्यांचा रस खाज येणाऱ्या जागेवर लावल्याने खाज लवकर थांबते. तुम्हाला वारंवार उचकी लागत असेल सायनस ,अर्ध डोके दुखीचा त्रास होत असेल अशावेळी या मोहाची फुले यांचा रस रामबाण उपाय ठरतो.

या मोहाचे फूल घरी चावून चावून खाल्ले तर तुमच्या शरीरातील पित्ताचा त्रास लवकर निघून जाईल. जर आपल्या शरीरामध्ये दुर्बलता असेल,विर्य कमी असेल ,शुक्राणूंचा त्रास असेल अश्या वेळी या मोहा ची तीन चार ताजी फुले सोबत खडीसाखर मिक्स करून संध्याकाळी झोपण्याआधी खाल्ल्यास आपला हा त्रास कमी होतो.

हे वाचा:   दुपारी झोपणे शरीरासाठी फायदेशीर आहे का अपायकारक ? जाणून घ्या सत्य..

या फुलांमध्ये सुक्रोज , ग्लुकोज व फ्रुक्टोज याचबरोबर जीवनसत्व क सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ही फुले खाल्ल्यामुळे मातांच्या दुधामध्ये वाढ होते. हे फुले खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता सुद्धा कमी होते त्यामुळे जर तुम्हाला ही फुले उपलब्ध झाली तर नक्की खा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.