महादेव भोळे सांब आहेत. भक्तांच्या थोड्याशा पूजनाने सुद्धा ते भक्तांवर प्रसन्न होतात. महादेव यांना फक्त एक तांब्या शुद्ध पाण्याने मनो भावे जल अर्पण केले तरी ते आपल्यावर प्रसन्न होतात.आपल्या काही इच्छा ,आकांक्षा, मनोकामना असतील जर त्या पूर्ण करायच्या असतील तर महादेवांना या वस्तू अर्पण करा या वस्तूंमुळे महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. महादेव एवढे साधेभोळे आहेत की भक्तांवर लवकर प्रसन्न होणारे देव म्हणून त्यांना ओळखले जाते.
आपल्या पूजनाने महादेव लवकर प्रसन्न सुद्धा होत असतात म्हणून काही विशिष्ट वस्तू अर्पण करणे गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया त्या वस्तू नेमक्या कोणकोणत्या आहेत, त्या महादेवांना अर्पण करायला हव्यात. सर्वात पहिली वस्तू म्हणजे पाणी . पाणी हे शिव पुराणानुसार महादेव हे पाण्याचे बनलेले आहेत आणि याचा संबंध समुद्रमंथनाची जोडला गेलेला आहे. अग्नी प्रमाणे वि’ष प्यायल्यानंतर महादेवांचा कंठ निळा पडला होता.
वि’षाचा प्रभाव कमी करण्याकरिता तसेच शरीराला शीतलता प्राप्त करण्यासाठी सर्व देवी-देवतांना महादेवांना जल प्यायला दिले म्हणूनच शिवपूजन मध्ये जलाचे विशेष महत्त्व आहे. दुसरी वस्तू म्हणजे बेलाचे पान हे महादेवाच्या नेत्राचे प्रतीक आहे म्हणून त्रिनेत्री पानाचे बेलाचे पान हे श्री महादेव यांना खूपच प्रिय आहे म्हणूनच शिवपूजना मध्ये बेलपत्र वाहण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे म्हटले जाते कि शिवपुजेमध्ये बेल पत्रा चे महत्व हे एक हजार कोटी कन्या पूजनाचे जेवढे पुण्य मिळते तेवढीच पुण्यप्राप्ती एक बेलपत्र वाहिल्यामुळे आपल्याला प्राप्त होते. तिसरी वस्तू आहे आकड्यांची फूल.
शिवपुजे मध्ये आकड्याचे फूल वाहणे म्हणजे एक तोळे सोनं वाहण्यासारखे मानले जाते. त्यानंतर महादेवांना अतिशय प्रिय असणारे वस्तू म्हणजे धोत्रा. धोत्रा चे शिवपूजन यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे त्यामागे एक धार्मिक कारण सुद्धा आहे. महादेव हे कैलास पर्वतावर राहत असल्याने तेथे खूप मोठ्या प्रमाणावर शीतलता असते आणि कैलासावर काही प्रमाणात उष्णता निर्माण करण्यासाठी धोत्राची मदत होते कारण की यामध्ये उष्णता वर्धक गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग महादेवांना झाला.
त्याचबरोबर भागवत पुराणांमध्ये एक कथा सुद्धा प्रचलित आहे की जेव्हा भगवान श्री शंकर समुद्रमंथन ना नंतर वि’ष प्यायल्यावर व्याकूळ झाले होते तेव्हा अश्विन कुमार याने श्री महादेव यांना धोत्रा ,भांग व बेलपत्र यांचे औषध बनवून दिले होते तेव्हापासून महादेवांना भांग व धोत्रा प्रिय आहेत म्हणून महादेवांना धोत्रा अर्पण करतांना आपल्या शरीराचा व मनाचा कडूपणा सुद्धा अर्पण करावा. त्यानंतर महत्त्वाची वस्तू म्हणजे हा भांग. हे महादेवांना अतिशय प्रिय आहे महादेव हे नेहमी ध्यानस्थ असतात.
भांग हे ध्यान केंद्रित करण्यास मदत करते म्हणून महादेवांना भांग प्रिय आहे. वि’षावर प्रभाव मिळवण्याकरता महादेवांनी भागांचा उपयोग केला होता म्हणूनच यामागे हासुद्धा एक उद्देश आहे की भांग महादेवांना चढवली जाते जेणेकरून महादेवांनी देवीदेवतांची सर्व नकारात्मक शक्ती स्वतःमध्ये विलीन केली होती यावर परमानंदाचा आनंद देणारा म्हणून भांग कडे पाहिलेे जाते. कपूर वस्तू हा देवांचा सर्वात आवडता मंत्र आहे करपुर गौरम करूणावतारम या मंत्रामध्ये कपूर हा अतिशय पवित्र आहे. कपूरच्या सुगंधाने वातावरण सुगंधित होते आणि हेच सुगंधित वातावरण महादेव यांना प्रिय आहे.
दूध श्रावण महिन्यात सेवन केल्याने शरीराला हानीकारक असते म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये श्री महादेवांना दुध अर्पण करणे योग्य मानले जाते. तांदूळ याला अक्षता सुद्धा म्हणतात अक्षता म्हणजे अखंड न तुटलेला. कोणत्याही पूजेमध्ये अक्षता यांना महत्त्वाचे मानले जाते. अक्षता नसल्यास सर्व पूजा पूर्ण मानली जात नाही जर आपल्या पूजाविधीमध्ये एखादा पदार्थ कमी असेल तर अक्षताचा वापर करून ती कमतरता भरून काढली जाते त्यानंतर चा पदार्थ पदार्थ आहे चंदन. चंदन हे महादेवांना अतिशय आवडते आहे . महादेवांच्या कपाळावर आपल्याला त्रीकूट चंदन पाहायला मिळते.
चंदनाचा उपयोग होम हवन मध्ये सुद्धा केला जातो यामुळे वातावरण सुगंध निर्माण होतो आणि हेच सुगंध महादेवांना अतिशय प्रिय आहे. भस्म हे मानवी शरीराची राख असते आणि एकदा या भस्म मध्ये महादेवांना पवित्रता प्राप्त झाली होती म्हणून महादेव आपल्या शरीराला मृत्यू समान मानून त्या पवित्र आत्म्याचा सन्मान करतात म्हणूनच महादेवांना भस्म अतिशय प्रिय आहे. त्यानंतर अशी वस्तू आहे रुद्राक्ष . रुद्राक्षाची कथा एकदा महादेवांनी पार्वतीदेवी यांना सांगितली होती.
जगाच्या कल्याणासाठी जेव्हा महादेवांनी घोर तपश्चर्या केली होती त्यानंतर प्रत्यक्ष बाह्य जगात आल्यावर महादेवांनी आपले डोळे मिटले होते तेव्हा महादेवांच्या डोळ्या मधून पाणी पृथ्वीवर पडले होते तेच रुद्र अक्षय म्हणुनच रुद्राक्ष ओळखले जाते म्हणूनच भक्तांच्या कल्याणासाठी नेहमी तत्पर असणारे हे रुद्राक्ष आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात. आता आपल्या लक्षात आलेच असेल कि महादेवांना आवडणाऱ्या या वस्तू जर आपण त्यांना अर्पण केल्या तर आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना असतील त्या संपूर्ण लवकरच पूर्ण होतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.