शरीरावरील पांढरे डाग, कोड घालवण्यासाठी हा रामबाण उपाय एकदा नक्की करा; एकही डाग शरीरावर राहणार नाही.!

आरोग्य

आपण अनेकदा पाहतो की अनेक लोकांच्या चेहऱ्यावर ,हातावर ,पायावर ,शरीरावरील अन्य भागावर पांढरे डाग येऊ लागतात. हे पांढरे डाग शरीरावर येण्याची वेगवेगळी कारणे आहेत परंतु हे डाग येण्याच्या वेळी जर कमी दिवसांमध्ये आपण काही घरगुती उपचार केले तर हे डाग येण्याचे प्रमाण आपण कमी करू शकतो. हे पांढरे डाग घालवण्याचे आज आपण काही असे महत्त्वाचे रामबाण उपाय जाणून घेणार आहोत. यातील पहिला उपाय म्हणजे तांबे.

तांबे हा धातू आपल्या शरीरातील व त्वचेतील मेलेनिन निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तांब्याच्या भांड्यात मध्ये रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे . मेलेनिन मुळे आपल्या त्वचेचा रंग व केसांचा रंग नियंत्रणात राहण्यास मदत होते म्हणूनच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आपल्या शरीरातील मेलॅनिन चे प्रमाण वाढते आणि आपल्या शरीरावरील डाग कमी होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते.नारळाचे तेल हीसुद्धा आपल्या शरीरासाठी व त्वचेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.

नारळाच्या तेलामुळे आपली त्वचा सतेज दिसते तसेच चमकु लागते यातील पोषक असल्यामुळे प्रभावी त्वचेवर दिवसभरातून दोन वेळा मसाज केल्याने शरीर वरील त्वचा चांगली राहते. प्रभावी जागेवर मसाज केल्यामुळे डाग हळूहळू कमी होऊ लागतात. त्याचबरोबर आपण हळदीचा उपयोग सुद्धा हा उपाय करण्यासाठी करू शकतो मोहरीच्या तेलामध्ये दोन चमचे हळद टाकून त्याचा लेप बनवून आपल्या शरीरावर डाग निर्माण झालेले आहे ,अशा ठिकाणी याचा लेप लावल्याने आपल्याला फरक पडतो.

हे वाचा:   उभे राहून पाणी पिल्याने काय होते ? वाचून पायाखालची जमीन सरकेल ! शरीरात होतात असे गंभीर परिणाम जाणून घ्या..

अशा पद्धतीने हा उपाय जर आपण वर्षभर केला तर आपल्या शरीरावर जे डाग असतात ते कमी होण्यास मदत होऊ लागते तसेच आपण हळदीमध्ये कडुलिंबाचा पाला मिक्स करून सुद्धा त्याचा लेप बनवून शरीरावर लावू शकतो तसेच कडुलिंबाचा पाला हा उपाय सुद्धा महत्त्वाचा ठरतो व कडूलिंबाच्या पाल्या मध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरावरील तसेच जे काही बॅक्टेरिया असतात ती नष्ट करण्याचे कार्य कडुलिंबाचा पाला करत असतो.

या कडुलिंबाच्या पानांची पेस्ट तयार करून त्यामध्ये ताक मिसळून प्रभावित जागेवर लावावा. या व्यतिरिक्त आपण कडुलिंबाचे तेल सुद्धा बनवून प्रभावी जागेवर मसाज करू शकतो.कडू लिंबाच्या पाल्याचा रस नित्यनियमाने प्यायल्याने आपले शरीरातील अनेक आजार सुद्धा दूर होतात. हा उपाय करण्यासाठी आपल्या लाल मातीचा सुद्धा वापर करायचा आहे लाल माती मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तांबे उपलब्ध असते.

हे वाचा:   अळूच्या पानांची वडी व भाजी खाणाऱ्यां लोकांनी वाचा..बघा यामुळे आपल्या शरीरात काय काय घडत आहे..

हे तांबे आपल्या शरीरातील मेलॅनिन नावाचे घटक पूर्ववत करण्यासाठी मदत करत असते. आल्याच्या रसामध्ये या लाल मातीचा लेप तयार करून डाग असलेल्या जागेवर लावा. रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी व मेलेनिन निर्मितीसाठी आले महत्त्वाचे भूमिका बजावते. आल्याचा रस पिल्याने शरीरामध्ये मेलेनिन नावाची घटक तयार होते त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला ॲप्पल व्हिनेगर सुद्धा महत्त्वाची ठरते.

विनेगर पाण्यामध्ये मिक्स करून प्रभावी जागेवर लावावे.तसेच एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा सफरचंद व्हिनेगर टाकून नियमितपणे प्यायल्याने सुद्धा याचा उपयोग आपल्याला होतो. अशा प्रकारे वरील सगळे उपाय केल्याने तुमच्या शरीरावरील जे काही पांढरे डाग आहेत ते कमी होण्याची शक्यता असते आणि यामुळे तुमची त्वचा पूर्ववत होऊन तुमचं शरीर चेहरा ,हात ,पाय चांगले दिसेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.