कोणत्याही प्रकारची सूज मिनिटात उतरेल; मुकामार, रक्त साचणी ,कोणत्या प्रकारच्या गाठी लवकर होतील दूर.!

आरोग्य

शरीराच्या कोणत्याही भागावर सूज आली असेल म्हणजे गुडघ्यावर, कमरेवर ,हातावर पायावर ,मानेवर, बोटांवर असणारी सूज काही मिनिटातच उतरवणारा असा प्रभावी उपाय आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत शिवाय अनेक वेळा मुक्का मार लागल्याने आपल्या शरीरावर काळे डाग पडू लागतात अशावेळी हा उपाय सुद्धा अशा जखमेवर उपयुक्त ठरणार आहे.

याशिवाय पाय मुरगळला असेल , शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी गाठी आलेले असतील तर या सर्व समस्यांवर रामबाण असा आजचा उपाय ठरणार आहे. तो उपाय कसा करायचा आहे ,हे आज आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत . चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंबेहळद लागणार आहे.

आंबेहळद आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होत असते जरी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध नसली तरी आयुर्वेदिक दुकानांमध्ये आंबेहळद उपलब्ध होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका दगडावर किंवा सहानी वर आंबेहळद पाणी मध्ये दोन-तीन थेंब टाकून उगाळून घ्यायची आहे. निदान एक चमचा लेप निघेल एवढी आपल्याला आंबेहळद उगळायचे आहे त्यानंतर आपल्याला दुसरा पदार्थ हा उपाय करण्यासाठी लागणार आहे त्याचे नाव आहे रगत रोहिडा. यालाच रक्त रोहिडा असेसुद्धा म्हणतात.

हे वाचा:   सर्व त्वचा रोगांचा बाप आहे हे औषध; गजकर्ण ,खरुज ,नायटा करते तीन दिवसातंच पूर्णपणे गायब.!

याची साल आपल्याला आयुर्वेदिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध होते. हि साल आपल्याला सहाणेवर थोडेसे पाणी टाकून उगाळून घ्यायची आहे त्यानंतर आंबेहळद आणि रगत रोहिडा यांना एकत्र करून गॅसवर थोडा वेळ गरम करून घ्यायचे आहे. एकदा का हे मिश्रण गॅसवर गरम केल्यानंतर आपल्याला शरीरावरील ज्या भागावर सूज आहे व गाठ आहे अशा ठिकाणी हा लेप लावायचा आहे. हा लेप लावल्यावर काही तास तसाच राहू द्यायचा आहे.

हा लेप लावल्याने शरीरावर कोणत्याही प्रकारची गाठ असेल सूज असेल काही मिनिटातच दूर होईल. तुमचा जर पाय मुरगळला असेल तर लवकर बरा होईल आणि यामुळे होणाऱ्या भयंकर वेदनेपासून तर तुमचे रक्षण कराल असा हा अगदी साधा सोपा आणि घरगुती उपाय आहे. हा उपाय आयुर्वेदिक असल्यामुळे याचा कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम शरीराला जाणवणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   ब्रह्मकमळ दुर्मिळ वनस्पती चे हे अद्भुत उपचार फायदे जाणून व्हाल तुम्हीसुद्धा थक्क.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.