आर्म पीट म्हणजे आपल्या काखेची जागा जिथे सर्वात जास्त घाम येत असतो. तसे पाहिले गेल्यास आपण या समस्ये बद्दल विशेष असे काही करू शकत नाही परंतु आजच्या लेखामध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास आहे. या घामाला आपण नियंत्रित करू शकत नाही परंतु अनेकदा आपल्या काखेत येणारा घाम व त्याच्या यामुळे येणारी दुर्गंधी यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या घामामुळे अनेकदा डाग पडतात व ते डाग आपल्या वारंवार समोर येत राहतात आणि याचा दुर्गंध येत राहतो.
हा वास जर दुसऱ्या व्यक्तीला आला तर आपले जे इंप्रेशन आहे ते चुकीचे पडते आणि अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला टाळू लागते म्हणूनच ही समस्या दूर करण्यासाठी आज आपण एक घरगुती उपाय जाणून घेणार आहोत परंतु काखेतून घाम का येतो? व त्याचा दुर्गंध का येतो? हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. जेव्हा शरीराचे तापमान वाढते तेव्हा घाम शरीराबाहेर टाकला जातो. या बद्दल काळजी करण्यासारखं काहीच नाही कारण की घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
घाम शरीरावरील जिवाणूंच्या संपर्कात येतो आणि त्यामुळे त्याचा वास येऊ लागतो. मुळात शरीराबाहेर टाकल्या जाणार्या घामाला कोणताच गंध नसतो. तसेच शरीरावरील मृतपेशी च्या संपर्कात आल्यामुळे सजीव पेशी एकाचे दोन अशा पद्धतीने वाढत जातात आणि यामुळे काखेतून येणाऱ्या घामाचा वास येऊ लागतो. म्हणूनच ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला कडूलिंबाची पाले मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत जेणेकरून या पानांवर जर धुळे जमा झाली असेल ती स्वच्छ होऊन जाईल.
एकदाका ही पाने स्वच्छ धुऊन झाल्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट बनवायचे आहे व ते झाल्यानंतर एक पदार्थ टाकल्यानंतर ती पेस्ट आपल्याला काखेच्या जागेवर लावायची आहे असे केल्याने आपल्या घामाचा जो वास आहे तो कमी होण्यास मदत होईल. म्हणून हि पेस्ट तयार करताना आपल्याला कडुनिंबाच्या पानांची सोबत थोडीशी हळद आणि मीठ सुद्धा टाकायचे आहे. एकदाका पेस्ट तयार झाल्यानंतर घाम येणार्या जागेमध्ये म्हणजेच काखे मध्येही ती पेस्ट आपल्याला लावायची आहे त्यानंतर १५ ते २० मिनिटं सोडून आंघोळ करायची आहे.
असे केल्यामुळे तुमच्या शरीरातून जी काही दुर्गंधी येणार आहे ते कमी होण्यास मदत होईल त्याच बरोबर तर हे केल्यावर सुद्धा तुम्हाला जर फरक नाही पडला तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या अनेकदा असे होते की शरीरातील दुर्गंधीचा वास येण्याकरता तेलकट, तिखट पदार्थ ,कडीपत्ता आले यासारखे पदार्थ वर्ज्य करायला हवेत कारण की या पदार्थांमध्ये सल्फर खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि सल्फर हे आपल्या शरीरातून जे छिद्र असतात त्यातून बाहेर पडत असतो.
म्हणूनच घाम ग्रंथीमधून सल्फर बाहेर पडत असतो आणि अनेकदा याचा दुर्गंध आल्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बहुतेक वेळा हे छिद्र ओपन झाल्यामुळे त्याच्यातील रासायनिक घटकांमुळे काखेतील केसांमध्ये याचे पोल ओपन होतात आणि त्यातून घाम बाहेर पडू लागतो म्हणूनच जर तुम्ही या लेखांमध्ये सांगितलेला उपाय जर केला तर तुम्हाला लवकरच फरक पडेल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.