जवस खाल्ल्याने जे होते त्याचा विचार कधीही केला नसेल; जाणून घ्या जवस खाण्याचे चत्मकारिक फायदे.!

आरोग्य

जवस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बीया मानवाच्या आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर ठरतात. जी व्यक्ती शाकाहारी आहे अशा व्यक्तींसाठी या बिया सुपर फूड म्हणून संबोधले जाते. मासे खाणाऱ्या व्यक्तींना मासांमधून ओमेगा फॅटी अॅसिडस खूप मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असते आणि शाकाहारी लोकांना जवस बी यांमधून खूप मोठ्या प्रमाणावर ओमेगा फॅटी ऍसिड उपलब्ध होत असते ज्यामुळे त्यांचे हृदय मजबूत राहण्यासाठी मदत होते.

त्याचबरोबर जवस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे जेवढे प्रोटीन आपल्याला मासे, अंडी खाल्ल्यामुळे मिळते तेवढेच प्रोटीन शाकाहारी व्यक्तींना जवस खाल्ल्यामुळे प्राप्त होते परंतु फायदेशीर जवस खाल्ल्यामुळे सुद्धा अनेकदा नुकसान सुद्धा सहन करावी लागते. या जवसचा शरीराला तसा फायदा आहे त्याचबरोबर दुष्परिणाम सुद्धा आहे. या बियांचे सेवन अधिक प्रमाणात केल्यामुळे आपल्याला अतिसार, पोटदुखी, बद्धकोष्टता यासारख्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात.

ज्या व्यक्तींना लो ब्लडप्रेशरचा त्रास आहे ,अशा व्यक्तीने यांचे सेवन करणे टाळावे कारण की यामुळे लो ब्लडप्रेशरचा त्रास अधिक होण्याची शक्यता निर्माण होते. एवढे सगळे असून सुद्धा जवसाच्या बिया आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात. या बीया आपल्या शरीराला कशा पद्धतीने फायदेशीर ठरतात? त्यांचा उपयोग कशा पद्धतीने करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

हे वाचा:   आता बायकोसमोर कधीच मान खाली घालावी लागणार नाही..फक्त हा एक पदार्थ रात्री दुधात मिक्स करून घ्या..आणी पहा चमत्कार..

जवसमध्ये हृदयाला चांगले ठेवणारे जे काही पोषक घटक असतात ते म्हणजे ओमेगा फॅटी ऍसिड असे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते म्हणूनच आहारामध्ये बियांचा समावेश केल्याने हृदय विकाराचा झटका तसेच पक्षाघाताचा धोकासुद्धा कमी प्रमाणात होतो शिवाय आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात काढण्यासाठी तसेच आपल्या शरीरातील रक्तामधील खराब कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करण्यासाठी या बियांचा उपयोग केला जातो शिवाय जवस मध्ये लीग नाच, एंटीऑक्सीडेंट असे गुणधर्म खूप मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

त्याचबरोबर महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तसेच पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्यापासून या बिया आपले संरक्षण करत असतात तसेच एक चमचा जवसाच्या बिया मधून आपल्या शरीराला तीन ग्रॅम फायबर तंतुमय पदार्थ उपलब्ध होत असतात म्हणून पोट नियमितपणे साफ होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग आपल्या शरीराला होत असतो शिवाय फायबर मुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल व शुगर दोन्ही नियंत्रणामध्ये ठेवले जाते तसेच जवळच खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊन आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होत असते.

हे वाचा:   मधुमेह चा घरगुती उपाय ! शुगर च्या आजाराचा सर्वात साधा-सरळ उपाय..या झाडाच्या पानांचा असा करा वापर..

जर तुम्हाला मधुमेह ह्याचा त्रास असेल तर तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा या बिया मदत करत असतात. जवस मध्ये आयरन चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण सुद्धा चांगल्या पद्धतीने राहते आणि एनिमिया सारख्या त्रासांपासून आपले संरक्षण होते. या बियांमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर निघून जाण्यास मदत होते म्हणूनच आपले लिव्हर चांगल्या पद्धतीने कार्य करू लागते.

त्याचबरोबर सूची व्यक्ती वजन कमी करू इच्छित आहे अशा व्यक्तींसाठी सुद्धा जवस बिया अतिशय उपयुक्त ठरतात कारण की यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या शरीराला अतिरिक्त चरबी निर्माण होण्यास पासून वाचवत असते आणि आपले वजन नियंत्रणात राहते.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.