पुरुष असो वा स्त्री सर्वांचे सौंदर्य हे केसामध्ये लपलेले असते. जर आपले केस लांब काळीभोर मोठी असल्यास आपण चारचौघांमध्ये उठून दिसते. त्या जोरावर पुरुष सुद्धा महिलांसारखे जर त्यांचे केस चमकदार चमकणारे असतील तर ते सुद्धा चारचौघांमध्ये उठून दिसतात. परंतु आजकालच्या केमिकल प्रॉडक्ट मुळे केसांचे सौंदर्य टिकून रहात नाही आणि हे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण आरोग्य टिकवण्यासाठी उत्पादनाचा वापर करत असतो परंतु अनेकदा आपल्याला त्याचा दुष्परिणाम पाहायला मिळतो.
या रासायनिक पदार्थांचा फरक हा तात्पुरता असतो परंतु नंतर यामुळे केसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणजेच की केस विरळ होऊ लागतात, केस तुटू लागतात त्याच बरोबर केसांचे रंग उडवून अकाली पांढरे होऊ लागतात.म्हणूनच या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी या लेखामध्ये अगदी घरगुती आणि सोपा सरळ उपाय घेऊन आलेला आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या केसासंबंधीच्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरच दूर होतील.
हा उपाय केल्याने तुमचे केस अगदी सुंदर दिसू लागतील. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुलतानी माती लागणार आहे. मुलतानी माती मध्ये आयन, सिलिका, मॅग्नेशियम सारखे अनेक घटक उपलब्ध असतात म्हणूनच मुलतानी माती पूर्वीपासून सौंदर्यामध्ये भर टाकण्यासाठी महत्वपूर्ण असा पदार्थ मानला गेलेला आहे. पूर्वीचे लोकसुद्धा मुलतानी मातीचा वापर केस धुण्यासाठी करत असे म्हणूनच महिलांचे केस लांबसडक व काळेभोर होण्यास मदत होत असे त्याचबरोबर पुरुषांचे केस सुद्धा सिल्की पाहायला मिळत असे म्हणूनच पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला पुरुषांचे टक्कल पडलेले पहायला मिळत नसे.
असाच एक महत्त्वपूर्ण आसान घरगुती उपाय आजचं लेखांमध्ये आपण सगळेजण जाणून घेणार आहोत. मुलतानी माती मुळे केस स्वच्छ निघतात त्याचबरोबर आपले रक्ताभिसरण सुद्धा चांगल्या पद्धतीने होऊ लागते. केसांवर कंडिशनर चे काम करून मतानी माती आपले केस सिल्की आणि चमकदार बनवते. कोरडे झालेले केस मऊ मुलायम बनवते, केसांमधील कोंडा दूर करते जर तुमचे केस गळत असतील तर तेसुद्धा थांबते.
मुलतानी मातीचा लेप केसांच्या स्कल्प पासून टोकापर्यंत लावल्याने आपले केस गळायचे पूर्णपणे थांबते. मुलतानी माती मुळे आपले केस ओईली दिसत नाही. केसांना मजबूत करण्यासाठी सुद्धा हा लेप अतिशय फायदेशीर ठरतो. त्यामुळे केसांची वाढ सुद्धा भरभरून होते. जर आपल्या केसांची टोके दुभंगले असेल तर त्यापासून सुद्धा संरक्षण प्राप्त होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुलतानी माती घ्यायची आहे तुम्ही मुलतानी माती ही आपल्या केसांच्या लांबीनुसार घेऊ शकता.
त्यानंतर आपल्याला मुलतानी मातीमध्ये एक चमचा दही टाकायची आहे. मग आपल्याला एक लिंबू रस त्यात पिळायचा आहे.त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे त्या अनुसार आपल्याला पाणी टाकायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला अर्धा एक तास तसेच ठेवायचे आहे जेणेकरून ते मिश्रण व्यवस्थित एकजीव होईल त्यानंतर आपल्याला हे मिश्रण केसांना लावायचा आहे. हे मिश्रण नेहमी लावल्याने तुमचे केस काळेभोर आणि लांबसडक होतील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.