गुडघे दुखत असतील, चालणे फिरणे वेदनादायी वाटत असेल तर करा हा घरगुती उपाय. सांधेदुखी आणि त्यातल्या त्यात गुडघे दुखत असेल तर आपली दैनंदिन कामे सुद्धा करणे कधी-कधी वेदनादायी ठरू लागते. वयाबरोबर वाढत जाणारी गुडघेदुखी हल्लीच्या काळात तरुण मंडळीना सुद्धा उद्भवू लागणारी सर्वात मोठी समस्या आहे म्हणून गुडघ्याला मार लागल्यामुळे, हाडांची झीज झाल्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी झाल्यामुळे, गुडघ्या मधील वंगण कमी झाल्यामुळे अशा कोणत्याही प्रकारच्या त्रासामुळे निर्माण झालेली गुडघेदुखी या तेलाच्या वापरामुळे व हा उपाय केल्यामुळे कायमस्वरूपी दूर होते. चला तर मग पाहूया हे तेल व हा उपाय कसा करायचा..
गुडघेदुखीवर रामबान म्हणून असा हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला चार वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे मोहरीचे तेल. हे तेल स्वयंपाक घरामध्ये उपलब्ध असते आणि चांगल्या गोष्टीसाठी मोहरीच्या तेलाची मालिश केल्याने आपल्याला योग्य ते परक सुद्धा लवकर जाणवतो. आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कप मोहरीचे तेल आहे. त्यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे मेथीचे बी. मेथीच्या बिया वाताच्या सर्व विकारांवर अतिशय गुणकारी ठरतात.
यामध्ये इन्फला मेंटरी गुणधर्म सांध्याचे वेदना दुखी कमी करते.या उपाय करण्यासाठी साधारण एक चमचा मेथीचे बिया या तेलामध्ये मध्ये ऍड करायचे आहे त्यानंतरचा तिसरा घटक म्हणजे लसूण. संधिवात साठी लसुण वेदनाशामक म्हणून काम करतो. या उपायासाठी आपल्याला लसणाच्या चार ते पाच पाकळ्या तेलामध्ये ऍड करायचे आहेत यानंतरचा चौथा घटक म्हणजे दालचिनी. सांधेदुखीचे वेदना कमी करण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरते.हा उपाय करण्यासाठी आपल्याला छोटासा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे. आता हे सगळे घटक आपलयाला तेलामध्ये टाकून एकत्र शिजवून किंवा कडवून घ्यायचे आहेत.
संधिवात, आमवात, पित्त वात हे सर्व वाताचे प्रकार आपल्या पचन संस्थेशी निगडित असतात. त्याचबरोबर वात निर्माण करणारे पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य केले गेले पाहिजे आणि त्याच बरोबर गुडघे दुखी, सांधे दुखी साठी योग्य ते आसन सुद्धा करायला हवे. अनेकदा प्रसूतीनंतर योग्य दिशेने शेक दिल्यामुळे सुद्धा महिलांमध्ये गुडघे दुखीचे ,कंबर दुखी चे प्रमाण वाढू लागते. वाढलेले वजन तसेच ओझे नेणाऱ्या व्यक्तींना उतरवयांमध्ये या समस्या हमखास जाणवतात.
हे सगळे घटक तेला मध्ये कडवल्यानंतर एक दोन तास थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतर हे तेल आपल्याला गाळून घ्यायचे आहेत त्याचबरोबर हे तेल न गाळता एका काचेच्या बरणीमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता आणि प्रत्येक वेळी वापरतांना थोडे कोमट करुन हे तेल वापरू शकता. या तेलाने गुडघ्याची किंवा दुखणाऱ्या कोणत्याही अवयवाची मालिश करायची आहे त्यानंतर सुती कापडाच्या वापराने गुडघा व्यवस्थित बांधून ठेवायचा आहे. हा उपाय शक्यतो रात्री झोपताना आपल्याला करायचे आहे. अशा पद्धतीने एक ते दीड महिने आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या गुडघ्याची समस्या लवकरच दूर होईल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.