प्रत्येक दिवसाची सकाळ ही नव्याने उजाड असते. नवीन प्रेरणा देण्याची शक्ती त्यात असते. सकाळचे वातावरण चांगले असले की संपूर्ण दिवस चांगला जातो मात्र सकाळी वातावरण बिघडल्यास त्याचा परिणाम संपूर्ण दिवसांवर होतो यासाठी सकाळची प्रसन्नता टिकून राहण्यासाठी काही नियमाचे पालन करणे आवश्यक असते.
सकाळी चिंतन मुक्त आणि प्रसन्न मनाने जागे व्हा त्यामुळे तुमचा दिवस उत्तम जाईल. सकाळी उठल्यावर आपण लगेच कामाला लागतो पण काही कामे असतात, ते काम कधीही करू नये. जर सकाळी ही कामे केली तर तुमची कामे रखडून जातील आणि ती पूर्ण होणार नाहीत तसेच काही लोकांना माहीत नसते ती कामे कोणते आहेत.
ते आपण आता जाणणार आहोत. काही लोकांना सकाळी उठून आपला चेहरा आरशात पाहण्याची सवय असते. अनेक जणांच्या बेडरूम मध्ये समोर आरसा असल्यामुळे लगेच चेहरा पाहिला जातो पण असे कधीही करू नका, असे केल्याने तुमचे कामे करणे कठीण जाईल. चेहरा पहिला आरशात बघणे टाळा. तुमच्या पलंग समोर आरसा असेल तर त्याला पडद्याने झाकून द्या म्हणजे उठल्यावर तुम्हाला लगेच चेहरा दिसणार नाही.
शास्त्रामध्ये असे लिहिलेले आहे की, सकाळी उठून तुम्ही पहिल्यांदा काय पाहतात हे महत्त्वाचे आहे आणि म्हणून सकाळी उठून कोणाचा चेहरा पाहण्याच्या अगोदर तुमच्या तळव्या हाताचे दर्शन घ्या, असे करणे शुभ मानले जाते. सकाळचे गायत्री मंत्र संगीत ऐकणे हे शुभ मानले गेले आहेत. याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुमचा दिवस चांगला जातो.
तुमच्या बेडरूम मध्ये मोरपंख किंवा निसर्गाचे सुंदर चित्र लावा जेणेकरून वातावरण प्रसन्न राहील तसेच तीन कामे असे आहेत की ते सकाळी उठल्याबरोबर कधीही करू नये. काही लोकांना सकाळी उठून लगेच पेपर घेण्याची सवय असते,असे कधीही करू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते. पेपर मध्ये जास्त करून नकारात्मक बातमी असतात म्हणून हे करणे नेहमी टाळावे जर तुम्हाला पेपर वाचायचा असेल तर त्यामधली ठराविक पुरवणी तुम्ही पाहू शकतात बाकी चा पेपर तुम्ही दुपारी सर्विसतर वाचू शकतात.
सकाळी उठून कोणत्याही हिंसक श्वापदाचे चित्र पाहू नका, त्याने तुमचा दिवस खराब जाईल किंवा क्लॅश होण्याची शक्यता राहील. जर असेच चित्र तुमच्या घरी असेल तर त्यांना रात्री झाकून ठेवा,चांगले चित्र असेल तर ते नक्की पहा. काही लोकांना बेड टी पिण्याची सवय असते. ब्रश न करता पण असे करू नका असे केल्याने राहू आणि केतूचा प्रभाव वाढून तुमच्यावर वाईट परिणाम होतो तसेच चहा पिण्याच्या आधी ब्रश नक्की करा जर ब्रश करणे शक्य नसेल तर चूळ नक्की अवश्य भरा. ब्रश न करता कोणतीही कामे करू नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.