दररोज मनोभावे आणि मोठ्या श्रद्धेने जर देव पूजा केल्यास परंतु आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले नाही तर संपूर्ण पूजा व्यर्थ ठरते. त्या पूजेचे योग्य ते फळ मिळत नाही म्हणून आपणास विनंती आहे की ,आपले जे कुलदैवत आहे ते इष्टदेवता आहे त्यांची पुजा व नामस्मरण अवश्य करा. जर तुम्हाला तुमचे कुलदैवत व इष्टदैवत माहिती नसतील तर जे काही जुनी वडीलधारी माणसे आहेत त्यांना या बद्दल चौकशी करून योग्य ती माहिती काढून घ्या.
आज आपण उपाय जाणून घेणार आहोत, तो उपाय म्हणजे नऊ काळ्या मिरीचे दाणे. तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये काळी मिरी, विलायची ,लवंग यांचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वाहक म्हणून केला जातो. हे पदार्थ ऊर्जेचे वाहक असतात. आपल्या वास्तूमध्ये तसेच आपल्या शरीराच्या अवतीभवती सकारात्मक व नकारात्मक ऊर्जांचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणावर वाहत असतो.
जेव्हा आपल्या घराला आपल्या वास्तूला व आपल्या घरातील एखाद्या सदस्याला व कधी कधी स्वतःला एखाद्या व्यक्तीची नजर लागते तेव्हा तेव्हा आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. कधीकधी आपल्या वस्तू व चुकीचे परिणाम केले जातात त्याला टोटके असे म्हणतात. कधी कधी आपल्या हातून सुद्धा हे या चुका नकळत घडतात. कधीकधी रस्त्यावरून आपण एखाद्या पदार्थाला ओलांडून जातो व कळत-नकळतपणे त्या पदार्थाला लाथ मारतो ,अशावेळी त्या पदार्थामधील नकारात्मक भारी ऊर्जा आपल्याला त्रास देऊ लागते आणि आपल्या उद्योग धंदा व्यवसायामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही.
पैसा घरात येता येता थांबतो त्याचबरोबर अनेक मोठमोठ्या संधी डोळ्यासमोर हातातून निसटून जातात मात्र त्या संधींचा लाभ आपल्याला घेता येत नाही. जर आपल्याबाबत सुद्धा अशा गोष्टी घडत असतील किंवा आपल्या घरातील सदस्य वारंवार आजारी पडत पडत असेल , औषध उपचार करून सुद्धा त्या व्यक्तीची तब्येत खालावत जात असेल तर अशा वेळी नऊ काळी मिरी चा उपाय अवश्य करून पाहा. तुमच्या घरातील मूल सातत्याने रडत असेल, चिडचिड करत असेल त्याचबरोबर जर आपल्या मुलाला एखाद्याची नजर लागलेली असेल किंवा वास्तूमध्ये अशा काही घटना घडत असतील तर अशा वेळी सुद्धा या काळी मिरी चा उपाय तुम्हाला या सर्वां पासून संरक्षण देऊ शकतो.
म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुमचे जे काही कुलदैवत आहे इष्टदेवता आहेत त्यांची नीट माहिती करून घ्या व मनोभावे व श्रद्धेने हा उपाय करा परंतु हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात असू द्या की, या उपायाची कुठेच वाच्यता करू नका. उपाय याबद्दलची माहिती कुणाला सांगू नका. अगदी जवळच्या मित्रांना सुद्धा त्याच बरोबर घरातील सदस्यांना सुद्धा या उपाय बद्दलची माहिती अजिबात सांगू नका. ज्या व्यक्तीला समस्या आहे ,जे व्यक्ती समस्यांनी त्रासलेली आहे,ग्रासलेली आहे अशा व्यक्तीने हा उपाय करावा. हा उपाय आपण कोणत्याही रविवारी म्हणजेच कोणत्याही तिथीला करू शकता.
अमावस्येच्या तिथीला हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण की या तिथीला ज्या काही नकारात्मक शक्ती असतात त्या खूप मोठ्या प्रमाणावर वरचढ झालेल्या असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला रविवारी सकाळी स्नान विधी करून देवपूजा आटपून आपल्या कुलदैवताच्या समोर या नऊ काळीमिरी आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हात जोडून मनोभावे आपल्या कुलदेवतेला व इष्ट देवतेला समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना विनंती करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे काळे मिरीचे दाणे आपल्या कुलदैवते समोर असणार आहेत.
सायंकाळी जेव्हा सूर्य मावळेल त्यावेळी आपण पुन्हा एकदा आपल्या कुलदेवते समोर नतमस्तक व्हायचे आहे तसेच मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर हे ९ काळी मिरीचे दाणे आपल्या हातात घ्यायचे आहे. हे दाणे हातामध्ये घेतल्यानंतर मूठ घट्ट बंद करायची आहे. जर हा उपाय तुम्ही लहान मुलांसाठी करत असेल तर हे दाणे लहान मुलाच्या डोक्यावरून अँटिक क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ ज्या दिशेने फिरते आहे त्या दिशेने नऊ वेळा व त्यानंतर विरुद्ध दिशेने नऊ वेळा अशा पद्धतीने फिरवायचे आहे.
जर तुम्ही स्वतःसाठी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर त्या व्यक्तीवर नऊ वेळा सुलटे व नऊ वेळा उलट अशा पद्धतीने डोक्यावरून फिरवायचे आहे. की डोक्यावरून फिरवण्याची पद्धत आपल्याला घराच्या च्या बाहेर आल्यावर करायचे आहे त्यानंतर त्या मीेरी मधील एक दाणा आपल्याला पूर्व दिशेला जेवढे शक्य होईल तेवढे लांब फेकायचा आहे परंतु हा मिरीचा दाणा फेकताना आपल्याला ओम ओम ओम असे तीन वेळा ऊचार केल्यानंतरच दाणा फेकायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक दाणा आपल्याला तीन वेळा ओम असा उच्चार केल्यानंतर फेकायचा आहे.
जेव्हा आपण हे मिरीचे काळे दाणे फेकणार आहोत तेव्हा आपल्या सोबत जी काही नकारात्मक कारण आहे ते सुद्धा बाहेर पडणार आहे परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की या दाण्याला फेकताना तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आधी आठवून मगच हा दाणा फेकावा. हे मिरीचे दाणे फेकताना आपला वास्तूच्या आसपास पडणार नाही याची काळजी घ्या.
हे पहिला दाणा पूर्वेला फेकल्यानंतर दुसऱ्या धान्यापासून वेगवेगळ्या दिशेला हे दाणे फेका आणि शेवटचा जो नववा दाणा आहे तो आकाशाकडे वर फेका. हे दाणे फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ आपल्या घरात जायचे आहे. कुणासोबत बोलायचे नाही आणि हात पाय स्वच्छ धुऊन पुन्हा एकदा आपल्या कुलदेवते समोर जाऊन बसायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे असे केल्यामुळे तुमच्या सर्व संकटे नष्ट होऊन जातील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.