तिळाचा असा वापर केलात तर कफाचा खोकला,कोरडा खोकला होईल कायमचा बरा.!

आरोग्य

कफाचा खोकला किंवा कोरडा खोकला थांबवण्यासाठी करा घरगुती उपाय. बदलत्या वातावरणामुळे वायरल इन्फेक्शन सर्दी-खोकला होत असते. सर्दी खोकला बरे झाल्यानंतर काही काळ राहणारा कोरडा खोकला तो बंद करण्यासाठी आजचा हा उपाय करणार आहोत. हा अतिशय गुणकारी असा उपाय आहे.

दीर्घकाळ चालणारा खोकला जर आपण दुर्लक्ष केला तर त्याचे गंभीर आजार होण्याचे समस्या येऊ लागते. म्हणूनच अनेक गोळ्या औषध घेऊन देखील तुमचा खोकला थांबला नसेल तर फक्त सकाळ संध्याकाळ तीन दिवस हा उपाय करा. तुम्हाला खोकल्यापासून नक्की आराम वाटेल. हा उपाय कसा करायचा ते बघूया.

आजचा खोकला थांबवण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक पातेलं घेऊन एक ग्लास पाणी घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला लागणारी वस्तू म्हणजे तुळशीची ताजी पाने, तुळशीच्या पानांमध्ये अंटीबॅक्टरियल ,ऑंटीमायक्रोबियल हे गुणधर्म वायरल इन्फेक्शन नष्ट करते . ह्याशिवाय तुळशीच्या पानाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचप्रमाणे आपल्या उपायासाठी चार ते पाच तुळशीचे पाने घ्यायची आहे.

हे वाचा:   मुलाची उंची वाढत नाही.? तर हा उपाय एकदा नक्की करून पहा; लाखो रुपये वाचवणारा घरगुती उपाय.!

त्यानंतरचा दुसरा घटक म्हणजे अदरक. अदरक चा एक छोटा तुकडा घेऊन आपल्या स्वयंपाक घरामध्ये अदरक सहज उपलब्ध असतो. आपल्याला सर्दी, छातीचा कफ बाहेर टाकण्यास मदत करतो. आपल्या उपायासाठी आपणआल्याचा तुकडा घेऊन त्याचे बारीक तुकडे करायचे आहे. तिसरा घटक म्हणजे काळे तीळ.

काळे तीळ ही आपल्या घरात बरेचदा उपलब्ध असतात. किराणा दुकानांमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये काळे तीळ सहज उपलब्ध असते. अर्धा चमचा काळे तीळ आपल्या उपायासाठी वापरायचा आहे. आता हे सर्व उकळून त्याचा चांगला काढा तयार करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे सर्दी खोकला असल्यास त्याचे इन्फेक्शन झालेल्या असल्यास तर कोमट पाणी प्यावे आणि गरम पाण्याची वाफ घ्यावी. तो काढा चांगला उकळून घेतल्यानंतर ते कोमट होऊ द्यायचे आहे.

हे वाचा:   मुतखड्याचे ऑपरेशन करण्यापूर्वी या पदार्थाचा वापर एकदा नक्की करा; मुतखड्यावर रामबाण आहे हा पदार्थ.!

त्यानंतरच्या गाळणी च्या साह्याने ते गाळून घ्यायचे आहे. हा आपला सर्दी खोकल्याचा काढा तयार झालेला आहे. रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी आणि सकाळी जेवणानंतर हा काढा प्यायचा आहे. असा हा तीन दिवस सलग घ्यायचा आहे. सकाळ-संध्याकाळ घेतल्यानंतर तुमचा सर्दी खोकलाचा आजार बरा होतो. हा काळा पियाल्यानंतर साधारण अर्धा ते पाऊण तास काही खाऊ पिऊ नये.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.