एका रात्रीतच पायांच्या भेगा गायब करणारा हा घरगुती उपाय एकदा नक्की करा.!

आरोग्य

टाचेला भेगा पडणे, पायाला भेगा पडणे, पाय फुटणे ही समस्या अनेकांना त्रास देत असते. काहीजणांना तर पायाला भेगा पडून जखमा होऊन वेदना होतात. अनेकदा रक्तस्त्राव सुद्धा होऊ लागतो. हिवाळ्यात तर पायांना व टाचांना भेगा पडण्याचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पायाच्या टाचांना पडणाऱ्या भेगा बद्दल महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत.

या दोन उपायामुळे तुमची समस्या चटकन बरी होण्यास मदत होणार आहे शिवाय तुमचे पाय सुद्धा मऊ राहतील. उपाय जाणून घेण्याआधी पायांना भेगा कोणत्या कारणामुळे होतात हे जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे. बरेच जणांना अनवाणी चालण्याची सवय असते, आरामदायी चप्पल सॅंडल व बूट न वापरणे, अधिक वेळ उभे राहण्याची सवय असणे, पुरेशा प्रमाणामध्ये पाणी न पिणे, जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय,जीवनसत्वाची कमतरता असणे तसेच हिवाळा ऋतू मध्ये त्वचा कोरडी पडू लागल्यामुळे सुद्धा पायांना भेगा पडू लागतात.

हा उपाय करण्याआधी आपल्याला एका मोठ्या टबमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ म्हणजे जाडे मीठ टाकायचे आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे.कमीत कमी १५ ते २० मिनिटे पाण्यामध्ये पाय ठेवून नंतर स्वच्छ कपड्याने आपले पाय पुसून घ्यायचे आहेत. त्यानंतर उपाय करण्यासाठी आपल्याला मेणबत्ती लागणार आहे.

हे वाचा:   हे खाल्ल्याने आपले केस लवकर पांढरे होतात..जाणून घ्या आणि या पदार्थांचे सेवन टाळा ! केस अकाली पांढरे होण्याची कारणे..

या मेणबत्ती चा उपयोग आपल्याला टाचांवर करायचा आहे.मेणबत्तीच्या मेण हे किसनीच्या साह्याने व चाकूच्या साह्याने बारीक किसून घ्यायचा आहे. साधारण दोन चमचा एवढा कीस वाटीमध्ये काढायचा आहे आणि आता त्यामध्ये दोन चमचा मोहरीची तेल मिसळायचे आहे. मोहरीचे तेल त्याच्यातील कोरडेपणा घालवण्यासाठी खूप मदत करते त्याशिवाय मोहरीच्या तिला मध्ये अंटीबॅक्टरियल असे गुणधर्म असतात.एकदा का मोहरीचे तेल व मेणबत्तीचा मेण हे दोन्ही मिश्रण एकजीव केल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण मंद आचेवर गॅस वर ठेवायचे आहे.

एकदा का ही दोन्ही मिश्रण एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यास ठेवावे, त्यानंतर हे मलम स्वरूपामध्ये तयार झालेले मिश्रण आपल्या टाचांना लावायचे आहे. हा उपाय तुम्ही रात्री झोपताना करू शकता, एकदा का हा मलम पायाच्या टाचांना लावल्यानंतर मोजे घालून झोपा. हा उपाय ४ दिवस केल्यानंतर तुम्हाला लगेच फरक जाणवू लागेल.तसेच टाचांच्या भेगा दूर करण्यासाठी आपल्याला दुसरा सुद्धा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांकडे व्यासलीन सहज उपलब्ध असते.

हे वाचा:   ही 1 गोळी खा आज वजन वेगाने कमी करा; सर्दी, खोकला, कफ होईल लवकरच गायब.!

व्यासलीन ला चांगले मॉइश्चरायझर मानले जाते. या मध्ये आपल्याला बाजारांमध्ये मिळणारी हिरव्या रंगाची विटामिन टॅबलेट मिसळायची आहे आणि हे मिश्रण आपल्याला पायांच्या टाचांना लावायचे आहे. असे केल्यामुळे तुमच्या पायाच्या लवकरच भरून निघतील व असतील त्या लवकर बऱ्या होतील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.