खाज, खरुज नायटा किंवा गजकर्ण कोणतेही स्किन इन्फेक्शन दूर करण्यासाठी करा हा घरगुती उपाय. इतरांचे इन्फेक्शन झाल्याने किंवा आपल्याच अस्वच्छतेमुळे झालेले इन्फेक्शन मुळे खाज,खजूर,नायटे त्वचेवर येत असतात. सुरुवातीला खाजवणारी हे इन्फेक्शन वाढल्यानंतर अतिशय वेदनादायक करते म्हणून वेळातच हे असे घरगुती उपाय केल्याने तुमची वेळेतच खाजे पासून सुटका होण्यास मदत होते.
खाज ,खजुरचे इन्फेक्शन मुळापासून नष्ट होईल आणि ते पुन्हा परत कधीही होणार नाही. हा उपाय कसा करायचा ते आपण जाणून घेऊया त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे त्यासाठी आपल्याला दोन घटक लागणार आहे. पहिला घटक म्हणजे दुर्वा. गणपती साठी वापरले जाणारे दूर्वा. ती आता आपण आपल्या उपायासाठी वापरायची आहे.
हे दुर्वा आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात मध्ये देखील मिळते व आयुर्वेदिक या दुकानांमध्ये त्याची पावडर सुद्धा मिळते. या दूर्वा मध्ये अँटीबॅक्टरियल आणि अंटीफंगल गुणधर्म आढळतात. ज्या शरीरातील कोणतेही इन्फेक्शन चा नाश करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे हळद.
हळद मध्ये अंटी बॅक्टेरिया गुणधर्म असतात. त्वचेच्या इन्फेक्शन साठी, जखमेसाठी हळदीचा वापर केला जातो. आपण आपल्या उपायासाठी घरी बनवलेल्या हळकुंडचा वापर करायचा आहे. त्यातला अर्धा तुकडा घेऊन ते मिश्रण मिक्सरच्या साह्याने किंवा कोणत्याही पद्धतीने ते बारीक करून घ्यायची आहे. यामध्ये गरजेनुसार पाणी अँड करू शकतात व दोन्ही घटकांची व्यवस्थित पेस्ट तयार करून झाल्यानंतर ती एका बाऊल मध्ये काढून घ्यायची आहे.
त्याच प्रमाणे इतरांचे कपडे वापरल्याने सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होते म्हणून शक्यतो इतरांचे कपडे वापरणे टाळावे. ही तयार झालेली पेस्ट आपल्या इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी अप्लाय करायची आहे. शक्यतो ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन कोरड्या कापडाने पुसून मगच ही पेस्ट त्यावर अप्लाय करायची आहे. त्याचप्रमाणे दुर्वांचा रस रोज सकाळी संध्याकाळ घेतला तरी चालेल.
जर तुमच्याकडे दूर्वा उपलब्ध नसेल तर अर्धा चमचा हळद दुधामध्ये टाकून रात्री झोपण्यापूर्वी घेऊ शकता यामुळे रक्त शुद्धी होते आणि रक्तातील टॉक्सिक घटक नष्ट होऊन पिंपल्स येणे किंवा अनेक त्वचेचे इन्फेक्शन वारंवार होणे हे सुद्धा थांबते. हा उपाय अंगावर पित्त उठल्यावर देखील करू शकतात. खाज, खरुज, नायटा याचे इन्फेक्शन दूर करण्यासाठी एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करावा लागेल.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.