हरभऱ्याच्या कोवळ्या पानांचे हे भन्नाट फायदे; या आजारांपासून करेल कायमची सुटका.!

आरोग्य

हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आपल्याला शेतीमध्ये हरभरा पाहायला मिळतो. हा हरभरा अत्यंत गुणकारी असा आहे ,हरभऱ्याची पाने खुडून त्याची भाजी सुद्धा बनवली जाते. या हरभऱ्याची पाने उन्हामध्ये ठेवून त्याची साठवणूक सुद्धा केली जाते.अन्नाला चव येण्यासाठी या पानांचा वापर केला जातो.

ग्रामीण भागामध्ये या भाजीची वाढवण्यासाठी अनेकदा खाद्यपदार्थांमध्ये वापर केला जातो परंतु हे असून सुद्धा अनेकांना या हरभऱ्याच्या भाजीचे औषधी गुणधर्म माहिती नसतात. हरभऱ्याची भाजी संधिवात असणाऱ्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरते. सांधे दुखणे, सांध्यांना सूज येणे, गुडघ्या मधील वाटीतील तेल कमी होणे, इत्यादी समस्यांवर हरभरा महत्त्वपूर्ण ठरतो.

ही समस्या दूर करण्यासाठी हरभऱ्याची पाने पाने गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावी त्यानंतर या पाण्याचा लेप तयार करावा आणि वेदना असलेल्या भागावर लावा. हरभऱ्याची पाने थंड चवीला तुरट व आंबट असतात शिवाय ज्या व्यक्तींना भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा व्यक्तींसाठी हरभऱ्याची पाने गुणकारी ठरतात.

हे वाचा:   पायांना गोळे येणे,रात्री अपरात्री पायाचे स्नायू अखडने,पायाला पेटके येणे, यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा.!

फुले तयार होण्याच्या वेळी या पानांवर एक आम्ल तयार होत असते त्याचबरोबर पहाटे या पानांवर दव पडते अशावेळी या हरभऱ्याच्या झाडा वर एक कापड टाकून ठेवा. एकदा का दव पडल्यामुळे कापड ओले झाल्यास नंतर ते कापड एका भांड्यामध्ये पिळुन घ्या.

मग जे ऍसिड निघेल ते एका बॉटलमध्ये भरून ठेवा यामध्ये मॉलीक ऍ सिड व ऑक्सिलीक ॲ सिड असते, यातील मुळे ज्या व्यक्तींना भूक लागत नाही त्यांच्याकरिता हे आम्लं गुणकारी आणि लाभदायक ठरते.

अनेकदा शरीरामध्ये लोहाची कमतरता जाणवत असते, अशावेळी हरभऱ्याच्या पाना सोबत मध खाल्ल्याने तुमच्या शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. याबरोबर याच्या पानांची भाजी खाल्ल्याने पोट साफ न होणे अपचन, छातीमध्ये जळजळ होणे यासारख्या समस्या त्वरीत दूर होतात म्हणूनच हरभरा हा खऱ्या अर्थाने आपल्या आरोग्यासाठी रामबाण औषध ठरतो.

हे वाचा:   रात्री दुधात घालून घ्या फक्त १ चमचा; रोगप्रतिकारक ताकद प्रचंड वाढेल,कोणताच आजार जवळपास थांबणार नाही.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.