दररोज अशी करा तुळशीची पूजा; माता तुळशी होईल प्रसन्न, ताबडतोब इच्छा होईल पूर्ण.!

अध्यात्म

तुळशीची पूजा कशी करावी. प्रत्येक हिंदू धर्मात घरासमोर तुळशीचे रोपटे असतेच आणि या तुळशीला हिंदू धर्मात मातेचा दर्जा मिळालेला आहे. या तुळशीची दररोज मनोभावे पूजा करावी. ज्या घरात तुळशी माता ची विधिवत पूजा होते ,त्या घरात सुख-समृद्धी अवश्य नांदते. पैशाची तंगी असेल ,सातत्याने घरात आजारपण असेल किंवा वास्तू दोष असतील अनेक समस्या असतील ,ग्रह दोष असतील ,असे अनेक दोष असतील तर तुळशीच्या पूजनाने दूर होतात.

आपल्या घरांमध्ये देवी दैवतांची पूजा केल्यानंतर तुळशी मातेची पूजा अवश्य करावी विशेष करून एकादशी पौर्णिमेच्या दिवशी पूजनाचा विशेष महत्त्व असते. कार्तिक महिना तुळशी पूजेचा मानला जातो. आपण तुळशी मातेची मनोभावे पूजा केली तर आपल्या मोठ्या मोठ्या बाधा, संकटे तुळशीच्या कृपेने दूर करता येतात. तुळशी अत्यंत विष्णूस प्रिय आहे. श्रीहरी भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय असणारी ही तुळशी आहे तसेच विष्णु पुराणामध्ये सात प्रकारच्या तुळशी कुंडं मिळते.

आधुनिक काळात कुंड त्याचा अर्थ कुंडी किंवा ज्या वृंदावन मध्ये आपण तुळशीचे रोपटे लावलेला आहे तिकुंडी नक्की कशी असावी. या विष्णू पुराणात सात दाखले आढळतात. ज्या लोकांना प्रचंड प्रमाणात धन हवे आहे. घरात ऐश्वर्या यावे ,वैभव यावे अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी गोलकुंडा मध्ये तुळशी मातेची स्थापना करावी. तुळशीचे रोपटे लावावे आणि तुळशी मातेची दररोज मनोभावे पूजा करावी.

ज्यांचा वंश वाढत नाही, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही व मूलबाळ होत नाहीयेत त्यांनी चौकटी आकाराच्या कुंडीमध्ये तुळशी स्थापन करावी आणि तुमच्या घरामध्ये सातत्याने वाद-विवाद होतात ,घर तुटू लागले आहे अशा वेळी घरामध्ये प्रेम वाढवण्यासाठी कुटुंबाच विभाजन न होता कुटुंबाचं एकी होण्यासाठी आपण त्रिवेदी कुंडा चा वापर करावा. त्रिवेदी म्हणजे त्रिकोणी आकाराच कुंड अशा त्रिवेदी आकाराच्या कुंडामध्ये तुळशी मातेची स्थापना करून विधिवत पूजा केल्याने घर अतूट राहते जर आपण षटकोणी कुंडची वापर केला षटकोनी कुंडा मध्ये तुळशी स्थापन केली तर धन, वैभव मोठ्या प्रमाणात आपल्या घरात येऊ लागते.

हे वाचा:   मंदिरात जर हे दिसले तर लगेच उचलून घरी आणा..पैशांचा ढीग लागेल..लक्ष्मी मातेची कृपा होते

काही लोकांच्या घरामध्ये अभाव असतो तुळशीला वर लटकवले जाते आणि त्याच ठिकाणी तुळशीची पूजा करतात तसेच विष्णु पुरानात खूप मोठा दोष आहे ज्या प्रकारे तुम्ही तुळशी लटकवतात त्याची पूजा करतात त्याचप्रमाणे त्याचं फळ तुम्हाला मिळतच पण तुमच्या कामात प्रचंड गती येईल. तुमचं काम पूर्णत्वाला जाईल आणि अगदी शेवटच्या घटकेला जाईल जसं काही तुम्ही घास खाऊ लागला आहात तो खाण्याच्या आधीच हेराहून घेतला जाईल आणि शेवटी शेवटी त्या कामांमध्ये तुम्हाला अपयश येतं कारण तुम्ही तुळशी मातेला लटकवलेला आहे कारण हा मोठा खूप दोष आहे.

अशा प्रकारची चूक करू नका. एक छोटासा उपाय सांगणार आहोत. तो उपाय वर्षभर केला तरीही चालेल, ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी कार्तिक महिन्यात केला तरीही चालेल. मराठी महिना कार्तिक महिन्यामध्ये आपल्या अंगणामध्ये तुळशीचं रोपटं नक्की असणार आहे . गोल त्रिकोणी षटकोनी कोणतेही तुमची जी इच्छा आहे त्या प्रकारचं ठेवा अजून एक छोटसा कुंड चौकोनी आकाराचे नक्की लावा.

ज्या ठिकाणी आपले तुळशीचे वृंदावन आहे त्या ठिकाणी हे छोटसं चौकोनी आकाराचे कुंड त्या ठिकाणी ठेवा किंवा इतर कुठेही ठेवा मात्र जेव्हा तुम्ही घरामध्ये देव पूजा करतात त्यावेळेस ते छोटसे कुंड घरामध्ये देवघर आणा आणि सर्व देवी देवतांची पूजा करताना या कुंडाची सुद्धा पूजा करा आणि पूजा केल्यानंतर पुन्हा ते कुंड आपण बाहेर नेऊन ठेवू शकता तसेच तुमच्या जीवनातील मोठे मोठे समस्या संकट दूर होतात.

हे वाचा:   कोणत्या वारी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत.? फायदे ऐकून चकितच व्हाल.!

काही लोक शिवलिंगाची पिंड असते ते पिंड तुळशी मध्ये स्थापन करतात त्यामुळे खूप मोठे दोष वास्तूमध्ये घरामध्ये उत्पन्न होतात. कोणत्याही परिस्थितीत त्यामध्ये हे दोष भोगावे लागतात. कोणतेही तुळशी वृंदावन मध्ये नागदेवता नाग शिवलिंग तुळशी वृंदावन मध्ये करू नका. त्याच प्रमाणे तुळशी मातेची सेवा करा. आराधना करा, मनोभावे पूजा करा. तसेच काही जणांनी आपल्या घराच्या गॅलरीमध्ये तुळशीचे रोप लावलेले असतात त्याची काळजी घेतात त्यांना पाणी घालतात त्याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो.

धन ,वैभव ,समृद्धी सगळं काही मिळतं पण मात्र अशा घरात चिंतेचं वातावरण भय अशा लोकांना सातत्याने सतावत राहत आणि याचं कारण असा आहे की तुम्ही अनेक रोपट लावलेली आहे त्याची निगा सुद्धा राखायला हवी आपल्या घरामध्ये अनेक पाहुणे येतात मग त्यात तुळशीची पान अनेक कारणामुळे तोडली जातात व तुळशीला अनेकांचा पाय लागतो. चपला त्याच ठिकाणी ठेवल्या जातात कधीकधी मांजर, कुत्रा असेल पशुपक्षी त्या ठिकाणी घाण करून जातात या जे क्रिया आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.